Posts

Showing posts with the label Mumbai

SayNoToLockdown

(राजकीय मताचा चष्मा उतरवूनच वाचा...) मार्च ते जून लॉकडाऊन केल्यानंतर, उद्योगधंद्याचं श्राद्ध घालून आणि सगळं विस्कळीत होवूनही जर जुलैमध्ये परत लॉकडाऊन लावावं लागत असेल तर तर ते मोदींपासून, उद्धव ठाकरेसकट आपल्या शहराच्या महापौरापर्यंत सगळ्यांचं अपयश आहे...! ... मोदी, ठाकरे येतात - भाषण देतात - जातात, रिकव्हरी प्लान, बाहेर पडण्याचा रोडमॅप कुणाकडेही दिसत नाहीय... पंधरा पंधरा दिवसाची स्किपींग सुरु आहे एवढंच दिसतं. प्रामाणिक विचार केला तर केंद्र असो वा राज्य, पहिला पेशंट सापडल्यापासून अक्षम्य चूका झाल्यात..एअरपोर्ट स्क्रिनींग कमी पडलं, धोका ओळखण्यात चुक झाली, लॉकडाऊन लावतांना मिसमॅनेजमेंट झालं...! राज्यातल्या तिघाडी सरकारचा प्रश्नच नाही... तिथे एक से एक नग भरलेय... स्थानिक प्रशासन हौस म्हणून लॉकडाऊन लावतं, त्यावर कुणाचा कंट्रोल नाही... जिल्हाधिकारी-पोलीस राजे झालेय... गोंधळ गोंधळ गोंधळ घातला जातोय. ... बेशुद्ध पडलेले उद्योगधंदे बघितल्यानंतर इमॅजनरी मधुन जेव्हा फॅक्टवर येतो तेव्हा कळतं...! उद्योग परत सुरु करायचे तर रिस्टार्ट करण्यासाठी किती धडपडा असेल आणि त्यातही किती आधिकारी, मंत

नापास सरकार... हतबल दरबार

जे पाच लाॅकडाऊन मध्ये साध्य झालं नाही ते सहाव्या लाॅकडाऊन मध्ये होईल ही महाराष्ट्र शासनाची अपेक्षा व्यर्थ आहे. काहीतरी रणनितीमधे (strategy), दृष्टीकोनामधे (approach), गृहितकांमध्ये (premise / assumptions) बदल केल्याशिवाय आणि व्यवहारी (practical) परंतु सृजनशील विचार (creative thinking) केल्याशिवाय गत्यंतर नाही.  सरसकट “लाॅकडाऊन” टाळला पाहिजे. शासनकलेमध्ये (statecraft) सूक्ष्मनियोजनाची (micro-planning) एक पध्दत आहे. ती अवलंबवून स्थानिक परिस्थितीचा नेमका अंदाज घेऊन नियोजन केलं पाहिजे. अंमलबजावणीचे अधिकार विकेंद्रीत केले पाहिजेत.   साथीच्या रोगाचा प्रतिकार कसा करायचा ह्यासाठी साथरोग नियंत्रणाची जी नियमपुस्तिका (rule-book) आहे त्यात स्वयंसेवी संस्था, वस्ती पातळीवरील नेते, प्रभाव असलेल्या व्यक्ती आणि स्थानिक भाषेत संदेश (efrective local communication) देणं महत्वाचं असतं.. ते इथे काहीही झालं नाही.  “लाॅकडाऊन” चे दोन प्रमुख उद्देश असतात. १) संसर्ग रोखणे; आणि २) शासनपातळीवर क्षमता (तपासणी, मागोवा, उपचार) वाढवणे. दोन्हीमध्ये महाराष्ट्र शासन पहिल्या पाच “लाॅकडाऊन” मध्ये अपयशी ठरलं आ

Raju Parulekar - Devendra Fadanavis Insider Interview

Image
परुळेकर - फडणवीस इनसाईडर चॅनेलची मुलाखत वेळ मिळेल तसं तीन-चार दिवसात बघून संपवली... ... फडणवीसांची आजपर्यंतची सर्वांत चांगली मुलाखत म्हणजे ही मुलाखत झालीय... तो माणूस मूळातच जबरदस्त आहे, पण जबरदस्त माणसाला बोलतं करण्यासाठी मुलाखत घेणाराही त्या तोडीचा असावा लागतो... राजू परुळेकरांना श्रेय द्यायलाच हवं... फडणवीस परुळेकरांना मुलाखत देतायेत ऐकल्यावर विरोधाच्या सूरात माझाही सूर होता, पण मुलाखत बघीतल्यानंतर फडणवीसांनी जे केलं ते योग्य केलं हे समजलं...! ... परुळेकर जुन्या फळीतले पत्रकार आहेत, त्यांची काही मतं पटत नाहीत, काही १०० टक्के पटतात - (स्पेशली : शिवसेनेबद्दलची...!) जसं, जगाचा-देशाचा अभ्यास नसेल, पण मुंबईसह महाराष्ट्राची आणि ठाकरसेनेची नस ते जाणून आहेत, परखड आहे... आणि मूळात हल्लीच्या जाधव, सरदेसाई वगैरे फडतूस लोकांसारखं बोलणाऱ्याला इन्टरप्ट न करता उत्तरं देण्यासाठी पुर्ण वेळ दिला...! चांगलं ते चांगलं म्हणायलाच हवं... परुळेकरांनी मुलाखत व्यवस्थित हँडल केली... अर्थात "ट्रोलर्सना सौम्य घ्यायला सांगा..." हे सांगणं त्यामागे आहेच... परुळेकरांची प्रतिमा थोड

Sushant...

चार पैसे कमी मिळाले चालतील, ग्लॅमर नसलं तरी चालेल, फार यशही मिळालं नाही तरी चालेल... पण आयुष्य समाधानी आणि शांत असावं...! पुर्ण असावं ...! ... आयुष्यात कुठल्याही टप्प्यावरुन परत फिरता येईल असा एक बेसकॅम्प असावा... कुठेही जाणवलं की शक्ती संपलीय, बिनधास्त परत फिरुन नव्याने सुरुवात करावी... जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपलं आयुष्य आपलं असतं...! ... पैसा आणि ग्लॅमर आपली काळी बाजू सोबत घेवून येतो... मुंबईच्या लाईम लाईटमध्ये एक म्हण आहे - "बम्बई जमनी चाहीये...!..." ती जमली तो टिकला - नाही तो हरवला...! प्रसिद्धी - हवा आणि पैसा डोक्यात जायला नको... टिकवता यायला हवं,  जरी गेलं तरी स्विकारण्याची तयारी हवी...! ... सुशांत सिंह राजपूत इथेच हरवला... बम्बई जमलीच नाही...  बेसकॅम्प नसेल कदाचित...! म्हणून आत्महत्या हा शेवटचा पर्याय स्विकारला... कारण हजार मिळतील, पण रिजल्ट एकच : चांगला अभिनेता गेला ... एमएसडीची स्टोरी याच्यामूळे जबरा झालेली... अजरामर म्हणा ...! पुढेही तगडे हिटस् दिले असते, पण तो कोसळण्याचा काळा क्षण सांभाळू शकला नाही ! ... प

Thought of Cities

दहा-दहा लाखाची अवाढव्य महानगरं नाही - ना हजाराचं एकदमच छोटं खेडं... एक लाख लोकांच्या लहान शहरात राहणारा माणूस आज एकदम सुखी आहे. त्याला ना महानगराची धावपळ, ना खेड्याची गैरसोय - जे जेवढं हवं तेवढं, वेळेवर - व्यवस्थित मिळतं ... सामुहीक संकटाची झळ सुद्धा कमी पोहचते ! - ओव्हरऑल मज्जानू शहरी लाईफ !  पोटार्थी लोकांची स्वार्थी गर्दी म्हणजे महानगर, ही लहान शहरं म्हणजे सुखवस्तू कुटूंब म्हणता येईल. महानगरातली लोकं एरव्ही त्याला डाऊनक्लास म्हणत असू, पण आज तीच माणसं आपली किव करताय...!

मराठी राजभाषा दिन २०२०

#मराठीराजभाषादिन ... = मी आणि माझी मराठी = ...  "मराठी" - स्वरुप, लिपी एक असली तरीही मराठी माझी वेगळी - तुमची वेगळी आहे - प्रत्येकासाठी ती त्याची त्याची असते... आईचं जागतिक महत्व, स्वरुप जरी एक असलं तरीही आपली आई - आपलीच आई असते... आपल्यासाठीच असते... मराठीचंही तसंच आहे... भाषा प्रत्येकासाठी वेगळ्या रुपात असते, स्वरूप एक, लिपी एक पण भाषा मात्र प्रत्येकाची वेगळी असते... प्रत्येकाला उमगलेली वेगळी असते, भेटलेली वेगळी असते... आपली आपली असते...! ... हे माझ्या मराठीविषयी...! ... माझ्या आई-पप्पांनी माझ्या आयुष्यातला पहीला उत्तम निर्णय कोणता घेतला असेल ? - तर मला मराठी शाळेत घालणं... मराठी शाळेत जे मराठी वळण लागलं, ते इतर कुठेही लागलं नसतं. लहानपणी मराठीतून लिहीणं - वाचणं शिकल्याने न आणि ण, ळ आणि ल, श आणि ष, जगातला ज आणि जनावरातला ज यांतला फरक कळल्याने उच्चार स्पष्ट झाले, आणि त्यामूळेच कदाचित गाणंही जमलं... मराठीतूनच शब्दाचा योग्य अर्थासहित उच्चार होतो, आणि समोरच्यापर्यंत पोहचतो. . मातृभाषा कशाला म्हणतात ? जी आपल्या मनाची भाषा असते... आणि मनाची भाषा असल्याने

CabDriver and Me

घर ते ऑफीस शेअर कॅब बुक केली, पेमेंट मोड कॅश ठेवला. (जनरली डिजीटलच करतो, आज तो फोन डिस्चार्ज होता...) ज्याचे झाले १४४ रुपये... कॅब ड्रायव्हरनं आधी पैसे मागितले - मी १५० दिले... त्याने ६ रुपये ड्रॉपला परत देतो सांगितलं... ... अख्खा प्रवास त्या माणसाने पक पक पकवलं, सीएए - कॅबने देशाची कशी वाट लावलीय ते बकला, हम लोग क्या इन्सान नही ? हमने मोदी का क्या बिगाडा ? भला हो राहूलजीका जो अकेले नड रहे... - ऐ भाय दिमाग मत खा सवेरे सवेरे... बोलून त्याला गप्प बसवलं, हे असे यझ खूप भेटतात दिवसभरात - त्यांची यथाशक्ती घेतलीही जाते, त्यामूळे काही वाटत नाही, पण सकाळी सकाळी नको कटकट... ... इतक्यात आरे फ्लायओव्हरला एक टिपीकल मराठी काका बसले, त्यांची आणि माझी हाय-हॅलो ओळख आहे... त्यामूळे भेटल्यावर पुन्हा हाय हॅलो झालं... त्यांचं दुकानाच्या जीएसटीचं काही लफडं सुरु होतं... त्याचा सल्ला घेण्यासाठी मित्राकडे निघाले होते... पुन्हा तिच कॅसेट दुसऱ्या आवाजात वाजली... जुनंच चांगलं होतं, कॅश यायची, व्हॅटची इतकी कटकट नव्हती ... आता जो येतो तो कार्ड दाखवतो... सगळं रेकॉर्ड ठेवावं लागतं... ! हे ओळखीचे असल्या

राष्ट्रपती राजवट

Image
महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रपती राजवटीच्या मन:पूर्वक शुभेच्छा... हि राष्ट्रपती राजवट आपल्याला भरपूर मनोरंजन देणारी, नवीन अनुभव देणारी, टीव्हीच्या रिचार्जच्या दुप्पट रिटर्न्स देणारी ठरो - हि महामहीम राष्ट्रपती, राज्यपाल आणि मोटाभायला प्रार्थना...! ... राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? कलम ३५६ नुसार घटकराज्य शासन कारभार राज्यघटनेनुसार चालणे अशक्य असल्याचा अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींनी दिला किंवा राष्ट्रपतींना सुमोटो पद्धतीने तशी खात्री पटल्यास राष्ट्रपती जाहीरनामा काढून राष्ट्रपती राजवटीची घोषणा करू शकतात. राष्ट्रपती राजवट समाप्त होण्याची घोषणाही राष्ट्रपतीच करतात. संसदेने अशा घोषणेला मान्यता दिल्यानंतरच ती अंमलात आणली जाते. राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत संसदेची मान्यता मिळवणे आवश्यक असते. मात्र मंजूरी मिळाल्यानंतर केवळ सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येते. परंतु संसदेने या घोषणेला पुन्हा पुढील सहा महिन्यांसाठी मान्यता दिल्यास राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवता येऊ शकतो. अशाप्रकारे वाढ करून जास्तीत जास्त एखाद्या प्

आरेचं जंगल

Image
आरे मिल्कमध्ये घर घेतांना तिथलं निसर्ग हे एकमेव कारण समोर ठेवलेलं... मुंबईच्या गर्दीत राहूनही शहरापासून बाहेर, जंगलाच्या मध्यात राहण्याचा अनूभव देणारं ते ठिकाण आहे. चार लाखाच्या आसपास असणाऱ्‍या डेरेदार वृक्षांमूळेच मुंबईच्या धोकेदायक प्रदुषणातही किमान उपनगरांत तरी वातावरण संतुलीत राहतंय. . सरकारच्या बाजूचा गट सांगतोय... - मेट्रो कारशेड अत्यावश्यक आहे. आरेतल्या चार लाख झाडांपैकी सत्तावीसशे तोडली तरी फार फरक पडणार नाही. समोरच्या गटातील मंडळी राजकारण करताय वगैरे ... . तूर्तास मान्य ! वृक्षतोडीस विरोध करणारा गट राजकीय हेतू मनात ठेवून स्पॉन्सर्ड असेल. त्यांचं बॅकीँग कुणीतरी भलतंच असेल... पक्या वगैरे मंडळी फोटोसाठी थोबाड घेवून आलीत... मान्य ! . पण आरे परीसरात राहण्याचा अनुभव, आणि झाडांची वाढ, फायदे, प्रदुषण, झाडांची गरज यां मुद्यांवर किमान प्रिप्रायमरी पर्यँत झालेलं शिक्षण यांचा विचार केला तरीही झाडांची कत्तल चुकीचीच आहे हेच कळतंय... . ज्या अवस्थेत झाडं कापली ती वाढायला सरासरी किमान तीन वर्ष लागतील. जास्तही ! त्यापेक्षा कमी नक्कीच नाही... झाडं कापायला दोन

वरची रेषा मोठी करण्यासाठी खालची रेषा लहान काढावी लागते

Image
एखाद्या गोष्टीचा कंटाळा आला असेल किँवा निवड करण्यात गडबड होत असेल तर साधं आणि सोप्पं काम करावं - त्यापेक्षा वाह्यात गोष्टीचा अनूभव घ्यावा... मी अनेकदा असं ट्राय केलंय... . बायकोला गोरेगांवला आवडत नव्हतं. काही ना काही कमी वाटायचं... माझं ऑफीस अंधेरीत, आणि आधीपासून सवय वेस्टर्नची आहे त्यामूळे मी शक्यतोवर वेस्टर्नलाच राहण्याचा ट्राय करतो... मागचा पुर्ण आठवडा तिला फिरवलं... नालासोपारा, वसई रोड, विरार पर्यँत. सेँट्रल लाईनला उल्हासनगर, बदलापूर वगैरे, नवी मुंबईत पनवेल पर्यँत... आता  गोरेगांव आमच्यासाठी स्वर्ग झालंय  :-D . मी स्वत: पुणे की मुंबई अश्या निवडीत अडकलो होतो. तेव्हा एकीकडे मुंबईतल्या इंडस्ट्रीचे फोटो लावले आणि दुसरीकडे पुण्यातल्या मंडईचे... मला तिथली टिपीकल कचकच आवडत नाही. त्यामूळे मुंबईची निवड मला सहज वाटली. . करंट अकाऊंट महाराष्ट्र बॅँकेत उघडावं की नको याच्या विचारात होतो. मी एक दोनदा एसबीआय जावून आलो. आता महाराष्ट्र बॅँकेत अकाऊंट आहे. . गाडी घेवून ऑफीसला जायचं नाही... बाईकवर मस्त वाटतं. .. मनात फूटबॉल सुरु होतं... त्यामूळे रोजच्या ट्रॅकवर मुद्दाम ट्राफीकच्या वेळेला गेलो, पार्कीँ

House in Metro

मोठ्या शहरात (उदा. महाराष्ट्रात मुंबई, पुणे) भाड्याचं घर चांगलं की स्वत:चं ? हा एक प्रश्न समोर आला. आणि दुसरं म्हणजे गोरेगांवची एक बिल्डीँग पडल्यावर जमीनीचं खरेदीखत न केल्याने बिल्डरनं पुन्हा बांधून न देत हात वर केल्याची, आणि त्यामूळे अनेक कुटूंब उघड्यावर आल्याची एक बातमी वाचली... तसंच कॅम्पाकोला बद्दलही झालं होतं... . करायचं काय ? यासाठी मी स्वत:चा एक ट्रॅक तयार केलाय. पटतोय कां बघा. . आधी प्रश्नाच्या पहिल्या भागाचा विचार करु... भाड्याचं घर हवं की स्वत:चं ? तर याबद्दल माझं मत आहे... प्रॅक्टीकली भाड्याचं, इमोशनली स्वत:चं...! . स्वत:चं घर घेतांना शक्यतोवर संपुर्ण रक्कम (किमान ८० टक्के तरी) तयार असली तरंच स्वत:चं घर घेण्याचा विचार करा... किँवा फार फार तर ईएमआय आपल्याला खरंच झेपेल असा असेल तरंच... ! ते सुद्धा वेळ आल्यानंतर. योग्य पद्धतीने. (याच लेखात दिलंय ते) . भाड्याच्या घराचे काही टेँशन्स नसतात... आणि महत्वाचं म्हणजे ते हवं तेव्हा बदलता येतं. आपल्या सोयीने त्यात आधीक ऐमिनिटीज् अॅड करता येतात. शहरात आल्यानंतर किमान काही वर्ष सेट होईपर्यँत तरी शहाण्याने स्वत:चा फ्लॅट घेण्याचा विचार करु

उंगली टेढी

Image
= उंगली टेढी = . धुळे टू मुंबई असं स्लीपर गाडीचं तिकीट कालच्या प्रवासासाठी मी परवा सकाळीच पोर्टल वरुन बुक केलं... कन्फर्मेशन मेसेज आला. रिटर्न तिकीटाच्या भरवश्यावर मी ट्रिप प्लान केली... धुळ्यात आलो...! काम झालं की रात्री परत मुंबईला जाता येईल अशी तयारी केली... आणि काल सकाळी आठ वाजताच त्या पोर्टलचा गाडी कॅन्सल झाल्याचा आणि १००% रिफंड झाल्याचा मेसेज आला... व्यवहार संपला ! दुसरी गाडी थोड्यावेळात बघू म्हणून ते बाजूला ठेवलं. . नऊ-साडेनऊला ट्रॅवल्सच्या ऑफीसमधून फोन आला. - "सर, ती गाडी कॅन्सल झालीय, तर आम्ही तुम्हाला दुसऱ्‍या गाडीत शिफ्ट करु कां ?" - चालेल. पण गाडी कोणती आहे ? - सिटीँग आहे... - आणि चार्जेस ? - आधीच्या गाडीइतकेच... ७०० ! - पण ही सिटीँग आहे ना ? - हो. पण चार्जेस सेम आहेत. - मग नको. माझं बुकीँग कॅन्सल करा. मी दुसऱ्‍या स्लीपर गाडीनं जाईल... सिटीँगला नको. - ठिक आहे. विषय संपला. पावसाच्या बातम्या आणि गाड्यांना गर्दी असल्याने मी पण कालचं जाणं कॅन्सल केलं. . सकाळीच प्रकरणाचा निकाल लावल्यानंतरही काल संध्याकाळ पर्यँत त्यांच्या बुकीँग कन्फर्म - बुकीँग कॅन्सलच्या मेसेजेसचे आप

Vote India Vote

मतदान करा "च" !  लोकसभेची निवडणूक रोज रोज येत नाही. १०० वर्ष जगलो तर आपल्या उभ्या आयुष्यात जास्तीत जास्त १६ - १७ लोकसभा येतात. त्यात मतदानाला जाणं - मतदानाची प्रक्रीया करणं - परत येणं, यात अर्धा ते पाऊण तास, खुप झालं तर १ तास जातो. दर ५ वर्षातला हा १ तास आपण देशाचा पंतप्रधान असतो, राजा असतो. पुढच्या पाच वर्षासाठी देशाचं धोरण आपण ठरवत असतो. अनेक योजना, महत्वाचे कायदे पास करत असतो. देशाचा विकास करत असतो. म्हणजे पुर्ण आयुष्यात जास्तित जास्त फक्त १७ तास आपल्याला ही संधी मिळते. उद्याचा दिवस तसाच... राजा असण्याचा. पंतप्रधान असण्याचा. मतदान करा !  हक्क आहे आपला, तो मिळवा. पुढच्या पाच वर्षात देश जी काही प्रगती करेल तिचे आपण बरोबरीचे शिल्पकार असू, जबाबदार असू...! त्यामूळे मतदान करा.... कराच !  उद्याचा दिवस पंतप्रधान व्हा !  राजा व्हा ! - तेजस कुळकर्णी  ... मतदानाची आजची पूर्वतयारी : .. १. आपलं मतदान कुठल्या केंद्रावर आहे याची खात्री करा. यासाठी https:://www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा Voter Helpline App वर मार्गदर्शन मिळेल. त्यावरून आपला यादी भाग

मुंबई रिवर एन्थम समीक्षण Mumbai River Anthem

Image
सौ. अमृता देवेंद्र फडणवीस यांनी गायलेलं, आणि मुख्यमंत्री फडणवीस, वनमंत्री मुनगंटीवार यांची भूमिका असलेलं "मुंबई रिवर थिमसॉंग / एंथम"... .. गाण्याची सुरुवात जराss बोअर होते... वर्षा बंगल्यात पेपर वाचत बसलेल्या सौ. सीएम आणि त्यांची मुलगी ... इथे त्यांचं पेपर धरून शून्य नजरेत बघत बसण्यात आणि त्या लहान मुलींच्या चेहऱ्यावर कुठेतरी कृत्रीमपणा वाटतो.. River rejuvenation awareness campaign वाचून त्या एकदम नदीकाठी पोहचतात...  .. अमृता फडणवीसांच्या आवाजाला शास्त्रीय संगीताचा बेस आहे -  मूळ आवाजात वजन, जडपणा जाणवतो... गंभीर प्रकृतीच्या गाण्यांना साजेसा आवाज आहे त्यांचा... सहज सांगायचं तर "परदेसी परदेसी जाना नही...", "सब कुछ भूला दिया", "जिंदगी मे कोई कभी आये ना रब्बा..." सारख्या बेसचे गाणे गाण्यासाठी त्या परफेक्ट आहेत... सबब : या गाण्यात त्यांचा आवाज पहिला मिनिट मिसमॅच वाटतो... पण पुढच्या तीस सेकंदात त्यांचा आवाज कानात बसला, म्हणजेच कानाला सवय झाली, त्या आवाजाला म्यूजिक मॅच झालं आणि कोरस मिळाली... सुसह्य वैगेरे झाला की गाणं आणि व्हिडीयो मस्त पकड घेते...

Mumbai Elfisten Station Accident

मुंबईत आल्यानंतर वर्षभरात मी महत्वाचं शिकलोय ते म्हणजे भावनाशून्य राहणं... इथे भावनांना काडीचीही किंमत नाही, तुमच्याभोवती लोकं मरताय, महापूर आलेय, कुणीही येऊन शहराची वाजवून जातंय ... "स्साला रोज का यह्हीच लफडा है यहाँका"... म्हणून  सोयीस्करपणे डोळे झाकून जगणं म्हणजे मुंबई स्पिरीट... यात जोपर्यंत आपल्यावर येत नाही तोपर्यंत रोजची जी झक मारायची ती मारावी लागणार आहे... कुणी हात धरणारं नाही - आपलं ओझं आपणंच वाहणार... . मुंबई म्हणजे कुठलं शहर नाही, रस्ता नाही, इमारत नाही - संवेदना मेलेला इथला एक एक माणूस म्हणजे मुंबई. त्याचं स्पिरीट त्याचं जगणं आहे. ना कुठल्या कौतूकाचं मोहताज - ना टिकेचं मिंधं... !... ... एल्फिस्टन परेल रेल्वे पुलावरील दुर्घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved