Posts

Showing posts with the label Philosophy

गुरुपोर्णीमा २०२०

Image
आस्तीक-नास्तीकच्या गोंधळा पलीकडे, तर्कविज्ञान आणि शास्त्र यातल्या रेषा बोथट झाल्यानंतर एक गोष्ट पटलीय, ती म्हणजे गुरुंशिवाय आयुष्याला अर्थ नाही...! भवसागरात आयुष्याची नौका हिंदोळे घेते, वादळं सहन करते, पण भरकटत नाही, खडकावर आपटून फुटत नाही - गुरु त्या नौकेला पार लावतात... मार्ग दाखवतात, फक्त विश्वास असावा...! तिथे तर्क चालत नाही, शास्त्राचे नियम चालत नाही, मोजमाप तर नाहीच नाही...! हा मार्ग तर्काचा नाही, अनुभवांचा, आणि अनुभूतीचा आहे...!  ... गुरुस्थान अशी एक जागा आहे जिथे आपल्या मनातला प्रश्न सहज मांडता येईल, उत्तर मिळेल याची खात्री असेल, ते आपल्याला चुकू देणार नाही याची माहिती असेल, आपण आपल्या कर्मानं चुक केली तर तडाखा बसेल याची भिती असते. ती शक्ती आपल्यावर सदैव लक्ष ठेवून आहे ही जाणीव आणि आपल्याकडे सदैव लक्ष ठेवून आहे हा विश्वास असतो...! "मी" पणाचा फसवेपणा त्यांच्यासमोर क्षणार्धात गळून पडतो - खरं तर "मी" असा उरतच नाही, एकरूपता येते... मोक्ष मिळाल्यानंतर निर्विकार मन होत असावं, गुरुसानिध्य त्या निर्विकार, एकरुप मनाची जाणीव करून देतं...! ... आ...

Sushant...

चार पैसे कमी मिळाले चालतील, ग्लॅमर नसलं तरी चालेल, फार यशही मिळालं नाही तरी चालेल... पण आयुष्य समाधानी आणि शांत असावं...! पुर्ण असावं ...! ... आयुष्यात कुठल्याही टप्प्यावरुन परत फिरता येईल असा एक बेसकॅम्प असावा... कुठेही जाणवलं की शक्ती संपलीय, बिनधास्त परत फिरुन नव्याने सुरुवात करावी... जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपलं आयुष्य आपलं असतं...! ... पैसा आणि ग्लॅमर आपली काळी बाजू सोबत घेवून येतो... मुंबईच्या लाईम लाईटमध्ये एक म्हण आहे - "बम्बई जमनी चाहीये...!..." ती जमली तो टिकला - नाही तो हरवला...! प्रसिद्धी - हवा आणि पैसा डोक्यात जायला नको... टिकवता यायला हवं,  जरी गेलं तरी स्विकारण्याची तयारी हवी...! ... सुशांत सिंह राजपूत इथेच हरवला... बम्बई जमलीच नाही...  बेसकॅम्प नसेल कदाचित...! म्हणून आत्महत्या हा शेवटचा पर्याय स्विकारला... कारण हजार मिळतील, पण रिजल्ट एकच : चांगला अभिनेता गेला ... एमएसडीची स्टोरी याच्यामूळे जबरा झालेली... अजरामर म्हणा ...! पुढेही तगडे हिटस् दिले असते, पण तो कोसळण्याचा काळा क्षण सांभाळू शकला नाही ! ... प...

Thought of Cities

दहा-दहा लाखाची अवाढव्य महानगरं नाही - ना हजाराचं एकदमच छोटं खेडं... एक लाख लोकांच्या लहान शहरात राहणारा माणूस आज एकदम सुखी आहे. त्याला ना महानगराची धावपळ, ना खेड्याची गैरसोय - जे जेवढं हवं तेवढं, वेळेवर - व्यवस्थित मिळतं ... सामुहीक संकटाची झळ सुद्धा कमी पोहचते ! - ओव्हरऑल मज्जानू शहरी लाईफ !  पोटार्थी लोकांची स्वार्थी गर्दी म्हणजे महानगर, ही लहान शहरं म्हणजे सुखवस्तू कुटूंब म्हणता येईल. महानगरातली लोकं एरव्ही त्याला डाऊनक्लास म्हणत असू, पण आज तीच माणसं आपली किव करताय...!

#भाकरीबाई

Image
रामतिर्थकर बाईचं स्टेटमेंट बीबीसी मराठीने जरी तोडून मोडून दाखवलं असलं तरीही ती बाई कुठल्या लेव्हलची चंपक आहे हे एव्हाना महाराष्ट्रातल्या घराघरात पोहचलंय... लोकं ऐकतात तर या काहीही पुड्या सोडतात... फुल्ल कॉन्फीडन्सनं...! परवा असं झालं... परवा तसं झालं... परवा सोलापूरला गेले होते - तिथे दारूच्या दुकानाबाहेर बायांची रांग होती, त्यात २१ बाया विशिष्ठ समाजाच्या होत्या - .... काहीही फेकतात...! ... २०१० मध्ये या बाईचं नव्याने प्रस्थ फुललं होतं... त्यांना ब्राह्मण वधू-वर मेळाव्याला बोलावलं - बाई आल्या... "मी तुमची आई" म्हणून एका वाक्यात आई झाल्या... समोर बसलेल्या मुलींवर सुरु झाल्या...! करीयर चुलीत घाला, फिरणं बंद करा, हे करा - ते करा... बाई मोठ्या मोठ्या द्यायच्या - माणसांना मज्जा वाटायची... एका लेव्हल नंतर तिथे आलेल्या पोरींनी धिंगाणा सुरू केला... कार्यक्रम ठिकाणावर, नसतं प्रकरण उद्भवलं होतं... झक मारली आणि ही बाई बोलावली असं झालेलं... ... सासू सून, नवरा बायको यांच्यात भांडणं लावायची, त्यात सुनेला - बायकोला घरात बसवून पायाशी ठेवायची अक्कल शिकवायची, आणि एका घरात ठिणगी...

वरची रेषा मोठी करण्यासाठी खालची रेषा लहान काढावी लागते

Image
एखाद्या गोष्टीचा कंटाळा आला असेल किँवा निवड करण्यात गडबड होत असेल तर साधं आणि सोप्पं काम करावं - त्यापेक्षा वाह्यात गोष्टीचा अनूभव घ्यावा... मी अनेकदा असं ट्राय केलंय... . बायकोला गोरेगांवला आवडत नव्हतं. काही ना काही कमी वाटायचं... माझं ऑफीस अंधेरीत, आणि आधीपासून सवय वेस्टर्नची आहे त्यामूळे मी शक्यतोवर वेस्टर्नलाच राहण्याचा ट्राय करतो... मागचा पुर्ण आठवडा तिला फिरवलं... नालासोपारा, वसई रोड, विरार पर्यँत. सेँट्रल लाईनला उल्हासनगर, बदलापूर वगैरे, नवी मुंबईत पनवेल पर्यँत... आता  गोरेगांव आमच्यासाठी स्वर्ग झालंय  :-D . मी स्वत: पुणे की मुंबई अश्या निवडीत अडकलो होतो. तेव्हा एकीकडे मुंबईतल्या इंडस्ट्रीचे फोटो लावले आणि दुसरीकडे पुण्यातल्या मंडईचे... मला तिथली टिपीकल कचकच आवडत नाही. त्यामूळे मुंबईची निवड मला सहज वाटली. . करंट अकाऊंट महाराष्ट्र बॅँकेत उघडावं की नको याच्या विचारात होतो. मी एक दोनदा एसबीआय जावून आलो. आता महाराष्ट्र बॅँकेत अकाऊंट आहे. . गाडी घेवून ऑफीसला जायचं नाही... बाईकवर मस्त वाटतं. .. मनात फूटबॉल सुरु होतं... त्यामूळे रोजच्या ट्रॅकवर मुद्दाम ट्राफीकच्या वेळेला गेलो...

= संडे ज्ञान =

Image
आपल्या आजुबाजुचे लोक - नातेवाईक, ओळखीपाळखीचे आणि तत्सम टाईप लोक्स... . यात दर ३ मागे १ व्यक्ती नग टाईप असतो... तोँडावर इतकं गोड बोलतात, वाटतं - आता आपले पाय धुवून पाणी पितात की काय... तेच आपल्या मागे आपल्याबद्दल गॉसीपीँग, त्रागा, याने अस्संच केलं, तस्संच केलं बडबड... आणि आपलं वाईट कसं होतं हे पाहत किँवा ते करुन आनंद मिळवण्यात त्यांची जय असते... अशी उपद्रवी टाळकी मॅक्स आपल्या विरुद्ध गृप्स करुन राहतात... . बऱ्‍याचदा अश्या टोळक्यांचा उपद्रव आपल्याला कळत असतो... पण आपल्याला कळतंय हे त्यांना कळलेलं नसतं... त्यामूळे त्यांच्याशी वागण्यात आपण जरासं टाईट केलं तरी त्यांचं गडबडतं... . बायकोनं विचारलं... ए आहो, हाऊ टू डिल विथ धिस काईँड ऑफ पिपल्स ? टेँशन नाट - याद रखीयो - १. गॉसीपीँग करणारे जळतात, कारण त्यांचं स्टॅँडर्ड (वैचारिक, शैक्षणिक) आपल्या लेव्हलचं नसतं... २. आपल्या बद्दल गॉसीप्स, म्हणजेच आपल्याला महत्व आहे. ३. टोळके जमवून आपल्याबद्दल बोलतात, म्हणजे आपण एकटेच त्या टोळक्याला भारी पडलोय. ४. महत्वाचं - ते लोक्स आपल्याला जेवायला देत नाहीत. सो यूनिवर्सल मूलमंत्र- लेट देम गो टू द हेल ! बी हॅप्पी...

Saved Business

एका जवळच्या मित्राचा काल संध्याकाळी फोन आलेला. "तेजा, भेटूयात.. जरा महत्वाचं बोलायचंय. !"... मुंबईत एका प्रोजेक्टमध्ये भेटलेलो आम्ही... दोघेही देशस्थ... मी खान्देशातला, तो विदर्भातला... आणि जवळपास एकाच वेळी आपापल्या व्यवसायात स्टार्टअप केलेलं...! त्यामूळे एकमेकां सहाय्य उक्ती जागत आम्ही चार-पाच प्रोजेक्ट एकत्र केले... बऱ्‍यापैकी फायदा झाला... त्याची कंपनी सुद्धा हळू हळू वाढायला लागली... तीन वर्षात जितकी हवी त्यापेक्षा काही टक्के चांगलीच... . आज सकाळी तो घरी आला... चेहर प्रचंड दडपणात असलेला... उसनं हसू आणत त्याने गुड मॉर्निँग वगैरे केलं... "तेजा, सॉरी यार - खूप सकाळीच आलो घरी. थोडं महत्वाचं बोलायचंय..." एरव्ही तेजासेठ बोलत पाठीवर जोरदार फटका देत बोलणारा तो आज एकदम गरीब गाय झालेला. म्हणजे नक्कीच सिरीयस मॅटर असणार... त्याचं एका पोरीसोबत दोन वर्षाँपासून प्रकरण चालू होतं. त्यात बऱ्‍याचदा मोठी भांडणं झालेली, मी घरचं कार्य समजून सोडवलीय... त्यामूळे हा तिच्यामूळे व्यथितबिथीत झालाय कां ? आणि हो, तर आता पुन्हा दोन तास याचं देवदास ऐकावं लागणार म्हणून माझ्या चेहऱ्‍यावर प्रश्ना...

औपचारिकता

घरातल्या घरात औपचारिकता ठेवणाऱ्‍यांची मला अति किळस येते... . टेबलवर जेवायला बसले कि भाषण ठोकून चियर्स न बियर्स, चुलत आते मामे मावस भावंड एकत्र आले की डान्स बसवणार, ड्रामा प्ले करणार - घरी वर्षभरातनं भेटल्यावर गेट टू गेदरला गेम्स, गाणी प्लान करणार... लग्नातल्या स्टेजवर गाणी, कविता, डान्स वगैरे करणार... ... किँवा घरातल्या घरात योजना राबवणार, नवरा बायकोला मॅडम बायको नवऱ्‍याला सर म्हणणार, पोरांना घरातल्या घरातल्या नियम-बियम देणार - . मी अश्या कार्यक्रमांना आणि अश्या लोकांकडे जाणं टाळतो. घुसमट होते. . घरात घरासारखंच रहावं. घरी सुद्धा औपचारिकता ठेवावी लागली तर ते घर कसलं - ते तर डोँबल ! गेट टू गेदरला मस्त गप्पा कराव्या, खावं, मस्ती करावी... . अशी एखादी जागा तर ठेवा गड्याहो जिथे हातपाय पसरुन मनासारखं बसता येईल.

दिवाळीची प्रार्थना... देवा...

Image
देवा, माझ्या गरजा भागतील इतका पैसा मला दे, पण तो देतांना मी ऐतखाऊ होणार नाही हे नक्की बघ... मला मिळालेला पै न पै हा फक्त माझ्या प्रामाणिक कष्टाचाच असू दे... मला ते कष्ट करण्याची शक्ती आणि संधी दे... देवा, खूप पैसा मिळाला तरी, मी उतणार नाही, मातणार नाही ही सुबुद्धी दे, गरजवंतावर हुकूमत चालवण्याची आणि कमी पैसा असणाऱ्यांना तुच्छ लेखण्याची दुर्बुद्धी मला होवू देऊ नको... देवा, पैसा मिळवणं हे परमकर्तव्य असूनही, केवळ तो मिळवण्यासाठी मी कुटूंबापासून दूर जाईल, माझी कर्तव्य विसरेन - केवळ पैश्यांमागेच पळेन अशी धारणा माझी होवू देऊ नको - लक्ष्मी चंचल असते ही भावना माझ्यात सदैव जागृत ठेव... देवा, पैशांअभावी माझं कुठे अडणार नाही, आणि पैशांमूळे मी कुणाला नडणार नाही - इतकंच तू दे, पण पैशांमूळे माझ्यातला माणूस संपणार नाही - मी माणसाचा मशिन होणार नाही याची पदोपदी जाणीव करुन देत जा... देवा, गरजेपूरता पैसा तू देशीलच, पण मी येतांनाही रिकाम्या हाती आलो, जातांनाही रिकाम्या हातानेच जाईन - हे मला कधीही विसरू देऊ नको... देवा, मला श्रीमंत कर, पण, माझ्या हातून चार लोकांची पोटं...

चढ-उतार आणि डिल

माझा एक मित्र, पुण्यातल्या घराजवळ रहायचा, मूळ जळगावचा... एमबीए झालेला. २०१६ च्या सुरुवातीला आम्ही सोबतच स्वतंत्रपणे व्यवसाय सुरु केले. त्याने पुण्यात  अकाऊंटस् फर्म सुरु केली, एक सीए सोबत घेवून आरओसी, अकाऊंटस्, म्यूचूअल फंड सल्ला, पॅन कार्ड वगैरे कामं करायचा... नारायण पेठेत एक छोटंसं ऑफीस घेवून व्यवसाय थाटला. दरम्यान मी मुंबईत स्थायीक झाल्यामूळे आणि फार क्षदोस्ती वगैरे नसल्याने हाय-हॅलो शिवाय फार संपर्क उरला नाही...  .. एका कामासाठी पुण्यात आलो आणि अकाउंटस् बद्दलच एक काम असल्यानं मी त्याला फोन केला. काल भेटला...! सुरुवातीला बघितलं तर हा तोच का यावर विश्वास बसला नाही, कारण आधी हत्तीसारखा असणारा आता कुपोषित गाय झाला होता... "अरे काय ? तब्येत वगैरे बिघडली कां ? असा काय झालास ?, कसं सुरुय ? आणि त्याने हॉटेलमध्येच भाड भाड रडायला सुरुवात केली...! मागच्या दिड वर्षातलं अख्खं कर्मकांड ऐकवलं...  .. झालं असं -  व्यवसाय ऐन भरात असतांना एकेदिवशी त्याचा अपघात झाला... त्यात दोन महिने गेले, आणि आपसूक परीणाम व्यवसायावर झाला. दुखण्यातून सावरला, पण आर्थिक घडी बसवता त्याची...

श्यामच्या आईचं आज काय करायचं...

Image
*श्यामच्या आईचं आज काय  करायचं.......?*                         _यशोदा सदाशिव साने_  _मृत्यू २ नोव्हेंबर १९१७_  *श्यामची आई* नावाच्या प्रसिद्ध आईची स्मृतीशताब्दी २ नोव्हेंबरला सुरू झाली. कोकणातील एका गरीब कुटुंबातील महिलेची स्मृती शताब्दी महाराष्ट्र साजरी करतो  आहे. ही महिला राज्याच्या मंत्रिमंडळात नव्हती, एखाद्या मंत्र्यांची आई नव्हती किंवा एखाद्या राजघराण्यातलीसुद्धा नव्हती.    कोकणातल्या एका सामान्य कर्जबाजारी गरीब कुटुंबातील महिलेला महाराष्ट्राने १०० वर्ष लक्षात ठेवावे. तिचा साधा फोटो ही उपलब्ध नसताना तिला १०० वर्षे घरातल्या व्यक्तीसारखे पुजावे हे विलक्षण आहे.              गुरुजींची आई कोकणातल्या एका खेड्यात जन्मली आणि तिथेच संपून गेलेली. इतर भारतीय स्त्रियांसारखी माजघराच्या चुलीच्या धूरात विझून गेलेली ही आई. नवरा सासू सासरे मुले आजारपण याच विश्वात राहणारी. तरी पण महाराष्ट्राच्या भावविश्वात तीचं स्थान काय म्हणून कायम आहे? वसंत बाप...

Lesson

एखादी गोष्ट घडली, दुर्देवानं हरलो - काहीतरी गमावलं - त्रास झाला - किंवा धडपडलो ... तर नुकसान झालं असं समजू नका - त्यातून आपण लाखमोलाची गोष्ट कमावलेली असते... ... "धडा"... ! .. तो कसा घ्यायचा हे फक्त व्यक्तीसापेक्ष असतं !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved