Childhood
सोसायटीत काही लहान मुलं क्रिकेट खेळत होती... खेळता खेळता छोटाश्या कारणाने भांडण झालं... एकमेकांच्या गचांड्या पकडून पार पटकून पटकून आपटणं सुरु होतं... दे दणादण... . इतक्यात बर्वे काका आले... बर्वे काकांचा सोसायटीच्या लहान पोट्याहोत कड्डक दरारा... त्यांना पाहीलं की पोरं जागा मिळेल तशी धूम ठोकतात... काका नजरेस पडताच बाकीची टिम गुल... आणि स्वत:च्याच तंद्रीत प्रदीर्घ भांडत असलेल्या दोघांपैकी एकाचं लक्ष तिकडे गेल्यावर "हिटलर काका आले... पळ" म्हणत एका क्षणात धूम ठोकली... आणि दुसऱ्यानं आऊटहाऊसमागे लपण्यासाठी एकमेकांना कव्हर केलं... काही क्षणांपूर्वी यांच्यात महायुद्ध रंगलं होतं, अशी शंकाही येणार नाही...!! . लयीच भारी... अश्या भन्नाट लहान लहान घटना मोराच्या जादुई पिसासारखं बरंच काही करुन जातात... :-):-):-)