Posts

Showing posts with the label Festival

दत्त

Image
दत्त या एका नावाने आयुष्याला वळण दिलंय. दत्त महाराजांना शरण गेलेल्या भक्तांच्या आयुष्याचं स्टिअरिंग महाराज आपल्या हातात घेतात, आणि त्या माणसाचा आध्यात्माकडून अनुभूतीकडचा प्रवास सुरू होतो. दत्त महाराज म्हणावं तर सगुण स्वरूप - कारण दत्त तेजाने समृद्ध गुरू परंपरा आणि सदेह दर्शन देणारे सद्गुरु आहेत, आणि म्हणावं तर निर्गुण स्वरूप - कारण गाणगापूर, नृसिंहवाडी, कारंजा ते गुरुशिखर गिरनार मध्ये महाराजांच्या निर्गुण पादुका भक्तांना अनुभूती देत आहेत. दत्त महाराज म्हणजे सगुण - निर्गुण या स्वरूपाच्या पलीकडे, साक्षात चैतन्य आहेत. . दत्त महाराज आपल्या शिष्याला कधीही एकटं सोडत नाहीत. मूळ श्री दत्त महाराज (ग्रंथ : दत्तमहात्म्य), श्रीपाद श्रीवल्लभ (स्थान : पिठापुर, ग्रंथ : श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र) , नृसिंह सरस्वती स्वामी महाराज (स्थान : गाणगापूर, ग्रंथ : श्री गुरुचरित्र) या अवतारांमधून समृद्ध झालेली गुरू परंपरा आणि साक्षात दत्त स्वरूप असलेले संत यांपैकी कुठल्याही माध्यमातून दत्त महाराज आपल्या भक्ताला पंखाखाली घेतात. सद्गुरू कुणीही असू देत, मूळ दत्त महाराज आहेत. त्या माणसाचे कर्म, नशिब, प्रारब्ध हा खेळ थ...

गुरुचरीत्र पारायण

Image
अनुष्ठानाने अनुभव येतो  आणि अनुभवाने अनुभूती... गुरुचरीत्र पारायण हा अनुभूतीचा मार्ग आहे... सात दिवस तन-मन-विचार-आचार एकरुप करुन विचारांच्या पल्याड असलेली मन:शांती मिळते... ते बळ पुढचं पुर्ण वर्षभर प्रवासासाठी कामी येतं... आपण गुरूंच्या सानिध्यान आहेत, त्यांच्यावर सोडलंय - ते सांभाळतायेत ही जाणिव राहते... .. "दत्त" या देवतेने माझी नौका भरकटू दिली नाही... काही वेळा प्रवाहाच्या उलटं चालायला लावलं, प्रसंगी वादळंही दाखवले, तडाखे देवून पैलतिरादिशेने ढकललंही... पण सांभाळून घेतलं... मार्ग दाखवला... त्या मार्गावर सद्गतीने चालण्याचं बळही दिलं... आणि ते देतांना गर्वाने फुलू दिलं नाही की संकटांनी फुटू दिलं नाही... पैसा कमवायचा ? कमव... पण मातू नको ... प्रसिद्धीच्या मागे पळ - पण उतू नको... दत्तगुरूंना गाणं खुप आवडतं - म्हणून त्यांच्यासमोर कुणीही जावून धांगडधिंगा केला तर चालणार नाही, तालात रहायचं...! .. सात दिवस - काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, लोभ या षड्रिपूंना आपोआप दूर ठेवलं जातं... स्वतःवरचं नियंत्रण जाणवतं, भक्कम होतं... परमात्मा-शक्ती यांसह एकरूपता होते आणि वाचा-वाणी-वि...

दिवाळीची प्रार्थना... देवा...

Image
देवा, माझ्या गरजा भागतील इतका पैसा मला दे, पण तो देतांना मी ऐतखाऊ होणार नाही हे नक्की बघ... मला मिळालेला पै न पै हा फक्त माझ्या प्रामाणिक कष्टाचाच असू दे... मला ते कष्ट करण्याची शक्ती आणि संधी दे... देवा, खूप पैसा मिळाला तरी, मी उतणार नाही, मातणार नाही ही सुबुद्धी दे, गरजवंतावर हुकूमत चालवण्याची आणि कमी पैसा असणाऱ्यांना तुच्छ लेखण्याची दुर्बुद्धी मला होवू देऊ नको... देवा, पैसा मिळवणं हे परमकर्तव्य असूनही, केवळ तो मिळवण्यासाठी मी कुटूंबापासून दूर जाईल, माझी कर्तव्य विसरेन - केवळ पैश्यांमागेच पळेन अशी धारणा माझी होवू देऊ नको - लक्ष्मी चंचल असते ही भावना माझ्यात सदैव जागृत ठेव... देवा, पैशांअभावी माझं कुठे अडणार नाही, आणि पैशांमूळे मी कुणाला नडणार नाही - इतकंच तू दे, पण पैशांमूळे माझ्यातला माणूस संपणार नाही - मी माणसाचा मशिन होणार नाही याची पदोपदी जाणीव करुन देत जा... देवा, गरजेपूरता पैसा तू देशीलच, पण मी येतांनाही रिकाम्या हाती आलो, जातांनाही रिकाम्या हातानेच जाईन - हे मला कधीही विसरू देऊ नको... देवा, मला श्रीमंत कर, पण, माझ्या हातून चार लोकांची पोटं...

खुनी गणपती Khuni Ganapati

Image
"खुनी गणपती" ... नांव वाचून आश्चर्य वाटलं नं ? पण हा धुळ्यातला मानाचा गणपती आहे... ! फोटोत दिसतंय ते खुनी गणपतीची - खुनी मशिदीजवळ होते ती ऐतिहासिक महत्व असलेली महापूजा...!  . १८९५ मध्ये खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनीक गणेशोत्सव सुरु केला. त्या गणेशाची विसर्जन मिरवणूक १००० वर्ष जून्या शाही जामा मशिदीवरुन सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी पालखीतून जात होती. त्यावेळी विरोध झाला... त्याचं रुपांतर हाणामारीत झालं आणि ब्रिटीशांनी गोळीबार केला. त्यात बरेच लोक मृत्यूमुखी पडले, जखमी झाले... आणि आहिराणीत "त्या मशिदजवळ खून पडनात", "खुन नी मसिद", गणपतीना वकतले तथा खून पडनात"... या चर्चांमूळे मशिदीला खुनी मशिद आणि गणपतीला खुनी गणपती नांव प्रचलीत झालं...! त्यावेळी ५ दिवस गणपती त्या मशिदीसमोर होता... .. पुढे ब्रिटीशांनी दोन्ही गटात समेट घडवला आणि एकमेकांच्या धर्माच्या सन्मानासाठी ठोस पाऊल उचललं. ब्रिटीशांकडून २२८ रुपये दोन्ही गटांना दिले जातात. आणि त्यातून ही ऐतिहासिक प्रथा सुरु झाली. .. दर अनंत चर्तुदशीला गणपतीची विसर्जन ...

"गुरुपोर्णिमा" - मला लाभलेलीे नवी गुरु ... !...

Image
"गुरुपोर्णिमा" - मला लाभलेलीे नवी गुरु ... !... ... दि. २० एप्रिल २०१८ - कसं वागावं, कुणाकडे बघू नये, कसं रहावं, काय केल्याने भलं होईल, काय न केल्याने तुझ्यामागे भिती राहणार नाही ... या प्रश्नांचं उत्तर -  "खाली मुंडी घालून गपगूमान ऐकावं त्यातच भलं असतं" या जागतिक मंत्राचा अनुग्रह मिळाला - आणि याच दिवशी आयुष्यात नव्या गुरूंचं पदार्पण झालं... सौ. तेजस्विनी तेजस कुळकर्णी ... ... "तेजसराव सांभाळा"... हे पाठवणीच्या वेळी सासूबाई म्हणाल्या होत्या.... त्यात तेजसराव आणि सांभाळा मध्ये साइलेंट "तुम्हाला स्वतःला" हे होतं, याची फोड सासरेबुवांनी हल्लीच केली... आपल्या माणसाची आपल्याला गॅरंटी असते (पक्षी : त्यांची मुलगी) -  म्हणून तुम्हाला सावध केलं..." - आपल्याला लाभलेली गुरु जबरदस्त आहे याची खात्री पटली ....! ... आई, पप्पा, आजोबा, शाळेतले शिक्षक, स्वतःचे अनुभव या सगळ्यांसह नवी गुरु लाभली आहे... "अहो, ऐक ना" म्हणाली की सरळ खुर्चीवर बसायचं आणि मिळणारं ज्ञान घ्यायचं इतकं सरळ सरळ शिक्षण सुरु आहे !  Jokes apar...

राम आणि गाणी...

Image
राम आणि गाणी... कृष्ण, राम, गणपती, शंकर, विठ्ठल, देवी यां देवतांवरची गाणी हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे... एकेका देवतेवर शंभर शंभर गाणी, एकापेक्षा एक आरत्या आणि ते संगीत ऐकतांन...

डोलची : धुळ्यातली होळी

Image
धुळ्यात होळी म्हणजे प्रेमानं ऑ ऑ करुन चेष्टेनं रंग लावणं नसतं ... इथल्या लोकांत सुप्त / उपजत आडदांडपणा असतो. जो होळीला उफाळून येतो... ! .. धुळ्यात पिचकारीनं नाही - डोलचीने होळी खे...

रामदास समर्थ : दासनवमी

Image
छत्रपती शिवाजी राजेंच्या मृत्यू नंतर समर्थ हेलावून गेले सर्व धातू पात्रांचा वापर बंद केला मृत्तिका पात्र  आणि फक्त दूध घेऊ लागले चाफळला होते. गडावर जाण्याचा संकल्प क...

Diamond Set and Saree

प्रसंग १ : स्थळ : घरी पात्र : मी आणि आई... मी मुंबईहून सकाळीच आलो, चहा घेता घेता - मातोश्रींनी स्वतःच्याच दुकानातून चार - पाच साड्या आणलेल्या. त्यापैकी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी क...

Navratri

Image
पृथ्वी - विश्व हे मातृस्वरुप आहे. जन्म - पालन - मोक्ष या तिन्ही अवस्थांचं कारकत्व स्त्रीरूप-मातृरूप आहे. आपलं आस्तित्व - आयुष्य हे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्या आदीशक्ती...

बाप्पा तू ये...

Image
बाप्पा, कानठळ्या बसवणारी विचित्र गाणी, कर्णकर्कश्श डिजे नसेल, विचित्र हावभाव नसतील, धिंगाणा नसेल, फक्त येतांना मर्मबंधातली ठेव असणारी ती गोड गाणी आठवणीनं घेऊन ये ... अशी चिक मोत्याची माळ, गजानना श्री गणराया ही गाणी तू खूप वर्षांपूर्वीच परत नेलीस. .. बाप्पा, चॉकलेट मोदक, उंदीर मोदक असले प्रकार नसतील... मस्त तळलेले मोदक, उकडीचे मोदक, खिरापत असू देऊ प्रसादात... तूला स्वतःला मोदक आवडतात... एखाद्या लहानग्याच्या साखर खोबऱ्यात अमृत बघणारा तू... ती अमृताची चव येतांना घेऊन ये... .. बाप्पा, मला माहितीय, तुला पैसे भरून व्हिआयपी एंट्री मागणारी भक्ती आवडत नाही, घरी तुझ्या फोटो समोर मनोभावे हात जोडणाऱ्या निरागस भक्तावरही तुझी कृपा राहते... देवा त्या भक्तीनेच तुला प्रार्थना करतील, येतांना ती निरागसता फक्त घेऊन ये... .. बाप्पा, तुझ्या मिरवणुकीत दारू पिऊन झिंगणाऱ्या लोकांचा तुला राग येतो, गणपती बाप्पा मोरया म्हणत उत्साहात चालणाऱ्या भक्तांत तू रमतो... तू भावाचा भुकेला आहेस, बाप्पा येतांना तो भाव फक्त घेऊन ये... . बाप्पा तुझं देवत्व महाकाय मूर्तीचं मिंधं नाही, सुपारीतही प्रगटणारा तू, मोठ्ठ्या म...

कृष्ण

Image
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय॥ देवातलं नेमकं तितकं घ्यावं, ते समजावं, त्यायोगे आपली उत्तरं शोधावी आणि वेळ आली की रस्ता पकडावा... भक्ती म्हणजे इतकंच. कृष्ण पूजण्यासाठी लग्न, घरदार सोडून आजन्म ब्रह्मचारी होवून इस्कॉनच्या नादी लागू नये, किंवा राम पूजण्यासाठी कारसेवक होवून तावतावानं भांडू नये... .. कृष्ण गोकूळातल्या बाललीलांत भेटत नाही ... ना त्या लीलांत तो बघावा... प्रत्येक लहान मूल अपने आप मे त्या लीला दाखवत असतं... कृष्ण द्वारकेचा राजा म्हणूनही बघायची इच्छा नसते... कारण तेव्हा आपापसातले भांडणं, राज्य, सोळा हजार राण्या यांत अडकलेला तो सामान्य माणूस असतो... कृष्ण महाभारतातल्या राजकारणात कपट करतांनाही पटत नाही... मग त्याचं देवत्व कुठे ? का पूजा करावी ? ... कृष्णाची पूजा दही दुध चढवून होत नाही... कृष्णाची पूजा भजन करून होत नाही, ना कृष्णाची पूजा चार धाम यात्रा करून होते - कृष्णाचं देवत्व गोकूळात नाही, कृष्णाचं देवत्व द्वारकेत नाही... हस्तीनापूरातल्या राजकारणात तर बिलकूल नाही... कृष्णाचं देवत्व कुठाय ? ...

श्रावण

Image
काही दिवस हे ठरवून एकाच मापातले असतात, त्या त्या दिवशी प्रत्येक गोष्ट अनुक्रमे घडतेच. श्रावणाचा पहिला दिवस यूगानूयूगे सेsssम... जसा लहानपणी होता, त्याच थंडगार झुळूका आजपण वा...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved