लॉरेल अॅन्ड हार्डी - भाग २
आपल्या कॉमेडीने अख्ख्या जगाला गेलं शतकभर खळखळून हसवणाऱ्या लॉरेल अॅन्ड हार्डी या जोडीचा पहिला मूकपट होता द लकी डॉग... जो १९२१ मध्ये रिलीज झाला. एक कुत्रा, ज्यावर लॉरेलचं जीवापाड प्रेम असतं. आणि तो त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींत सांभाळत असतो. पण यामूळे बिचाऱ्या हार्डीची पंचाईत होते. हार्डी कुत्र्यांना प्रचंड घाबरायचा त्यामूळे फार वेगळा अभिनय करायची गरज वाटली नाही. पण लॉरेल इतर वेळी सुद्धा हार्डीवर कुत्र सोडून त्याची फजिती करायचा. . अगदी कमी वेळेचा हा मूकपट प्रचंड चालला. आणि प्रेक्षकांनी या जोडीला डोक्यावर घेतलं. पण १९२१ नंतर तब्बल ५ वर्ष ही जोडी अज्ञातवासात गेली. आणि १९२६ मध्ये जाड्या हार्डी आणि रड्या लॉरेल पून्हा अवतरले ते "द ४५ मिनटस् फ्रॉम हॉलीवूड" मध्ये. "द ४५ मिनटस् फ्रॉम हॉलीवूड" हा हेल रिच या दिग्दर्शकाचा चित्रपट. हॉलीवूड चित्रपट बनवायची प्रोसेस लॉरेल अॅन्ड हार्डी करणार... त्यातून निर्माण झालेला प्रचंड गमतीशीर कल्लोळ या चित्रपटात होता. हाच चित्रपट, जिथे लॉरेल अॅन्ड हार्डी खऱ्या अर्थाने सुरु होतात. हेल रिचने नंतर त्यांच्याबरोबर हेल रिच स्टूडीयो स्थापन केला ...