हायड्रोक्सीक्लोरोक्वीन - द बिगेस्ट ड्रामा (साभार : सोर्स - अज्ञात )
हायड्रोक्सीक्लोरोक्वीन - द बिगेस्ट ड्रामा काही दिवसांपूर्वी ट्रम्प तात्या यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधासाठी भारताला धमकी दिली आणि भारताने घाबरून लगेच औषध सप्लाय केले अशा बातम्या आल्या होत्या. खरेतर तात्यांनी धमकी दिलीच नव्हती, पूर्ण प्रेस कॉन्फरन्स न पाहता फक्त तेवढी क्लिप पाहील्याने आपल्याकडे लगेच त्यांनी धमकी दिल्याचा आणि त्या धमकीमुळे 56 इंची छाती फाटल्याचा उद्धार झाला होता. आपल्याकडे मूर्ख बनवायला पूर्ण व्हिडिओतून कट केलेला एक तुकडा दाखविणे पुरते. म्हणून ट्रम्पची धमकी असो की आलू बनाने की मशीन, या व्हिडीओजद्वारे दुसऱ्याला मूर्ख समजणारांना हेच कळत नाही की मूर्ख ते स्वतःच बनले आहेत. असो, तर हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा भारत हा सर्वात मोठा सप्लायर असल्याने कोविड-19साठी (त्याला करोना म्हणू तेच बरे वाटते) भारत हा जगाचा आधारस्तंभ ठरला. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे अतिशय स्वस्त औषध आहे, त्यामुळे ते जर करोनावर प्रभावी ठरले तर सगळ्या जगासाठी ते एक वरदान ठरणार होते. पण जे जगासाठी वरदान ठरते ते अनेक फार्मसी कंपन्यांसाठी शाप ठरू शकते. कारण जर समजा हायड्रोक्सीक्लोरोक्वीन करोना...