Posts

Showing posts with the label Days

मराठी राजभाषा दिन २०२०

#मराठीराजभाषादिन ... = मी आणि माझी मराठी = ...  "मराठी" - स्वरुप, लिपी एक असली तरीही मराठी माझी वेगळी - तुमची वेगळी आहे - प्रत्येकासाठी ती त्याची त्याची असते... आईचं जागतिक महत्व, स्वरुप जरी एक असलं तरीही आपली आई - आपलीच आई असते... आपल्यासाठीच असते... मराठीचंही तसंच आहे... भाषा प्रत्येकासाठी वेगळ्या रुपात असते, स्वरूप एक, लिपी एक पण भाषा मात्र प्रत्येकाची वेगळी असते... प्रत्येकाला उमगलेली वेगळी असते, भेटलेली वेगळी असते... आपली आपली असते...! ... हे माझ्या मराठीविषयी...! ... माझ्या आई-पप्पांनी माझ्या आयुष्यातला पहीला उत्तम निर्णय कोणता घेतला असेल ? - तर मला मराठी शाळेत घालणं... मराठी शाळेत जे मराठी वळण लागलं, ते इतर कुठेही लागलं नसतं. लहानपणी मराठीतून लिहीणं - वाचणं शिकल्याने न आणि ण, ळ आणि ल, श आणि ष, जगातला ज आणि जनावरातला ज यांतला फरक कळल्याने उच्चार स्पष्ट झाले, आणि त्यामूळेच कदाचित गाणंही जमलं... मराठीतूनच शब्दाचा योग्य अर्थासहित उच्चार होतो, आणि समोरच्यापर्यंत पोहचतो. . मातृभाषा कशाला म्हणतात ? जी आपल्या मनाची भाषा असते... आणि मनाची भाषा असल्याने...

Valentines Day 2020

Image
आमची व्हॅलेंटाईन स्टोरी - .. आमचं असं प्रपोज वगैरे झालंच नाही - एकमेकांच्या प्रेमात आहोत हे दोघांनाही पक्कं उमगलेलं होतं, ते फॉर्मली बोलायची वेळ आली नाही... डिस्कशन डिरेक्ट लग्नाची बोलणी कधी सुरु करायची यावर झालं - ... दोघांनीही घरी सांगितलं - भेट ठरली - आम्ही सगळे सेलूला गेलो - नंतर तिचे आई-पप्पा आमच्याकडे आले - लग्न ठरलं - झालं !  ... कुणाचा विरोध नाही - ना फॅमिली ड्रामा... ट्विस्ट म्हणाल तर टप्प्याटप्प्यावर थोडक्यात थोडके येत गेले, पण त्यात फार थ्रिल नव्हतं - ... लग्न झालं - संसार सुरु झाला... ती माझ्यापेक्षा वयाने २ दिवस मोठी असल्याने चिडली - रागवली तरी फार वाईट वाटत नाही... दिड वर्षात पक्का मुरलो - !  ... लग्नापासून व्हॅलेंटाईन डे रोजच साजरा होतो - डिमार्टला जावून groceries आणण्यासारखी तद्दन संसारी कामं करतांना !  आता तर एक लेकरुही हातात आलंय - तो दिवसागणिक वाढतोय -  तसं आमचं प्रेमही परिपक्व होतंय, आणि रोजचा व्हॅलेंटाईन डे सुद्धा बहरतोय - एकमेकांना समजून घेतांना.

कामगार-नवरा दिन

शॉपीँगला गेल्यावर बॅग्ज उचलणं, डिमार्टला गेल्यावर ट्रॉली ढकलणं, वरचे डब्बे काढून देणं, कितीही दमलेलं असा - "चला" म्हणल्यावर कुठलंही कारण न देता गाडीवर ड्रायव्हर होवून बसणं, आपण कोण, काय करतात याच्याशी देणंघेणं न ठेवता गिरणीत दळण आणायला जाणं, रात्री एकटीला किचन मध्ये जायची भिती वाटते म्हणून पाणी आणायला जाणं, घरात पाल दिसली तर हुसकावणं, तिचा फोन चार्जिँगला लावणं, बटाटे सोलणं, घरी असतांना तिच्या माहेरचा किँवा मैत्रीणीचा फोन आला आणि सापडत नसेल तर सापडवून हातात नेवून देणं, ईथून ते - तिचा आयटीआर भरणं, तिच्या शाळेचं अकाऊंटस् बघणं, माझ्या ऑफीसच्या स्टाफ आधी तिच्या शाळेच्या स्टाफला बोनस वगैरे वाटणं, त्यांच्या सॅलरीजचं मॅनेजमेँट करणं, तिच्या डिप्लोमा कोर्सचं सबमिशन तयार करुन देणं etc. etc. etc... . भर म्हणून, दर शनिवारी न चुकता निशा मोँजोलीकाच्या रेसिपी व्हिडीयो ऐकाव्या लागतात. टळत नाही ते ! . "नवरा हा अलिखीत कामगार असतो"... त्यामुळे आजचा दिवस कामगार दिनासह नवरा दिन म्हणूनही साजरा व्हावा...! . कामगार-नवरा दिनाच्या शुभेच्छा. - तेजस कुळकर्णी (टि.के. टेक्नॉलॉजी प्रा.ली., अं...

BJP

Image
भाजपाचा आज ३८ वा वर्धापनदिन. .. ६ एप्रिल १९८० रोजी हिंदुराष्ट्र, राष्ट्रवाद, आर्थिक उदात्तीकरण आणि मानवता या विचारधारेवर भाजपाची स्थापना झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्त, हिंदुत्वाचा पाया आणि राष्ट्रभक्त उजव्या विचारसरणीचे ऋषीतूल्य नेते हे भाजपाचे आधारस्तंभ आहेत. केवळ ३ जागांपासून सुरुवात झालेला भाजपा आज देशातला सर्वसत्ताधीश पक्ष आहे. भाजपा जगातील सर्वात मोठे राजकीय संघटन आहे. .. १९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस व तत्कालीन पंतप्रधानजवाहरलाल नेहरू ह्यांच्या कडून पाकिस्तानचे होणारे लांगुलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनस्ंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व ह्यादरम्यान निदर्शने करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरूण नेत्यांनी जनसंघाची सुत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या ल...

शिक्षक दिन

= शिक्षक दिन = ... रफूचक्कर ... अकरावी - बारावीला धुळ्यात असतांना अकरावीचं कॉलेज वगैरे सुरु झाल्यानंतर शोधमोहिम सुरु झाली क्लाससाठी... धुळ्यात भरमसाठ क्लासेस आहेत, एक-एका क्लासमध्ये शंभर स्टुडंटस् एका बॅचला, परत पीसीएमबी वेगवेगळा क्लास - असा पसारा वाढवण्यापेक्षा लहान क्लास, एकाच ठिकाणी सगळे विषय मिळावे ही इच्छा पुर्ण झाली, आणि प्रा. दि. अ. नावाचा माणूस सापडला... धुळ्यात इंदीरा गार्डन पासून थोडं पुढे गेल्यावर प्रमोद नगरच्या अलीकडे एका घराच्या आऊटहाऊसमध्ये ते क्लास घ्यायचे...! .. अॅडमिशन - ओळख वगैरे सोपस्कार पार पडले, आणि क्लास सुरु झाला... साडेचार फूटी वामनमूर्ती, सावळा वर्ण, चेहऱ्यावर हलकंसं हसू, तोंडात सिगारेट आणि खाली लूना... हा माणूस शिक्षक म्हणून जबरदस्त आहे हे पहिल्या तीन-चार दिवसातच समजलं... गणित आणि फिजीक्सवर त्यांची कमांड वर्ल्डक्लास होती... आयआयटी एंट्रन्स क्लासेसला शिकवणारा माणूस अकरावी-बारावीला शिकवतोय - गणित-फिजीक्सचा बेस त्यांनी असा केला, नंतर त्याशिवाय जगणं कठीण वाटू लागलं... Trigonometry खेळणं वाटायचं... दरम्यान मी, गणेश, मनोज, निखील आणि एक ज्यु. राज ठाकरे, बाक...

श्यामच्या आईचं आज काय करायचं...

Image
*श्यामच्या आईचं आज काय  करायचं.......?*                         _यशोदा सदाशिव साने_  _मृत्यू २ नोव्हेंबर १९१७_  *श्यामची आई* नावाच्या प्रसिद्ध आईची स्मृतीशताब्दी २ नोव्हेंबरला सुरू झाली. कोकणातील एका गरीब कुटुंबातील महिलेची स्मृती शताब्दी महाराष्ट्र साजरी करतो  आहे. ही महिला राज्याच्या मंत्रिमंडळात नव्हती, एखाद्या मंत्र्यांची आई नव्हती किंवा एखाद्या राजघराण्यातलीसुद्धा नव्हती.    कोकणातल्या एका सामान्य कर्जबाजारी गरीब कुटुंबातील महिलेला महाराष्ट्राने १०० वर्ष लक्षात ठेवावे. तिचा साधा फोटो ही उपलब्ध नसताना तिला १०० वर्षे घरातल्या व्यक्तीसारखे पुजावे हे विलक्षण आहे.              गुरुजींची आई कोकणातल्या एका खेड्यात जन्मली आणि तिथेच संपून गेलेली. इतर भारतीय स्त्रियांसारखी माजघराच्या चुलीच्या धूरात विझून गेलेली ही आई. नवरा सासू सासरे मुले आजारपण याच विश्वात राहणारी. तरी पण महाराष्ट्राच्या भावविश्वात तीचं स्थान काय म्हणून कायम आहे? वसंत बाप...

"गुरुपोर्णिमा" - मला लाभलेलीे नवी गुरु ... !...

Image
"गुरुपोर्णिमा" - मला लाभलेलीे नवी गुरु ... !... ... दि. २० एप्रिल २०१८ - कसं वागावं, कुणाकडे बघू नये, कसं रहावं, काय केल्याने भलं होईल, काय न केल्याने तुझ्यामागे भिती राहणार नाही ... या प्रश्नांचं उत्तर -  "खाली मुंडी घालून गपगूमान ऐकावं त्यातच भलं असतं" या जागतिक मंत्राचा अनुग्रह मिळाला - आणि याच दिवशी आयुष्यात नव्या गुरूंचं पदार्पण झालं... सौ. तेजस्विनी तेजस कुळकर्णी ... ... "तेजसराव सांभाळा"... हे पाठवणीच्या वेळी सासूबाई म्हणाल्या होत्या.... त्यात तेजसराव आणि सांभाळा मध्ये साइलेंट "तुम्हाला स्वतःला" हे होतं, याची फोड सासरेबुवांनी हल्लीच केली... आपल्या माणसाची आपल्याला गॅरंटी असते (पक्षी : त्यांची मुलगी) -  म्हणून तुम्हाला सावध केलं..." - आपल्याला लाभलेली गुरु जबरदस्त आहे याची खात्री पटली ....! ... आई, पप्पा, आजोबा, शाळेतले शिक्षक, स्वतःचे अनुभव या सगळ्यांसह नवी गुरु लाभली आहे... "अहो, ऐक ना" म्हणाली की सरळ खुर्चीवर बसायचं आणि मिळणारं ज्ञान घ्यायचं इतकं सरळ सरळ शिक्षण सुरु आहे !  Jokes apar...

Financial Year 2018-2019

Image
३१ मार्च २०१८... आर्थिक वर्ष २०१७ - २०१८ चा शेवटचा दिवस... उद्यापासून नवीन आर्थिक वर्ष... ! .. या वर्षाने भारतीय अर्थव्यवस्थेत क्रांती केली, आणि नवी अर्थव्यवस्था जीएसटीच्या रुपा...

Test Cricket Anniversary

क्रिकेटची पहिली टेस्ट मॅच १५ ते १९ मार्च १८७७ दरम्यान मेलबर्नला इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया खेळवण्यात आली होती... टेस्ट क्रिकेटचा आज विशयूहॅपीबड्डे. .. पाच दिवस, ४० विकेट... लाल र...

मराठी भाषा दिन २०१८

जोपर्यंत ठेच लागल्यावर "आई गं" आणि ट्रक समोर आल्यावर "बाप रे" च मनात येईल तोपर्यंत मराठीची काळजी नाही...! .. इंग्रजी पुस्तकं वाचतो, इंग्रजी सिनेमे बघतो, उर्दु शायरी - हिंदी गाणी ऐ...

Valantines... Sansaar

= Valentines Day = गाडी, मोबाईल बदलवण्यापेक्षा हल्ली घरातला सोफा, कपाटं वगैरे बदलवण्याचे विचार येताय, कधी नव्हे ते किचनमध्ये घुसून काय कमी काय जास्त याची चाचपणी सुरुय, डिनर सेट्स घेवूयात कां अजून ? इथला फ्रिजपण जरा मोठा घ्यावा लागणारे, आत्तापर्यंत वनबीएचके खूप वाटायचा, एकट्याला मेंटेन करणं - आता पुढच्या वर्षापर्यंत थ्रीबीएचके कसा घेवू शकतो याचं प्लानिंग सुरुय, घरात लाईटबिल असतं, महिन्याचं फूड वगैरे आणावं लागतं, शॉपींग करावी लागते, हे ही हायलाईट होतंय... हल्ली आम्ही फोनवर बोलतांना, सेविंग्स - घर यावरच बोलतो... हातातल्या पैशांची मुक्तहस्ते उधळण करणारा मी, आता एक एक रुपया वाचवतोय - .. काल तिला विचारलं - काय घेऊ तुला व्हॅलेंटाईन्सचं गिफ्ट ? मला वाटलं एखादा नेकलेस, परफ्यूम्स, मोबाईल किंवा अजून वेगळं काहीतरी मागेल.. तिने तिला आवडलेलं Wind Chain मागितलं.. ते आपण आपल्या घरात लावू ... त्यानी पॉजिटीव्ह वेवस् येतात... .. हल्ली ती - मी नाही, "आम्ही" म्हणून विचार करतो. .. तेजू, यालाच तर संसार म्हणतात... पोटाच्या वर डावीकडे वेवस् आणणारी फिलींग... ! त्यातला क्षण न क्षण,...

World's Daughter Day जागतिक कन्या दिन

Image
मुलगी असणं भाग्य समजलं जातं. मुलगी खरं तर घरातली पाहुणी समजावी अशी आपली समाजव्यवस्था, पण घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी, माणसं यांना ती असते तोपर्यंत समजूतदारपणे, मायेन...

Engineers Day 2017

Image
इंजीनिअरची डिग्री येते चार वर्षात - आठ सेमिस्टर, ४०-५० विषय, प्रॅक्टीकल्स वगैरे आवरतं... पण ते भिनायला कुणाला जीवाचं Java करावं लागतं तर कुणाला जीवाचं concrete करावं लागतं... इतकं सहज नस...

शिक्षक दिन Teachers Day

= शिक्षक दिन = एका वळणावर आलो की मागे वळून बघतांना आपल्या आयुष्यातले वेगवेगळे चौक दिसतात. त्या चौकात जर रस्ता बदलला असता तर आज कदाचित Below this or Above this असतं वगैरे गोष्टी उगाच अलंकारिकत...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved