#भाकरीबाई
रामतिर्थकर बाईचं स्टेटमेंट बीबीसी मराठीने जरी तोडून मोडून दाखवलं असलं तरीही ती बाई कुठल्या लेव्हलची चंपक आहे हे एव्हाना महाराष्ट्रातल्या घराघरात पोहचलंय... लोकं ऐकतात तर या काहीही पुड्या सोडतात... फुल्ल कॉन्फीडन्सनं...! परवा असं झालं... परवा तसं झालं... परवा सोलापूरला गेले होते - तिथे दारूच्या दुकानाबाहेर बायांची रांग होती, त्यात २१ बाया विशिष्ठ समाजाच्या होत्या - .... काहीही फेकतात...! ... २०१० मध्ये या बाईचं नव्याने प्रस्थ फुललं होतं... त्यांना ब्राह्मण वधू-वर मेळाव्याला बोलावलं - बाई आल्या... "मी तुमची आई" म्हणून एका वाक्यात आई झाल्या... समोर बसलेल्या मुलींवर सुरु झाल्या...! करीयर चुलीत घाला, फिरणं बंद करा, हे करा - ते करा... बाई मोठ्या मोठ्या द्यायच्या - माणसांना मज्जा वाटायची... एका लेव्हल नंतर तिथे आलेल्या पोरींनी धिंगाणा सुरू केला... कार्यक्रम ठिकाणावर, नसतं प्रकरण उद्भवलं होतं... झक मारली आणि ही बाई बोलावली असं झालेलं... ... सासू सून, नवरा बायको यांच्यात भांडणं लावायची, त्यात सुनेला - बायकोला घरात बसवून पायाशी ठेवायची अक्कल शिकवायची, आणि एका घरात ठिणगी...