Posts

Showing posts with the label Anubhuti

गुरुपोर्णीमा २०२०

Image
आस्तीक-नास्तीकच्या गोंधळा पलीकडे, तर्कविज्ञान आणि शास्त्र यातल्या रेषा बोथट झाल्यानंतर एक गोष्ट पटलीय, ती म्हणजे गुरुंशिवाय आयुष्याला अर्थ नाही...! भवसागरात आयुष्याची नौका हिंदोळे घेते, वादळं सहन करते, पण भरकटत नाही, खडकावर आपटून फुटत नाही - गुरु त्या नौकेला पार लावतात... मार्ग दाखवतात, फक्त विश्वास असावा...! तिथे तर्क चालत नाही, शास्त्राचे नियम चालत नाही, मोजमाप तर नाहीच नाही...! हा मार्ग तर्काचा नाही, अनुभवांचा, आणि अनुभूतीचा आहे...!  ... गुरुस्थान अशी एक जागा आहे जिथे आपल्या मनातला प्रश्न सहज मांडता येईल, उत्तर मिळेल याची खात्री असेल, ते आपल्याला चुकू देणार नाही याची माहिती असेल, आपण आपल्या कर्मानं चुक केली तर तडाखा बसेल याची भिती असते. ती शक्ती आपल्यावर सदैव लक्ष ठेवून आहे ही जाणीव आणि आपल्याकडे सदैव लक्ष ठेवून आहे हा विश्वास असतो...! "मी" पणाचा फसवेपणा त्यांच्यासमोर क्षणार्धात गळून पडतो - खरं तर "मी" असा उरतच नाही, एकरूपता येते... मोक्ष मिळाल्यानंतर निर्विकार मन होत असावं, गुरुसानिध्य त्या निर्विकार, एकरुप मनाची जाणीव करून देतं...! ... आ...

भगवद्गीता !

Image
आज गीता जयंती ...! .. भगवद्गीता... या अद्भूत ग्रंथाचा माझ्यावर प्रचंड प्रभाव आहे... माझ्या हॅन्ड बॅगमध्येच भगवद्गीतेचं मराठी - इंग्रजी अर्थासहीत असलेलं पुस्तक कायम असतं. रोज क्रमाने किमान ५ श्लोक आणि त्याचा अर्थ मराठी, इंग्रजीतून वाचण्याची, समजून घेण्याची सवय लागलीय, आणि आता सहा - सात वर्षांनी भगवद्गीतेने माझ्या मनावर आणि विचारांवर जबरदस्त पकड घेतल्याचंही जाणवतंय... प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीतेच्या अधीन राहूनच सापडणार हे मनावर पक्कं ठसलंय !  .. गीता म्हणजे कर्मकांड नाही, तर शास्त्रशुद्ध शास्त्र (Science) आहे... तुम्ही त्याचं पारायण करुन चमत्काराची अपेक्षा कराल तर हाती काहीच लागणार नाही, गीता समजण्याची - अभ्यासण्याची आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, आणि अंतिम सत्य शांतपणे समजावून देण्याची ताकद गीतेत आहे... गीतेतला प्रत्येक श्लोक दरवेळी नव्या अर्थासह समोर येतो... .. कृष्णाचं देवत्व कुठाय ? ते आहे भगवद्गीतेतल्या अठरा अध्यायात - सातशे श्लोकांत... ! कुरुक्षेत्रावर अर्जुनाला विश्वरुपदर्शन घडलं तिथेच "देव कृष्ण" जन्माला आला, भगवद्गीतेच्या रुपानं विश्वगुरु झाला आणि...

जे होतं ते चांगल्यासाठीच होतं !

''जे होतं ते चांगल्यासाठीच होतं -" गेल्या सात महिन्यांपूर्वी माझ्या कंपनीसाठी यूएसएचा एक मोठा चेन प्रोजेक्ट आम्ही मिळवला. ज्याचं एकुण कॉस्ट माझ्या कंपनीच्या अॅन्यूअल टर्नओव्हरच्या दहापट आहे... त्यात आम्ही पाच कंपनीज् आहोत, आणि माझ्याकडे तिसऱ्या स्टेपचं काम होणार. म्हणजे दुसऱ्या स्टेपचं काम झालं की ती कंपनी माझ्याकडे देणार, मी त्यात माझं काम करुन चौथ्या स्टेपच्या कंपनीकडे पाठवणार... जे काम मी करणार ते त्या प्रोजेक्टचा ४० टक्के भाग आहे...! .. माझ्या कंपनीला प्रोजेक्ट मिळाला, अॅग्रीमेंट झालं, एडवान्स मिळालं आणि आम्ही प्लानिंग केलं... त्या प्रोजेक्टसाठी एक मोठी सिस्टिम उभारणं, मशीन्स घेणं, तितकाच मोठा स्टाफ घेणं, आणि माझं आत्ताचं वर्कप्लेस त्यासाठी कमी पडणार म्हणून मोठं वर्कप्लेस घेणं आवश्यक होतं. त्यामूळे ऑफीसच्या जवळच मी नवं वर्कप्लेस बघितलं... मोठी सिस्टीम उभारण्यासाठी पुरेसा पैसा उभा करणंही गरजेचं होतं... म्हणून मी काही शेअर्स, इतर प्रोजेक्टचं च्या पेमेंटमधून आणि बिजनेस लोन करता अप्लाय केलं. .. १५ नोव्हेंबर २०१८ ला पहिलं असाईनमेंट येणार असं अपेक्षित होतं. त्य...

गुरुचरीत्र पारायण

Image
अनुष्ठानाने अनुभव येतो  आणि अनुभवाने अनुभूती... गुरुचरीत्र पारायण हा अनुभूतीचा मार्ग आहे... सात दिवस तन-मन-विचार-आचार एकरुप करुन विचारांच्या पल्याड असलेली मन:शांती मिळते... ते बळ पुढचं पुर्ण वर्षभर प्रवासासाठी कामी येतं... आपण गुरूंच्या सानिध्यान आहेत, त्यांच्यावर सोडलंय - ते सांभाळतायेत ही जाणिव राहते... .. "दत्त" या देवतेने माझी नौका भरकटू दिली नाही... काही वेळा प्रवाहाच्या उलटं चालायला लावलं, प्रसंगी वादळंही दाखवले, तडाखे देवून पैलतिरादिशेने ढकललंही... पण सांभाळून घेतलं... मार्ग दाखवला... त्या मार्गावर सद्गतीने चालण्याचं बळही दिलं... आणि ते देतांना गर्वाने फुलू दिलं नाही की संकटांनी फुटू दिलं नाही... पैसा कमवायचा ? कमव... पण मातू नको ... प्रसिद्धीच्या मागे पळ - पण उतू नको... दत्तगुरूंना गाणं खुप आवडतं - म्हणून त्यांच्यासमोर कुणीही जावून धांगडधिंगा केला तर चालणार नाही, तालात रहायचं...! .. सात दिवस - काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, लोभ या षड्रिपूंना आपोआप दूर ठेवलं जातं... स्वतःवरचं नियंत्रण जाणवतं, भक्कम होतं... परमात्मा-शक्ती यांसह एकरूपता होते आणि वाचा-वाणी-वि...

दिपःज्योती नमोस्तूते

मुंबईत या फ्लॅट आधी मी ज्या फ्लॅटमध्ये रहायचो तिथली ही गोष्ट... आता मी हल्ली एक महिन्यापूर्वीच इथे शिफ्ट केलंय. हा फ्लॅट मोठा आणि बऱ्यापैकी वरच्या मजल्यावर आहे... पण इथे सेफ ...

मी अनुभवलेले गजानन महाराज - भाग ३

Image
#अनुभूती #मी_अनुभवलेले_गजानन_महाराज - भाग ३ हाजीअली मागच्या चार वर्षांत शेगांवला जाण्यासाठी खूप मोठ्ठा गॅप पडला. अनेक अडचणी येत गेल्या. अपघात, आत्याच्या संपुर्ण कुटूंबाच...

मी अनुभवलेले गजानन महाराज - भाग २

Image
गेल्यावर्षापर्यंत आयुष्यात सगळ्यांच लेव्हलवर परीक्षा सुरु होती. साडेसातीचा अति जास्त प्रभाव पडला. कंपनी सुरु केली, पण प्रोजेक्ट नव्हते. पगार देणं दूर माझा स्वतःचा खर्...

मी अनुभवलेले गजानन महाराज - भाग १

Image
दैवी म्हणाल तर माझी गजानन महाराजांवर प्रचंड - infinite - आभाळाएवढी श्रद्धा आहे... कितीही मोठे प्रश्न असू देत ज्यांच्यापुढे गेल्यावर माझं अंतर्मन खऱ्या अर्थानं शांत होतं, शक्ती मि...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved