दत्त
दत्त या एका नावाने आयुष्याला वळण दिलंय. दत्त महाराजांना शरण गेलेल्या भक्तांच्या आयुष्याचं स्टिअरिंग महाराज आपल्या हातात घेतात, आणि त्या माणसाचा आध्यात्माकडून अनुभूतीकडचा प्रवास सुरू होतो. दत्त महाराज म्हणावं तर सगुण स्वरूप - कारण दत्त तेजाने समृद्ध गुरू परंपरा आणि सदेह दर्शन देणारे सद्गुरु आहेत, आणि म्हणावं तर निर्गुण स्वरूप - कारण गाणगापूर, नृसिंहवाडी, कारंजा ते गुरुशिखर गिरनार मध्ये महाराजांच्या निर्गुण पादुका भक्तांना अनुभूती देत आहेत. दत्त महाराज म्हणजे सगुण - निर्गुण या स्वरूपाच्या पलीकडे, साक्षात चैतन्य आहेत. . दत्त महाराज आपल्या शिष्याला कधीही एकटं सोडत नाहीत. मूळ श्री दत्त महाराज (ग्रंथ : दत्तमहात्म्य), श्रीपाद श्रीवल्लभ (स्थान : पिठापुर, ग्रंथ : श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र) , नृसिंह सरस्वती स्वामी महाराज (स्थान : गाणगापूर, ग्रंथ : श्री गुरुचरित्र) या अवतारांमधून समृद्ध झालेली गुरू परंपरा आणि साक्षात दत्त स्वरूप असलेले संत यांपैकी कुठल्याही माध्यमातून दत्त महाराज आपल्या भक्ताला पंखाखाली घेतात. सद्गुरू कुणीही असू देत, मूळ दत्त महाराज आहेत. त्या माणसाचे कर्म, नशिब, प्रारब्ध हा खेळ थ...