ब्राह्मण अभिनेत्री आणि डहाकेची घाण
डहाके - वाडकर मंडळी इंडस्ट्रीत उगवतात - जातात... ना यांच्या येण्याचं कौतूक ना जाण्याचं दुःख... आमच्या अंधेरी-गोरेगांवला किलोवर मिळतात ही मंडळी, मरिन ड्राईव्हला सिंगले ज्या आशाळभूत नजरेने कपाऱ्यात वाकत बसतात त्याच आशाळभूतपणे कुणी आपल्याला ओळखेल म्हणून खूप झालं तर फिल्मसिटीतल्या कँटीनमध्ये बसलेले असतात... किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये (लायकीनुसार)... कुणी फुकट विचारत नाही... म्हणून या चोंग्यांना असा उपद्व्याप करावा लागतो - ... बांद्य्रात एकदा आमिर खानची गाडी रस्त्याच्या एकदम मधोमध बंद पडली तेव्हा हॉर्न मारणाऱ्या एका टॅक्सीवाल्यावर त्याचा ड्राईवर उर्मटपणे आमिर खान की गाडी है म्हणून खेसकला - "आमिरकी गाडी है तो घर जाके चढ - यहा पब्लीकका टाईम खोटी मत कर..."' म्हणत टॅक्सीवाल्याने भरचौकात आमिरचं श्राद्ध घातलं होतं... आमीरची इतकी वर्ष आपटून ही गत - या झेमट्यांना कोण विचारतंय ... ? ... डहाकेचं स्टेटमेंट सिरीयस घेतलं तर - मूळात त्याला अक्कल नाहीय. - पण फरक हा आहे की - ब्राह्मण मुलींचे पालक त्यांना इंडस्ट्रीत उभं राहण्याची ताकद आणि विश्वास देतात... तिथे करीयर आपटलं...