Posts

Showing posts with the label Fun

Biopic

कुठलाही मराठी सिनेमा स्पेशली बायोपीक फार फार एक किंवा दोन आठवडे सत्तर एम एम वर असतो, तिथे लाज काढून झाली कि झी टॉकीज प्रीमिअरच्या नावाखाली आठवड्यात दोन वेळा स्वतःला कानफाडून घेत असतो - त्यामुळे अकाउंटमधले पाचशे रुपये वळवळ करत नसतील तर दोन आठवडे थांबा आणि फुकटात घरबसल्या बघा... कारण - पाचशे रुपये खर्च करुन काहीतरी पदरात पडेल अश्या दर्जाचे कलाकार, विषय आणि सिनेमे येत नाही. सुबोध भावेनी बालगंधर्व केला, लोकमान्य केला - आता घसरून राहुल गांधी करणार बोललंय. प्रसाद ओक दिघे कमी, स्वस्तातला पुष्पा वाटतोय... झुकेगा नाही साला टाईप गद्दाराला माफी नाही वाटतंय... थोडक्यात - कास्टिंग गंडलय. .. कुठलाही बायोपीक बघून आपल्या आयुष्यात फार मोठी क्रांती होणार आहे असं नाही. कितीही सिरीयस विषय असला तरी काहीतरी किडा दिसतो आणि तो बघतांना हसू येतं... एमएसडी फक्त सिरियसली पाहिलेला, तिकीट विकत घेऊन. बाकी जवळपास सगळे सिनेमे टीव्हीवर आल्यावर किंवा वि च्या रिचार्जबरोबर हॉटस्टार फ्री मिळतं त्यावर बघितले. .. संजय राऊतांवर एखादा कॉमेडी बायोपीक निघावा. तो जबरदस्त चालेल. अमिषा पटेल समोर वाकलेले राऊत धडपडले, एनजीओप्लास्टिच्...

Lockdown Advice

लॉक डाऊनचा पहिला दिवस आहे... त्यात रविवार ! पुढे किमान १० ते १५ दिवस असेच काढायचे हे डोक्यात ठेवा - घरातल्या हिटलर समोर एखादा इकडचा तिकडचा शब्द सुटणार नाही याची काळजी घ्या, चुकूनही - अगदी चु-कू-न-ही कुठलाही पंगा घेवू नका... घाबरून घाबरून रहा...! सतर्क रहा !... ... त्यावर पुढचा लॉकडावून काळ सुसह्य राहणार की असह्य होणार हे ठरणार आहे...! ... एखादं प्रकरण अंगाशी आलं तर ते सोडवायला सरकार येणार नाही...! ... अजून सुसह्य करण्याची ट्रिक सांगू ? घरातलं एखादं काम हाताशी घ्या, आणि आपली कीव येईपर्यंत तेच तेच काम करा... उदा. जाळं काढा, भांडी घासा... थोडंच करायचं - पण स्लो मोशन मध्ये करायचं, दाखवून दाखवून करायचं...! खुप केलं असं वाटायला हवं ...! दोन-अडीच तास त्यात इन्व्हेस्ट करायचे... कीव येईपर्यंत...! या दोन तासांच्या इन्वेस्टमेंटवर पुढचे पंधरा दिवस राजा सारखं राहता येईल ! .. (काय केलं याचे फोटो टाकू नका, आपलं सुसह्य करण्याच्या नादात दुसऱ्याचं असह्य करू नका ! .... आणि... . . थँक यू वगैरे म्हणायची गरज नाही... खुश रहो !...) ... - तेजस कुळकर्णी

Shivsena Chale

निष्पाप उधोजीराजेंनी शपथ न घेता कपटी यवन फडणवीसने शपथ घेतलेली पाहून  हा दगाफटका सहन न झाल्यामुळे यवतमाळच्या एका शिवसैनिकाने आत्महत्या वैग्रे करण्याचा प्रयत्न केला. ...

ती आणि मी

आमच्यातलं सगळं आलबेल असण्याची खूण म्हणजे "ए आहो" बोलणं... बायको माहेरी गेल्यावर फोनवर तो एकच शब्द हजार शब्दांचा धीर देतो... एकाच शब्दात एकुण सिच्यूएशनचा अंदाज येतो...! .. पूर्वी पत्र लिहीतांना वर श्री लिहायचे, त्यातच सगळं सुखरुप असल्याचं समजायचं... श्री नसेल तर घरातल्या बाया शेजारच्या चार बाया गोळा करुन कुणाची काय खबर हे न बघताच गळे काढणं सुरु करायच्या,  ... तसंच, फोन वर "ऐ आहो" ऐकलं नाही की पुढे नक्की काय वाढून ठेवलंय या विचाराने हार्डची धडधड एक्स्प्रेसच्या स्पीडनं डबल होते, आणि अंधारात तीर मारत, सावधपणे आपल्या कर्माची एक एक गोष्ट आठवून अंदाज घेणं सुरु होतं... कारण सापडलं तर ठीक, नसेल तर पॅराशूट मध्येच अडकून गेल्याची फिलीँग येते, आणि ती आपल्याला भलत्याच पद्धतीने टोलवत राहते...! ... टिप : कधी अश्या परिस्थितीत अडकलात तर चुकूनही आपल्या चुकांची गिणती बायकोसमोर करु नका... अंदाज घ्या... कारण काहीवेळा भलतंच असतं, देणं ना घेणं आपलं स्वत:च्या हाताने ओढवलं जातं.

"बाप्पाला निरोप"

"बाप्पाला निरोप" हि कंन्सेप्ट मूळातच वाह्यात आहे. त्यात ते रडणं बिडणं तर अति होतं... सूतक पडल्यासारखं तोँड पाडून बसायचं काय, रडायचं काय... अति भक्ती दाखवण्याचे प्रकार आहेत हे ! . आज फक्त दहा दिवसांचा गणेशोत्सव संपतो ! गणपती बाप्पा पृथ्वीतलावरुन पुन्हा वर्षभरासाठी निघून जातात वगैरे असं काहीही नसतं. मूळात उत्पत्ती-स्थिती-लय या तिन्ही अवस्थांचं मूळ जिथे आहे त्यांना पृथ्वीवरुन घालवणारे आपण कोण ? मूलाधार चक्रात, चराचरात, ध्यान्यात, देव्हाऱ्‍यातही ते आहेत ! . गणेशोत्सवाच्या आधी ते पार्वती लहान गणपतीला खाऊ वगैरे भरुन देते, गणपती भावूक होतात वगैरे व्हॉटस्अॅपच्या शोधानंतरचे चाळे आहेत. कामधंदा नसलेल्या कवीँचे. आता उद्यापासून पार्वती विचारणार की काय केलं बाळा पृथ्वीवर दहा दिवस ? चे मेसेजेस सुरु होतात. . ते एखाद्या लग्नात बिदाईच्या वेळी ज्याचं देणं न घेणं तो रडायला लागतो, कारण तसंच वातावरण तयार होतं. सेम तेच लोकांनी आजच्या दिवसाचं केलंय.... गणपती चालले, आता वर्षभरानेच भेटणार... काहीँना कसलंच नसतं - उद्यापासून पार्टी-शार्टी सुरु करण्यासाठी ते मनात पक्क हेच ठरवतात. उद्यापासून वर्षभर ऐ न च...

= संडे ज्ञान =

Image
आपल्या आजुबाजुचे लोक - नातेवाईक, ओळखीपाळखीचे आणि तत्सम टाईप लोक्स... . यात दर ३ मागे १ व्यक्ती नग टाईप असतो... तोँडावर इतकं गोड बोलतात, वाटतं - आता आपले पाय धुवून पाणी पितात की काय... तेच आपल्या मागे आपल्याबद्दल गॉसीपीँग, त्रागा, याने अस्संच केलं, तस्संच केलं बडबड... आणि आपलं वाईट कसं होतं हे पाहत किँवा ते करुन आनंद मिळवण्यात त्यांची जय असते... अशी उपद्रवी टाळकी मॅक्स आपल्या विरुद्ध गृप्स करुन राहतात... . बऱ्‍याचदा अश्या टोळक्यांचा उपद्रव आपल्याला कळत असतो... पण आपल्याला कळतंय हे त्यांना कळलेलं नसतं... त्यामूळे त्यांच्याशी वागण्यात आपण जरासं टाईट केलं तरी त्यांचं गडबडतं... . बायकोनं विचारलं... ए आहो, हाऊ टू डिल विथ धिस काईँड ऑफ पिपल्स ? टेँशन नाट - याद रखीयो - १. गॉसीपीँग करणारे जळतात, कारण त्यांचं स्टॅँडर्ड (वैचारिक, शैक्षणिक) आपल्या लेव्हलचं नसतं... २. आपल्या बद्दल गॉसीप्स, म्हणजेच आपल्याला महत्व आहे. ३. टोळके जमवून आपल्याबद्दल बोलतात, म्हणजे आपण एकटेच त्या टोळक्याला भारी पडलोय. ४. महत्वाचं - ते लोक्स आपल्याला जेवायला देत नाहीत. सो यूनिवर्सल मूलमंत्र- लेट देम गो टू द हेल ! बी हॅप्पी...

व्यवसायात भेटणारे नग

. ओळखीचं कुटूंब एका कौटूंबिक सोहळ्यात भेटलं... त्यातल्या काकांशी ओळख तशी जुनी. काकू पहिल्यांदाच भेटल्या. त्यांचा एक मुलगा आहे, माझ्यापेक्षा वयाने १० वर्ष मोठा. ज्याने काहीतरी प्रोजेक्ट केलाय...! असा एकूण बॅकग्राऊंड - आता काकू आणि त्यांचा मुलगा "नग" कसे झाले याची ही कहाणी. . कौटूंबिक सोहळ्यात भेटल्यावर कसं काय याची विचारपूस झाली आणि काकूंनी त्यांच्या मुलाची ओळख सांगितली. त्याने कुठलातरी ग्राफीक्स मध्ये प्रोजेक्ट केलाय... तो मुलगा त्यावेळी तिथे नव्हता. त्याला स्टार्टअप करायचंय, आणि अॅज अ इस्टॅब्लीश्ड् सेटअप तू त्याला मदत कर - इति काकू. व्यवसाय, शिक्षण किँवा नोकरी यासाठी ज्याला मदत हवी त्याला माझ्याकडून शक्य ती (आर्थिक : क्षमस्व) मदत करायचा मी प्रयत्न करतो. त्यात कधी कधी चांगले प्रोजेक्टस मलाही मिळतात - अर्थातच व्यवसायिक फायदा होतो. प्रामाणिक मदत करतो, बाकी ज्याचं त्याचं तो जाणे. . तर, काकूंनी त्यांच्या मुलाला मदत करण्याबद्दल सांगितलं... मी त्या धावपळीत माझं कार्ड दिलं. आणि त्याला फोन करायला सांगा, किँवा मुंबईला ऑफीसला पाठवा म्हणून बोललो. . दोन दिवस गेले, काकूंचा फोन आला. - मी ...

उंगली टेढी

Image
= उंगली टेढी = . धुळे टू मुंबई असं स्लीपर गाडीचं तिकीट कालच्या प्रवासासाठी मी परवा सकाळीच पोर्टल वरुन बुक केलं... कन्फर्मेशन मेसेज आला. रिटर्न तिकीटाच्या भरवश्यावर मी ट्रिप प्लान केली... धुळ्यात आलो...! काम झालं की रात्री परत मुंबईला जाता येईल अशी तयारी केली... आणि काल सकाळी आठ वाजताच त्या पोर्टलचा गाडी कॅन्सल झाल्याचा आणि १००% रिफंड झाल्याचा मेसेज आला... व्यवहार संपला ! दुसरी गाडी थोड्यावेळात बघू म्हणून ते बाजूला ठेवलं. . नऊ-साडेनऊला ट्रॅवल्सच्या ऑफीसमधून फोन आला. - "सर, ती गाडी कॅन्सल झालीय, तर आम्ही तुम्हाला दुसऱ्‍या गाडीत शिफ्ट करु कां ?" - चालेल. पण गाडी कोणती आहे ? - सिटीँग आहे... - आणि चार्जेस ? - आधीच्या गाडीइतकेच... ७०० ! - पण ही सिटीँग आहे ना ? - हो. पण चार्जेस सेम आहेत. - मग नको. माझं बुकीँग कॅन्सल करा. मी दुसऱ्‍या स्लीपर गाडीनं जाईल... सिटीँगला नको. - ठिक आहे. विषय संपला. पावसाच्या बातम्या आणि गाड्यांना गर्दी असल्याने मी पण कालचं जाणं कॅन्सल केलं. . सकाळीच प्रकरणाचा निकाल लावल्यानंतरही काल संध्याकाळ पर्यँत त्यांच्या बुकीँग कन्फर्म - बुकीँग कॅन्सलच्या मेसेजेसचे आप...

औपचारिकता

घरातल्या घरात औपचारिकता ठेवणाऱ्‍यांची मला अति किळस येते... . टेबलवर जेवायला बसले कि भाषण ठोकून चियर्स न बियर्स, चुलत आते मामे मावस भावंड एकत्र आले की डान्स बसवणार, ड्रामा प्ले करणार - घरी वर्षभरातनं भेटल्यावर गेट टू गेदरला गेम्स, गाणी प्लान करणार... लग्नातल्या स्टेजवर गाणी, कविता, डान्स वगैरे करणार... ... किँवा घरातल्या घरात योजना राबवणार, नवरा बायकोला मॅडम बायको नवऱ्‍याला सर म्हणणार, पोरांना घरातल्या घरातल्या नियम-बियम देणार - . मी अश्या कार्यक्रमांना आणि अश्या लोकांकडे जाणं टाळतो. घुसमट होते. . घरात घरासारखंच रहावं. घरी सुद्धा औपचारिकता ठेवावी लागली तर ते घर कसलं - ते तर डोँबल ! गेट टू गेदरला मस्त गप्पा कराव्या, खावं, मस्ती करावी... . अशी एखादी जागा तर ठेवा गड्याहो जिथे हातपाय पसरुन मनासारखं बसता येईल.

CCTV

घरी बायको असतांना सीसीटीव्हीची गरज पडत नाही - जागरुक रहावंच लागतं ... ती दोन कप चहा पितांना, ओला टॉवेल चुकून बेडवर ठेवला तर, थोडाफार पसारा झाला तर, कप फुटल्यावर, सोफ्यावरच कव्हर विस्कटलं तर - फुस्स्स करुन नारद मुनी प्रकट होतात तसं कुठूनही प्रकट होते... आणि, ..... .... ... .. . पुढचा अर्धा पाऊण तास फैलावर घेते - ... त्यामुळे मी हल्ली घाबरून घाबरून राहतो... ! ..

बारावीचा निकाल आणि सिट नंबर ...

एखाद्याला किती टक्के मिळाले, पास कि नापास याची गरजेपेक्षा जास्त उत्सुकता दूरच्या / जवळच्या नातेवाईकांना असते... यात काळजी, कौतूक कमी तर फुकट सल्ले वजा प्रवचन देण्याची मळम...

Caller Tune

जियो फोनवर फुकट कॉलर ट्यून असते म्हणून लहान असल्यापासूनचं मोस्ट फेवरेट सॉंग "ससा तो ससा की कापूस जसा" सेट केलं... !! ... बायकोच्या भावाने नेमका त्याच नंबरवर फोन केला, बालगीताचा ...

लग्नानंतरची १५ दिवसातली निरीक्षणं...

लग्नानंतरची १५ दिवसातली निरीक्षणं... १. तुम्ही शक्य तितकं "ध्यान" किंवा बावळट दिसावं याची ती काळजी घेते... गेल्या १५ दिवसापर्यंत मी ज्या ड्रेसमध्ये हॅन्डसम दिसत होतो, तो ड्र...

Angry Cab Driver and Salmaan Khan

वर्षभरापूर्वी दिवाळी/ईद/सलमानची केस हिअरींग असं काहीतरी होतं, काय ते नेमकं आठवत नाही, पण मुंबईत सलमान खानच्या गॅलक्सी समोर गर्दी होती... इतकी मरणाची गर्दी की तिथून गाड्या ...

मला भेटलेले नग : १

तीन महीने काम केल्यानंतर काय डोकं फिरलं माहित नाही, एक मुलगा काम सोडून गेला... जातांना राजीनामा व्हॉटस् अॅप वर पाठवला... तो पण सेंटी ... पे रोल वर असलेला माणूस.. अचानक काय झालं ? तर त...

सना-त-न

करमत नव्हतं... उदास, एकटं वाटत होतं सकाळपासून ... ! मग मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सनातनच्या परमपूज्य संत अपर्णाताई रामतिर्थकरांच्या अद्भूत भाषणाचे व्हिडीयो यूट...

डोलची : धुळ्यातली होळी

Image
धुळ्यात होळी म्हणजे प्रेमानं ऑ ऑ करुन चेष्टेनं रंग लावणं नसतं ... इथल्या लोकांत सुप्त / उपजत आडदांडपणा असतो. जो होळीला उफाळून येतो... ! .. धुळ्यात पिचकारीनं नाही - डोलचीने होळी खे...

Diamond Set and Saree

प्रसंग १ : स्थळ : घरी पात्र : मी आणि आई... मी मुंबईहून सकाळीच आलो, चहा घेता घेता - मातोश्रींनी स्वतःच्याच दुकानातून चार - पाच साड्या आणलेल्या. त्यापैकी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी क...

बारावीचा निकाल and Me

Image
२५ मे २०१० चा भयंकर दिवस जसा जाहीर झाला, डोळ्यासमोर दिवसा तारे चमकत होते... आधीच्या तीन रात्री झोपही नव्हती... २४ नंतर २५ला दुपारी १ पर्यंत धssडधssड...धssडधssड... थाऱ्यावरच नव्हतं... आपण लाख चांगलं लिहीलंय, पण भणकेल एक्झामिनरनं त्याच्या बायकोशी भांडून तो राग आपल्याच एखाद्या पेपरवर काढला असेल तर ? ... ते ... मला जर सूपरपॉवर असती तर मी त्या रिजल्टमध्ये घुसून  तो ९९.९९ टक्के केला असता वगैरे मारामारी मनात सुरु होती ... त्या वर्षी आमच्या अख्ख्या घराण्यात हेच एकमेव शिंगरू बारावीला... त्यात लार्जर दॅन लाईफ इमेज... चुकून माकून एखाद्या विषयात गचकलो तर... ?  सगळे नातेवाईक मिळून पूजा घालतील... छातीत धस्स्स... नको नको... calm down tejaaa.... be positive...  रिजल्टसे डर नही लगता साब... नातेवाईकसे लगता है...  टाईप गोंधळ सुरू होता... ... कारणही होतं... क्लास लावला नाही म्हणून शेवटच्या दिवसापर्यंत इंटरनलनं फाईल्स साईन करायला नाटकं केली... प्रॅक्टीकल एक्झामला कुरापती काढून वाद घातला... रागात मी अटेंडन्स साईन करुन निघून गेलो... आणि सगळ्यांसमोर धुंदीत - प्रॅक्टीकलचे मार्क नाह...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved