Posts

Showing posts with the label RSS

गडकरी वि. फडणवीस

Image
 कोरोना काळात आधी स्वत:ची तब्येत सांभाळा, कुटुंबियांना जपा आणि शक्य होईल तसं सगळी कामं ऑनलाईन करा!- नितीनजी गडकरी टू देवेंद्रजी फडणवीस गडकरींचा फडणवीसांना प्रेमळ सल्ला - देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. त्यावरुन गडकरी यांनी फडणवीसांना प्रेमळ सल्ला दिलाय. "देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली दौरा केला. आवश्यक आहे जणं. पण त्यावेळी त्यांच्या गाडीत किती लोकं होती? आता सर्व काम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने करा. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सोय आहे. उगाच कुणाच्या घरी जाऊ नका. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधा. तुम्ही जेवढं लाईटली घेत आहात तेवढं हे साधं नाही. आपण अनेक कार्यकर्ते गमावले आहेत", अशा शब्दात गडकरी यांनी फडणवीसांना दौरे टाळण्याची विनंती केली. आता यावरून वेगळे अर्थ (ते कसे काढले? सामना वाचून!) विरोधक मजा घेत आहेत. जरूर घ्या. गडकरी आणि फडणवीस पन दोघे व्हाट्सअप्प वर तुमचे स्क्रिनशॉट एकमेकांना दाखवून मजा घेत आहेत. तुम्ही मोदी vs गडकरी किंवा फडणवीस vs गडकरी करायचा जेंव्हा प्रयत्न करता, तेंव्हा ते तिघेही खुश असतात! कारण देश कि...

राष्ट्रपती राजवट

Image
महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रपती राजवटीच्या मन:पूर्वक शुभेच्छा... हि राष्ट्रपती राजवट आपल्याला भरपूर मनोरंजन देणारी, नवीन अनुभव देणारी, टीव्हीच्या रिचार्जच्या दुप्पट रिटर्न्स देणारी ठरो - हि महामहीम राष्ट्रपती, राज्यपाल आणि मोटाभायला प्रार्थना...! ... राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? कलम ३५६ नुसार घटकराज्य शासन कारभार राज्यघटनेनुसार चालणे अशक्य असल्याचा अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींनी दिला किंवा राष्ट्रपतींना सुमोटो पद्धतीने तशी खात्री पटल्यास राष्ट्रपती जाहीरनामा काढून राष्ट्रपती राजवटीची घोषणा करू शकतात. राष्ट्रपती राजवट समाप्त होण्याची घोषणाही राष्ट्रपतीच करतात. संसदेने अशा घोषणेला मान्यता दिल्यानंतरच ती अंमलात आणली जाते. राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत संसदेची मान्यता मिळवणे आवश्यक असते. मात्र मंजूरी मिळाल्यानंतर केवळ सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येते. परंतु संसदेने या घोषणेला पुन्हा पुढील सहा महिन्यांसाठी मान्यता दिल्यास राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवता येऊ शकतो. अशाप्रकारे वाढ करून जास्तीत जास्त एखाद्या प्...

राम मंदिर

Image
जय श्रीराम ! . सर्वसमावेशक निकाल. भारतीय सर्वोच्च न्यायालयाने न्यायप्रतिष्ठा जपलीय. . अयोध्या यापुढे केवळ रामजन्मभूमी म्हणूनच नाही, तर सर्वोच्च न्यायालयाच्या अप्रतिम निकालासाठी सुद्धा ओळखलं जाणार... ! . भारतीय लोकशाहीचा, ऐक्याचा विजय झालाय. . जय जय श्रीराम ! . ऐतिहासिक निर्णयाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार झालेल्या तुम्हा आम्हा प्रत्येकाचं अभिनंदन. ... ५०० वर्ष जुन्या प्रकरणाची आणि १५० वर्ष जुन्या खटल्याची सुरेख सांगता करत,  मा. सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे.  रामजन्मभूमीची २.७७ एकर्स जागा राम मंदिरासाठी देऊन,  अयोध्येतच ५ एकर जागा मशिदीसाठी देत लोकशाहीला साजेसा न्याय केला आहे. ..  आता अयोध्येत राम जन्म भूमी वर करोडो भारतीयांचं स्वप्न असलेलं भव्य राम मंदिर उभे राहणार.  कारसेवकांच्या बलिदानाला आज न्याय मिळाला.   

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस... Vs Others

Image
एकीकडे - देवेंद्र गंगाधरराव फडणवीस... . दुसरीकडे - उद्धव ठाकरे, संज्या रौत, राजाभाऊ ठाकरे, शरद पवार, चव्हाण मंडळी, कॉंग्रेस मंडळी, मलीक वगैरे टिव्हीवरच्या चर्चेत ज्ञानबिड्या पिणारे व्हेरी थोर लोक्स, मूकमोर्चा मंडळी, प्रकाशभौ आंबेडकर, जितूबुद्दीन आवहाड फ्रॉम गाझा, शेट्टीचा राजू, आयबीएन-टिव्ही९-सामचं चपराश्यापासूनचं अख्खं रिकामचोट मंडळ, काणे-सबनीस वगैरे मंडळी, हे ही कमी म्हणून पक्षांतर्गत तारे तोडणारे जेष्ठ - लोकांच्या मनातील माजी मुख्यमंत्री वगैरे मंडळी... आणि फडणवीसांनी ब्राह्मणांसाठी काय केलं म्हणत विरोध करणारा एक गट...! .. याचं कारण एकच : योग्य - स्वच्छ आणि अभ्यासू राज्यकारभार...! .. महाराष्ट्राला घाणेरड्या डावपेचांचा, वाह्यात हातवाऱ्यांचा उबग आलेला... त्यात या माणसाला नशीबानं सत्ता मिळाली, आणि त्यांनी त्याचं सोनं केलं. राजकारणात जे स्वच्छ डावपेच आहेत ते वापरुन वरच्या लिस्टेड मंडळींनी वेळोवेळी निर्माण केलेलं उपद्रव त्यांनी एकहाती थोपवलं, या माणसाविरुद्ध राजकारणाने अगदी खालची पातळी गाठली, त्यांच्या पत्नीबद्दलही बरळलं गेलं, तरीही संयम...

Dhule, Gote and Elections

Image
धुळे शहरात तुला ना मला घाल ...ला.... . लोकसंग्रामचे गोटे, अपक्ष कदमबांडे यांच्या लढतीत एमआयएमचा उमेदवार निवडून आलाय...! . माझं मतदान याच मतदारसंघात आहे... . हे धक्कादायक झालंय...! .. काय झालं ? धुळे शहरात मतदान झालं ५० टक्के - त्यालाही कमी. अनिल गोटे यांचा पिंड संघाचा आहे, आणि धुळ्यात त्यांनी केलेली कामे तुफान आहेत. त्यामुळे लोकांनी ३ वेळा केवळ त्यांच्या नावावर निवडून दिलं. अगदी यावेळी देखील तेच येतात असं चित्र होतं. भाजपचे आमदार अनिल गोटेंनी आधी महापालिका, मग लोकसभेवेळी भाजपाची पिसे काढली होती. ज्यामुळे गिरीश महाजन शहरात येऊन अनिल गोटे कसे जिंकतात हे मी बघतोच वैगेरे गोष्टी करून गेले. शहर विधानसभा सुटली सेनेला - आणि सेनेने जो उमेदवार दिला तो मुळात शहरात लढायलाच तयार नव्हता. त्यांचं होमपीच धुळे ग्रामीण (धुळे बाह्य भाग) आहे. त्याला ऐनवेळी उभा केला. त्यामुळे अर्धी लढाई इथेच संपली. दुसरा उमेदवार अपक्ष उभा होता (फुगा)... ज्यांच्याकडून गोटेंना फाईट मिळेल असं वाटलं. ते उमेदवार आधी राष्ट्रवादी मधून बाहेर पडले, आणि अपक्ष लढले. जिथे शहरात विकास हा एकमेव मुद्द...

कॅप्टन कूल

Image
आज एका माणसाची महत्वाच्या क्षणी निर्णायक संयम भूमिका राहिली. सभापती, उपराष्ट्रपती वैकय्या नायडूजी ! . आज दुपारच्या सत्रात सभागृहात आल्यानंतरही त्यांनी आपण या महत्वाच्या विषयावर असलेल्या चर्चेत समोर नसण्याबद्दल खेद व्यक्त केला... जबाबदारी याला म्हणतात... केवळ संचालन करणं एवढंच नसून प्रत्येक सदस्याच्या आधिकाराचा मान ठेवत, शब्द न शब्द ऐकून त्यावर नियंत्रण ठेवणंही महत्वाचं असतं... कुठे महत्व द्यायचं कुठे नाही - यावर ते पक्षपात न करता निर्णय देतात. सिब्बलने काहीतरी पुड्या सोडल्यान ंतर उजवीकडच्या सदस्यांनी गोँधळ घालायला सुरुवात केली. त्याला महत्व न देता - "दो मिनट मे संविधात बदल नही जायेगा, मै यहॉँपे बैठा हूँ... क्या रिकॉर्ड मे जायेगा ये मै देख रहा" म्हणत प्रकरण शांत तर केलं, पण एकाच वाक्यात सिब्बलची हवा सोडली... ! . खमका मॉनीटर असला तर वर्ग ठिकाणावर राहतो. सकाळी गोँधळ सुरु झाला, त्यात मुर्दाबादच्या घोषणा, रडणं यांतही खमकेपणे सभापतीँनी एक बाजू लावून धरली. पीपीडीच्या दोघांनी कपडे फाडल्यानंतर त्यांना उचलून बाहेर फेकलं... ! . रेणूका चौधरी हसल्यानंतर याच माणसानं कडक शब्दा खडसावलं हो...

BJP

Image
भाजपाचा आज ३८ वा वर्धापनदिन. .. ६ एप्रिल १९८० रोजी हिंदुराष्ट्र, राष्ट्रवाद, आर्थिक उदात्तीकरण आणि मानवता या विचारधारेवर भाजपाची स्थापना झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्त, हिंदुत्वाचा पाया आणि राष्ट्रभक्त उजव्या विचारसरणीचे ऋषीतूल्य नेते हे भाजपाचे आधारस्तंभ आहेत. केवळ ३ जागांपासून सुरुवात झालेला भाजपा आज देशातला सर्वसत्ताधीश पक्ष आहे. भाजपा जगातील सर्वात मोठे राजकीय संघटन आहे. .. १९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस व तत्कालीन पंतप्रधानजवाहरलाल नेहरू ह्यांच्या कडून पाकिस्तानचे होणारे लांगुलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनस्ंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व ह्यादरम्यान निदर्शने करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरूण नेत्यांनी जनसंघाची सुत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या ल...

BJP 38th Anniversary

Image
भाजपा १९५१ मध्ये हिंदूत्व विचारधारेच्या जनसंघाची श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्थापना केली. १९७७ मध्ये भारतीय इतिहासाचा काळा कालखंड आणीबाणी संपल्यानंतर झालेल्या न...

Guru... Guide...

Image
= गुरु = जन्माला आल्यापासून आपला प्रवास शेवटाकडे सुरु असतो... हा प्रवास जितका आनंदाचा, तितकाच खडतर ! गुबली बूबली करून एक गाल ओढून भलं मोठ्ठं हसू आणणारा तर त्याचवेळी दुसऱ्या ग...

"संघ संस्कार"

काल संध्याकाळची गोष्ट... धायरी तथा पुण्यातले सगळे ऑटोवाले सामुहीक कामचुकार आहेत... आणि याचा याची देही अनुभव घेत नऱ्हे रोडवरुन वेताळ चौक मार्गे मुंबईच्या गाड्या उभ्या राहतात त्या विश्वास हॉटेल स्टॉप पर्यंत चालणं सुरु केलं... हातात जड बॅग, आणि निघण्यापूर्वी (ऑटो मिळेल या भ्रमात) डबल पोटभर हादडलेलं... त्यामुळे घामाघूम...!... ... वेताळ चौकातून पुढे आलो... तोच मागून एक स्विफ्ट कार आली... त्यात फ्रंट सिट वर दहा बारा वर्षांची एक लहान मुलगी बसलेली, तिचे पप्पा गाडी चालवत होते... गाडी थांबली... "दादा, कुठे जायचंय ? लिफ्ट हवी ?" त्या गोड मुलीनं, तितक्याच गोड आवाजात विचारलं... - जवळपास १ किमी, जड बॅग उचलून चालण्याचा नभविष्यती वाटणारा अनुभव घेत असतांना, चक्क स्वतःहून लिफ्ट... रेगिस्तानमे झील मिल जाऐ, टाईप वाटून गेलं... तरीही हावरटासारखं लगेच हो कसं म्हणणार ?... "नो नो.. इट्स ओके... थँक्स... मी जाईन..." त्यावर ड्राईव्ह करत असलेले काका... - "अरे, डोन्ट बी फॉर्मल... या, मी सोडतो... ! " जास्त आढेवेढे घेण्यात अर्थ नाही, हे समजून मी गाडीत जाऊन बसलो... "थँ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गुरुदक्षिणा निधी

फेसबुकवर आणि अन्य समाजमाध्यमांत सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गुरुदक्षिणा निधी याबाबत प्रश्न विचारणारी पुढील पोस्ट फिरत आहे. अनेक ज्येष्ठ मंडळींना हा प्रश्न पडला असल्याने त्याचे उत्तर. धन्यवाद. (ता. क. - 'कशावरही विश्वास ठेवायचाच नाही' या वृत्तीच्या लोकांनी कमेंट वगैरे करून वेळ वाया घालवू नये) एक प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गुरुपौर्णिमेला संघध्वजासमोर गुरु दक्षिणा ठेवायची पद्धत आहे. दहा रूपयांपासून दहा लाखांपर्यत कितीही रक्कम रोख स्वरूपात गुरुदक्षिणा म्हणून ठेवली जाते. देशभर कोट्यवधी जमणार्या या रकमेची कधीही पावती दिली जात नाही. त्यावर संघाने कधी करही भरलेला नाही. मग हे धन काळे म्हणायचे की, धवल? या प्रश्नाचे उत्तर- संघाच्या गुरुदक्षिणेत जमा झालेली सर्व रक्कम शाखेच्या बँक खात्यात जमा केली जाते. सर्व खर्च त्याच निधीतून केले जातात. या सर्व खर्चाचा सर्व तपशील व्यवस्थित ठेवला जातो. बँक अकाऊंट स्टेटमेंट्स असतात. वेळोवेळी सर्व खर्चाचे ऑडिट होत असते. संघाच्या नित्य कामाच्या खर्चासाठी गुरुदक्षिणेव्यतिरिक्त अन्य कोणताही निधी घेतला जात नाही. मोठया कार्यक्रम ख...

Modi - Waghela And Courtesy

Image
नक्की थोडा वेळ काढुन वाचाच... 1990 ची घटना.. आसामहुन दोन मैञिणी रेल्वे भरती करिता गुजरातला निघाल्या. वाटेत एका स्टेशनवर गाडी बदलुन पुढील प्रवास त्यांना करायचा होता . ठरल्याप्रमाणे त्यांचा प्रवास सुरु झाला खरा पण पहिल्या प्रवासात काही मुलांनी त्यांची छेडछेाड केली त्यामुळे पुढील प्रवास तरी सुकर व्हावा म्हणुन देवाची प्रार्थना करतच त्या स्टेशनवर उतरल्या आणि धावत जाऊन रिझरवेशन चार्ट पाहु लागल्या. तो पाहुन त्या दोघींच डोकच चक्ररावल. कारण तो चार्ट त्यांची तिकिटे कन्फर्म नाहीत अस दाखवत होता व प्रवास तर राञीचा होत. न राहुन त्यांनी जवळच उभ्या असलेल्या TC ला जागा मिळुन देण्याची विनंती केली. TC नी देखील गाडी आली की पाहु अस म्हणुन त्यांची बोलवण केली. एकमेकींना धीर देत त्या गाडीची वाट पाहु लागल्या . शेवटी एकदाची गाडी आली तश्या दोघीजणी कश्याबश्या डब्यात चढल्या व एका सीटवर विसावल्या आणि समोर पाहता तो काय , समोर दोन तरुण बसले होते . मागच्या प्रवासातला अनुभवाची आठवण येऊ नाही म्हणल तरी सारखी येत होती . पण त्या सिटवर बसण्या शिवाय दुसरा पर्याय ही नव्हता . कारण डब्यात कुठेच जागा नव्हती. ...

RSS NEW UNIFORM

Image
जेव्हा अर्धी चड्डी होती तेव्हाही अभिमान होता... आताही आहेच... हे नाविन्य स्विकारण्यासाठी आम्ही उत्सूक आहोत. . फुरोगामी अर्ध्या चड्डीचे म्हणून डिचवायचे तेव्हा वास्तविक त्यांच्यातला मत्सर आणि असूया बाहेर पडायची. कारण इतका आकर्षक गणवेश इच्छा असूनही त्यांना घालता येत नव्हता. आता तर ते पण गेलं... डिचवण्याची एक संधी संपली. (अर्थात तेव्हा आम्ही डिचवले जात नसू, कारण संघाचा गणवेश घालता येणं भाग्याचं लक्षण आहे) . संघ काळानूसार बदलतो. . खुलासा नवीन गणवेशात पॅन्टचा रंग "ब्राऊन - तपकीरी" झालाय. काळा किंवा निळा ऐकीवात नाही.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved