Dada
Happy Birthday Dada... आजोबा... काही माणसांचं आपल्या आयुष्यात असणं हेच खूप महत्वाचं असतं. ... ज्यांच्या फक्त असण्याने सुद्धा आपण निर्धास्त असतो... बाहेर कितीही मोठं वादळ आलेलं असू देत, घरी आल्यानंतर कसं वाटतं ? तोच सेफ फील देणारं माणूस माझ्या आयुष्यात आहे... माझे आजोबा ! दादा !! ... माझ्यासाठी माझं छत ! कुठल्याही प्रश्नाचं शेवटचं उत्तर...! एखादी प्रश्न आपण कितीही उड्या मारून सुटत नसेल तर बाकीचे मंदिरात जात असतील, मी आजोबांसमोर जातो. मंदिरातला देव आरामात लक्ष देईल - मग काहीतरी मार्ग दाखवेल - मग त्यावर चाला....... इथे तसं नाहीय - समोर जायचं, प्रोब्लेम काय आहे तो सांगायचा - पुढच्या मिनिटाला आपण त्या प्रश्नाचं उत्तर शोधलेलं असतं... मग ते उत्तर म्हणजे पैसा असू देत, व्यक्ती असू देत किंवा वेळ असू देत... रिकाम्या हाताने परत फिरत नाही...! ... मी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतल्यावर माझ्या मागे पहिली शक्ती उभी राहिली ती म्हणजे माझे आजोबा... त्या निर्णयाचा मनापासून आनंद होणारे कदाचित ते एकमेव आहेत... ते फक्त उभे राहिले नाहीत तर जिथे सांभाळण्याची गरज होती तिथे सांभाळलंही... त्यांचा स्...