Posts

Showing posts with the label TKGOI

TK Prosperity Private Limited

Image
२९ मे २०२०... २०१५ शेवटापर्यंत एका मराठी न्यूज चॅनेलमध्ये टाईमपास करत होतो... दुसरीकडे पुण्यात MCA सुरु होतं...! मास्टर्स पुर्ण झालं आणि मी माझ्या मूळ ट्रॅकवर आलो... म्हणजे टेक्नॉलॉजी बेस्ड !... छोटे छोटे प्रोजेक्ट घेणं सुरु होतं... कॉलेजमध्ये कॅम्पस होत होते... फ्लो विथ् फ्लो सारखं सगळे देतात तसं इंटरव्ह्यू सेशन्सही सुरु होते... ... मनात आयुष्यासाठी विशलिस्ट असते - भविष्यात उद्योग उभा करायचाय असं माझ्या विशलिस्ट मध्ये होतं - फेसबुकवर Quotations मध्ये "चांगल्या पगाराची नोकरी करणारा होण्यापेक्षा, चांगल्या पगाराची नोकरी देणारा होईल" हे वाक्य खुप आधीपासून आहे...  MCA होतांना ती इच्छा प्रखर होत होती, आणि त्या इच्छेला त्या दरम्यान हवा मिळाली -  इच्छा म्हणजे एक गोल सेट झालं...! हवा मिळण्याची स्टोरी भन्नाट आहे...  एक मराठी सिनेमा आहे : वन रुम किचन. भरत जाधवचा... त्यात भरत जाधव एका मिलमध्ये काम करतो... चाळीत राहतो... एकदा तो आणि त्याची बायको बायकोच्या मैत्रिणीला भेटायला जातात ... मोठ्ठी सोसायटी, जबरदस्त फ्लॅट... तिथे त्या मैत्रिणीचा नवरा राजेश श्रृंगारपूरे त

Open For Business

Image
#OpenForBusiness ... Background : कोरोनाची चाहूल लागताच १३ मार्चलाच आम्ही मुंबई आणि पुणे दोन्ही ऑफीसला वर्क फ्रॉम होमचं नोटीफीकेशन काढलं, दोन दिवसात सगळी सिस्टीम उभारली... आणि १५ नंतर १९ पर्यंतच्या काळात मुंबई-मुंबई उपनगर-ठाणे-पुणे बाहेरच्या असणाऱ्या स्टाफला फॉर सेफसाईड गावाकडे पाठवलं... दरम्यान २२ पासून ट्रेन्स, बस, डोमेस्टिक फ्लाय सगळं बंद झालं... लॉकडाऊन लागलं... आम्ही १३ पासूनच तयारी केल्याने आमची सेफसाईड स्टेप योग्य ठरली... अपेक्षित होतं की फार झालं तर १५ एप्रिल पर्यंत सगळं आवरलं जाणार... आणि महिनाभराचा बॅकलॉग पुढे दिड महिन्यांत सहज भरून येईल... ! पण परिस्थिती हाताबाहेर गेली... मुंबई - पुण्यात कहर झाला... त्यामुळे आता सगळं इतक्यात सुरु होईल असं वाटत नाही... (Off the record : किमान ३१ जुलै पर्यंत सगळं  सुरळीत होईल असं वाटत नाहीय... त्यानंतरही उभं राहतांना दिवाळी उजाडेल...) वर्क फ्रॉम होम मूळे प्रॉडक्टीविटी निम्म्यावर येते, पेमेंट टर्मस् ९० दिवस - त्यामूळे हे पेमेंटही जुलैत मिळेल... आणि सध्या प्रत्येक कंपनी कठीण काळातून जात असल्याने आधीच्या इनव्हॉईस क्लियर होत नाहीय...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved