मरण कसं असावं, एसी हॉलमध्ये झोपून नाकातोंडात नळ्या घेवून, किंवा फाटक्या डोळ्यांनी कडू आसवं गाळत वाट बघत येणारं मरण काय मरण असतं कां ? चालता बोलता हार्ट फेल होवून मरण्यात कसली आलीय मजा ? किडे मोजत वर्षानूवर्ष मरण्यासाठी झटणारे जगतातच काय ? हसत हसत जीव सोडला तर मरणाला काय अर्थ आहे ? गाडी ठोकली आणि मेला, काय कमावलं ? . हायवेवर मरुन पडलेला, शरीराच्या चिंधड्या चिंधड्या झालेल्या कुत्र्याचा मला नेहमीच हेवा वाटतो... तो खरा मरतो... तो मरणही जगतो... वेदना, तडफड, त्रास पुरेपूर अनुभवतो... तडफडून जीव सोडतो... जगण्याचं अख्खं थ्रिल त्याच्या मरण्यात असतं... उलट्या लटकलेल्या गिधाडांचं काय ? . मरण कसं असावं ? तडफड, यातना, कठीण, त्रास... सगळे भोग पूरेपूर भरलेलं... फडफड व्हावी मरण यावं तर असं जबरदस्त यावं... शरीराच्या चिंधड्या चिंधड्या व्हाव्यात... तडफडून तडफडून जीव जावा, मरणाच्या वेदना पुरेपूर भोगाव्यात... विव्हळ, यातना अनुभवत संपावं... मरणाचाही क्षण पूर्ण जगून निघावं... . आपलं मरण बघून इतरांच्या अंगावर काटा आला तर ते खरं मरणं... मरण असावं तर असं असावं... भयंकर, भयाण आणि भ...