Meanwhile...
Meanwhile... ... १. बाळ झाल्यानंतर तेजूला आणि बाळाला तिच्या माहेरून घरी परत आणायची तयारी होत होती, तेव्हा फेब्रुवारी एन्डला ती गमतीत बोललेली "मी आता मे शिवाय येणार नाही"... बहूतेक कोणतातरी पक्षी सुमडीत तथास्तू बोलला आणि अडकली... सॉलीड खोड मोडली गेली... आता अर्धा जूनही तिथे काढावा लागतो की काय असं झालंय... ! ... २. यूएसएची अति क्रेझ होती... तिथले प्रोजेक्टस् घेण्यासाठी - जाण्यासाठी जीव तोडायचो... यूएसए भिनलं होतं... तेच ते डोक्यात... २०१९ जानेवारीत एक प्रोजेक्ट मिळाला, २०१९ डि सेंबरपासूनच जाण्याची तयारी सुरू केली - २०२० मे मध्ये जायचं ठरलं... पुर्ण तयारी झाली आणि कोरोनाने यूएसची काशी केलीय... आता धास्ती बसलीय... जायची इच्छा आणि क्रेझ संपली... कुणी फुकटही नेलं तरी किमान तीन वर्ष जायची हिंमत होणार नाही... ... ३. १६-१७ ला मुंबईहून पुतणीला भेटण्यासाठी धुळ्याला आलो, २२ ला लॉकडाऊन लागलं... वाचलो... तिथे एकटा असतो तर "हाल"चा लाईफटाईम अनुभव मिळाला असता... मला चहा येतो फक्त, तो पण धड बनत नाही... बाकी कामाची बोंब... जे होतं चांगल्यासाठी होतं...! ... ४. फार डोकं उठलं तर दवंडी ...