RIP विजू खोटे
मराठी वा हिँदी चित्रपटसृष्टीत बरीच मंडळी सहकलाकार म्हणून जन्माला आली, सहकलाकार म्हणूनच संपली... अभिनयाच्या बाबतीत अमिताभ बच्चनना तोडीस तोड असूनही आणि अख्खी हयात इंडस्ट्रीला देवूनही चित्रपटाचे मुख्य नायक होणं त्यांच्या नशीबात नव्हतं... तरीही, भारतीय चित्रपटसृष्टीतलं मानाचं पान ते ठरले - अध्याय ठरले ! त्यांच्याशिवाय भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास पूर्ण होणार नाही. . "विजू खोटे" हा अध्याय आज संपला ! चित्रपटसृष्टीतलं विजू खोटे पर्व संपलं. . भारदस्त आवाज, करारी चेहरा, आणि जबरदस्त अभिनय क्षमता असलेल्या या माणसाने पदरी पडलेल्या खलनायकी भूमिकांचं सोनं केलंय. "कितने आदमी थे ?" या ऐतिहासिक प्रश्नाचं ऐतिहासिक उत्तर देणारा आवाज शांत झाला. . विजू खोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. - तेजस कुळकर्णी