Posts

Showing posts with the label Shivsena

SayNoToLockdown

(राजकीय मताचा चष्मा उतरवूनच वाचा...) मार्च ते जून लॉकडाऊन केल्यानंतर, उद्योगधंद्याचं श्राद्ध घालून आणि सगळं विस्कळीत होवूनही जर जुलैमध्ये परत लॉकडाऊन लावावं लागत असेल तर तर ते मोदींपासून, उद्धव ठाकरेसकट आपल्या शहराच्या महापौरापर्यंत सगळ्यांचं अपयश आहे...! ... मोदी, ठाकरे येतात - भाषण देतात - जातात, रिकव्हरी प्लान, बाहेर पडण्याचा रोडमॅप कुणाकडेही दिसत नाहीय... पंधरा पंधरा दिवसाची स्किपींग सुरु आहे एवढंच दिसतं. प्रामाणिक विचार केला तर केंद्र असो वा राज्य, पहिला पेशंट सापडल्यापासून अक्षम्य चूका झाल्यात..एअरपोर्ट स्क्रिनींग कमी पडलं, धोका ओळखण्यात चुक झाली, लॉकडाऊन लावतांना मिसमॅनेजमेंट झालं...! राज्यातल्या तिघाडी सरकारचा प्रश्नच नाही... तिथे एक से एक नग भरलेय... स्थानिक प्रशासन हौस म्हणून लॉकडाऊन लावतं, त्यावर कुणाचा कंट्रोल नाही... जिल्हाधिकारी-पोलीस राजे झालेय... गोंधळ गोंधळ गोंधळ घातला जातोय. ... बेशुद्ध पडलेले उद्योगधंदे बघितल्यानंतर इमॅजनरी मधुन जेव्हा फॅक्टवर येतो तेव्हा कळतं...! उद्योग परत सुरु करायचे तर रिस्टार्ट करण्यासाठी किती धडपडा असेल आणि त्यातही किती आधिकारी, मंत

नापास सरकार... हतबल दरबार

जे पाच लाॅकडाऊन मध्ये साध्य झालं नाही ते सहाव्या लाॅकडाऊन मध्ये होईल ही महाराष्ट्र शासनाची अपेक्षा व्यर्थ आहे. काहीतरी रणनितीमधे (strategy), दृष्टीकोनामधे (approach), गृहितकांमध्ये (premise / assumptions) बदल केल्याशिवाय आणि व्यवहारी (practical) परंतु सृजनशील विचार (creative thinking) केल्याशिवाय गत्यंतर नाही.  सरसकट “लाॅकडाऊन” टाळला पाहिजे. शासनकलेमध्ये (statecraft) सूक्ष्मनियोजनाची (micro-planning) एक पध्दत आहे. ती अवलंबवून स्थानिक परिस्थितीचा नेमका अंदाज घेऊन नियोजन केलं पाहिजे. अंमलबजावणीचे अधिकार विकेंद्रीत केले पाहिजेत.   साथीच्या रोगाचा प्रतिकार कसा करायचा ह्यासाठी साथरोग नियंत्रणाची जी नियमपुस्तिका (rule-book) आहे त्यात स्वयंसेवी संस्था, वस्ती पातळीवरील नेते, प्रभाव असलेल्या व्यक्ती आणि स्थानिक भाषेत संदेश (efrective local communication) देणं महत्वाचं असतं.. ते इथे काहीही झालं नाही.  “लाॅकडाऊन” चे दोन प्रमुख उद्देश असतात. १) संसर्ग रोखणे; आणि २) शासनपातळीवर क्षमता (तपासणी, मागोवा, उपचार) वाढवणे. दोन्हीमध्ये महाराष्ट्र शासन पहिल्या पाच “लाॅकडाऊन” मध्ये अपयशी ठरलं आ

Raju Parulekar - Devendra Fadanavis Insider Interview

Image
परुळेकर - फडणवीस इनसाईडर चॅनेलची मुलाखत वेळ मिळेल तसं तीन-चार दिवसात बघून संपवली... ... फडणवीसांची आजपर्यंतची सर्वांत चांगली मुलाखत म्हणजे ही मुलाखत झालीय... तो माणूस मूळातच जबरदस्त आहे, पण जबरदस्त माणसाला बोलतं करण्यासाठी मुलाखत घेणाराही त्या तोडीचा असावा लागतो... राजू परुळेकरांना श्रेय द्यायलाच हवं... फडणवीस परुळेकरांना मुलाखत देतायेत ऐकल्यावर विरोधाच्या सूरात माझाही सूर होता, पण मुलाखत बघीतल्यानंतर फडणवीसांनी जे केलं ते योग्य केलं हे समजलं...! ... परुळेकर जुन्या फळीतले पत्रकार आहेत, त्यांची काही मतं पटत नाहीत, काही १०० टक्के पटतात - (स्पेशली : शिवसेनेबद्दलची...!) जसं, जगाचा-देशाचा अभ्यास नसेल, पण मुंबईसह महाराष्ट्राची आणि ठाकरसेनेची नस ते जाणून आहेत, परखड आहे... आणि मूळात हल्लीच्या जाधव, सरदेसाई वगैरे फडतूस लोकांसारखं बोलणाऱ्याला इन्टरप्ट न करता उत्तरं देण्यासाठी पुर्ण वेळ दिला...! चांगलं ते चांगलं म्हणायलाच हवं... परुळेकरांनी मुलाखत व्यवस्थित हँडल केली... अर्थात "ट्रोलर्सना सौम्य घ्यायला सांगा..." हे सांगणं त्यामागे आहेच... परुळेकरांची प्रतिमा थोड

#MaharashtraNeedsDevendra

# MaharashtraNeedsDevendra ... देवेंद्रजी मुख्यमंत्री असतांना कुठल्याही संकटात स्वतःच्या जबाबदारीने, स्वतः वॉर रुम मध्ये बसून परिस्थिती हाताळत... आणि दुसरीकडे आत्ताचे मुख्यमंत्री हुजरेगिरी करणाऱ्या पत्रकार, कार्यकर्त्यांची खुषमस्करी गर्दी घेवून गर्दी करू नका सांगताय... ! ... देवेंद्रजी सीएम असतांनाही अनेक अस्मानी संकटं आली, पण कधी भिती वाटली नाही... कारण त्यांची डिसिजन मेकींग पॉवर... आणि त्याच निर्णयावर ठाम राहण्याची धडाडी... कोरोना सारख्या गंभीर संकटात देवेंद्रजींनी योग्य निर्णय घेतले असते... तिघाडी सरकारमध्ये जिथे मंत्र्यामंत्र्यात ताळमेळ नाही, गोंधळ घालतंय - तिथे देवेंद्रजींनी एकहाती यंत्रणा सांभाळली असती. ... रुग्ण-संशयित पळून जाताय, त्यांना धीर नाहीय, लोकांमध्ये भिती आहे, व्यवहार ठप्प होताय त्या परिस्थितीत देवेंद्रजींनी धीर दिला असता, पण रुग्ण वाढू नये यासाठी जनतेला विश्वासात घेवून लोकल सेवा बंद कठोर पावलं उचलली असती... गावी जाणाऱ्यांसाठी बसेस, मदतीसाठी जागोजागी बूथ आणि योगी सरकारने जशी मदत केली तशी मदतही देवेंद्रजींच्या सरकारने केली असती. ... आजपर्यंत महाराष्ट्रातल्या जिल्ह्याजि

उधोजीची अयोध्यावारी

काल संजूरौत ४००-५०० कर्मचारी घेवून गेले, आज उठाराव तिकडे गेले, कालच्याच ४००-५०० लोकांनी संजूरौ सोबत उठारावचं स्वागत केलं, आणि त्याच लोकांच्या गर्दीसमोर उठारावने हिंदीत भाषण केलं... स्वतःला आणि खानदानाला उदबत्त्या ओवाळल्या, मोदी-शहांच्या नावे बोंबा मारल्या, रामाला आशिर्वाद दिला... संजूरौतनं पुन्हा पुड्या सोडल्या - झालं...! ... तिकडच्या ओरीजनल लोकांना या नाटकाचा ट फरक पडत नाही, ढुंकूनही बघत नाही... इकडची ओरीजनल लोकं टिंगल करतात... मोदी-शहा येडं समजून सोडून देतात... ... प्रचंड यशस्वी, प्रचंड गर्दीत दौरा आटोपला - उद्याची हेडलाईन !

Shivsena Chale

निष्पाप उधोजीराजेंनी शपथ न घेता कपटी यवन फडणवीसने शपथ घेतलेली पाहून  हा दगाफटका सहन न झाल्यामुळे यवतमाळच्या एका शिवसैनिकाने आत्महत्या वैग्रे करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला काही पटलं नाही तर tweet करावं, post करावी, शिव्या द्याव्या, अनफॉलो करावं, ब्लॉक करावं..थोडक्यात फुकट ते सगळं करावं पण थेट स्वतःच्या जीवाशी खेळ करू नयेत, आयुष्य खूप सुंदर आहे वगैरे असला काही प्रकार नाही पण आपण जे व्याप वाढवून ठेवलेले असतात ते आपल्यापाठी बघणार कोण? आणि  उधोजी राजे सैनिकांसाठी स्वतःला चिमटा तरी काढुन घेणार आहेत का? जलसिंचन फेम अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली पाहून जो थयथयाट सुरू आहे, तो बघून एक जेणिविण प्रश्न हा पडलाय की प्रपोज्ड शिवसेना+राष्ट्रवादी+काँग्रेस सरकारात अजित पवार काय स्वच्छता मंत्री वगैरे होणार होते का ??? बाकी आपण राजकारण्यांचा आदर्श घेऊन एकमेकांना दातओठ खात भक्त, गुलाम, चाटे वगैरे न म्हणता नाव घेऊन शेवटी जी लावायला कधी शिकणार आहोत? काँग्रेसची पुढची बैठक कधी आहे ? आमच्याही वाडीत दर बुधवारी आणि रविवारी दासबोधाची बैठक असते त्याला या लोकांनी यायला हरकत नाही कारण तसंही आउटप

हायव्होल्टेज ड्रामा आणि तथ्य

Image
मुख्यमंत्री निवड घटनात्मक तरतुदी 1. बहुमत असलेला नेता राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतो. राज्यपालाची खात्री झाल्यानंतर राज्यपाल मुख्यमंत्री पदाची  शपथ देतात. नंतर ठराविक कालावधीत बहूमत सिध्द करण्यास सांगितले जाते. 2. भारतात बहु पक्ष पध्दती असल्यामुळे निवडणूकी नंतर  प्रत्येक पक्ष आपला विधी मंडळ नेता निवडतो. 3. विश्वास दर्शक ठरावा दिवशी प्रत्येक आमदाराने सरकार स्थापनेच्या ठरावावर मत द्यायचे. परंतु  पक्षाचा विधी मंडळ नेता व्हिप बजावून ठराविक पक्षालाच मत देण्याचे आदेश देऊ शकतो. हा आदेश प्रत्येक आमदारांवर बंधनकारक असतो. 4. सध्या राष्टवादीचे गट नेते अजित पवार आहेत. त्यांच्या कडे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या सह्यांचे पत्र आहे. जे त्यांनी राज्यपालांना सादर केले. त्या नुसार मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणविस यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. 5. विश्वासदर्शक ठरावा दिवशी अजित पवार व्हिप बजावून भाजपा ला मतदान करण्याचे आदेश देऊ शकतात. जो आदेश राष्ट्रवादीचे आमदार डावलू शकत नाहीत. जर विरोधात मतदान केले तर मत बाद होईल. 6. शरद पवारांनी जरी पक्षाची बैठक बोलवून अज

राष्ट्रपती राजवट

Image
महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रपती राजवटीच्या मन:पूर्वक शुभेच्छा... हि राष्ट्रपती राजवट आपल्याला भरपूर मनोरंजन देणारी, नवीन अनुभव देणारी, टीव्हीच्या रिचार्जच्या दुप्पट रिटर्न्स देणारी ठरो - हि महामहीम राष्ट्रपती, राज्यपाल आणि मोटाभायला प्रार्थना...! ... राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? कलम ३५६ नुसार घटकराज्य शासन कारभार राज्यघटनेनुसार चालणे अशक्य असल्याचा अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींनी दिला किंवा राष्ट्रपतींना सुमोटो पद्धतीने तशी खात्री पटल्यास राष्ट्रपती जाहीरनामा काढून राष्ट्रपती राजवटीची घोषणा करू शकतात. राष्ट्रपती राजवट समाप्त होण्याची घोषणाही राष्ट्रपतीच करतात. संसदेने अशा घोषणेला मान्यता दिल्यानंतरच ती अंमलात आणली जाते. राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत संसदेची मान्यता मिळवणे आवश्यक असते. मात्र मंजूरी मिळाल्यानंतर केवळ सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येते. परंतु संसदेने या घोषणेला पुन्हा पुढील सहा महिन्यांसाठी मान्यता दिल्यास राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवता येऊ शकतो. अशाप्रकारे वाढ करून जास्तीत जास्त एखाद्या प्

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस... Vs Others

Image
एकीकडे - देवेंद्र गंगाधरराव फडणवीस... . दुसरीकडे - उद्धव ठाकरे, संज्या रौत, राजाभाऊ ठाकरे, शरद पवार, चव्हाण मंडळी, कॉंग्रेस मंडळी, मलीक वगैरे टिव्हीवरच्या चर्चेत ज्ञानबिड्या पिणारे व्हेरी थोर लोक्स, मूकमोर्चा मंडळी, प्रकाशभौ आंबेडकर, जितूबुद्दीन आवहाड फ्रॉम गाझा, शेट्टीचा राजू, आयबीएन-टिव्ही९-सामचं चपराश्यापासूनचं अख्खं रिकामचोट मंडळ, काणे-सबनीस वगैरे मंडळी, हे ही कमी म्हणून पक्षांतर्गत तारे तोडणारे जेष्ठ - लोकांच्या मनातील माजी मुख्यमंत्री वगैरे मंडळी... आणि फडणवीसांनी ब्राह्मणांसाठी काय केलं म्हणत विरोध करणारा एक गट...! .. याचं कारण एकच : योग्य - स्वच्छ आणि अभ्यासू राज्यकारभार...! .. महाराष्ट्राला घाणेरड्या डावपेचांचा, वाह्यात हातवाऱ्यांचा उबग आलेला... त्यात या माणसाला नशीबानं सत्ता मिळाली, आणि त्यांनी त्याचं सोनं केलं. राजकारणात जे स्वच्छ डावपेच आहेत ते वापरुन वरच्या लिस्टेड मंडळींनी वेळोवेळी निर्माण केलेलं उपद्रव त्यांनी एकहाती थोपवलं, या माणसाविरुद्ध राजकारणाने अगदी खालची पातळी गाठली, त्यांच्या पत्नीबद्दलही बरळलं गेलं, तरीही संयम

शिवसेना चाळे २०१९ : १

२०१४ लोकसभेला यूतीत सगळं आलबेल होतं, विधानसभेला वाजलं - वेगवेगळे लढले, तरीही जनमताचा कौल फाट्यावर मारुन भाजपाने शेणाबरोबर सत्तेत भागीदारी केली... सत्तेत येऊनही उठा, रौत वगैरे अखिल-ब्रांदा-उपद्रव-मंडळ आपलं उपद्रवमूल्य दाखवत राहीले... सामनातून रौत, टिव्हीच्या दांडूक्यासमोर उठा नॉनस्टॉप चाळे करत होते, तरीही भाजपा गप्प बसलं - जनतेने ते सुद्धा सहन केलं... संसार ढकलला गेला... . २०१९ ला तेच रिपीट झालं... लोकसभेला गळ्यात गळे घातले, विधानसभेला टिकलं, जनतेने फडणवीस मुख्यमंत्री म्हणून महायूतीला कौल दिला, आणि आता परत शेणेने आपलं मूळ स्वरुप, मूळ उपद्रवमूल्य समोर आणलंच ! . आता जे झालं ते शेवटचं ! यापुढे जर भाजपाने अभद्र उपद्रवी शेणेसोबत यूती टिकवली, आता तुटली आणि परत केली तर त्यांची अशी खोड मोडली जावी की परत अश्या बिनडोकांशी यूती करण्याचा विचारही येणार नाही...! सगळ्या जागांवर त्यांचं डिपॉजीट जप्त व्हावं, त्यांच्या सभा फ्लॉप व्हाव्या... त्याशिवाय भाजपाच्या यूतीखोर लोकांना अक्कल येणार नाही... . शेणा आणि रौतांबद्दल काय मत ? - त्यांना आम्ही गणतीतही धरत नाही.

आरेचं जंगल

Image
आरे मिल्कमध्ये घर घेतांना तिथलं निसर्ग हे एकमेव कारण समोर ठेवलेलं... मुंबईच्या गर्दीत राहूनही शहरापासून बाहेर, जंगलाच्या मध्यात राहण्याचा अनूभव देणारं ते ठिकाण आहे. चार लाखाच्या आसपास असणाऱ्‍या डेरेदार वृक्षांमूळेच मुंबईच्या धोकेदायक प्रदुषणातही किमान उपनगरांत तरी वातावरण संतुलीत राहतंय. . सरकारच्या बाजूचा गट सांगतोय... - मेट्रो कारशेड अत्यावश्यक आहे. आरेतल्या चार लाख झाडांपैकी सत्तावीसशे तोडली तरी फार फरक पडणार नाही. समोरच्या गटातील मंडळी राजकारण करताय वगैरे ... . तूर्तास मान्य ! वृक्षतोडीस विरोध करणारा गट राजकीय हेतू मनात ठेवून स्पॉन्सर्ड असेल. त्यांचं बॅकीँग कुणीतरी भलतंच असेल... पक्या वगैरे मंडळी फोटोसाठी थोबाड घेवून आलीत... मान्य ! . पण आरे परीसरात राहण्याचा अनुभव, आणि झाडांची वाढ, फायदे, प्रदुषण, झाडांची गरज यां मुद्यांवर किमान प्रिप्रायमरी पर्यँत झालेलं शिक्षण यांचा विचार केला तरीही झाडांची कत्तल चुकीचीच आहे हेच कळतंय... . ज्या अवस्थेत झाडं कापली ती वाढायला सरासरी किमान तीन वर्ष लागतील. जास्तही ! त्यापेक्षा कमी नक्कीच नाही... झाडं कापायला दोन

Sena vs Fadanvis

ठाकरेसेना एखाद्या नागासारखी आहे. जरा धोका वाटला की फुस्स करीत नागासारखा फणा काढीत उभी रहाते. पण देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री एखाद्या कुशल गारुड्यासारखे आहेत. कुठली तरी पुंगी वाजवीत ते या नागापुढे ती गोलगोल, उलट सुलट फिरवीत रहातात. मग नाग बावचळून जातो. कुठून कसा हल्ला त्या पुंगीवर करावा तेच त्याला कळेनासे होते. आणि त्या भानगडीत देवेंद्रजी त्या नागाला सत्तेचे टोपलीत केव्हां बंद करतात, ते त्याला कळतही नाही. गंमत अशी की लोकांपुढे खेळ करायचा असेल तेव्हां या नागाला ते पुन्हा बाहेर काढतात.

भाजपा vs सेना

शिवसेनेचे हार्दीक अभिनंदन. अखेर स्वबळावर मुंबैमहापालिकेत सत्तेवर येणार असल्याबद्दल. #करुन_दाखवलं सेनेकडे मुंबैच्या विकासाची  संधी आणि जबाबदारी या योगे मिळाली आहे. त्याचं त्यांनी सोनं करावं हीच अपेक्षा. अभिनंदन. देवेंद्र फडणवीसांनीही अन्य लहान पक्षांना व अपक्षांना ब्लैकमेल आणि मांडवली करण्यापासून रोखलं. शिवसेनेची मुंबैसाठी जी काही तडफड तडफड चालू होती ती ही आश्वासक पद्धतीने शांत केली. शत्रुत्व नव्हे तर शिवसेनेशी मैत्रीपूर्ण लढत हे अमित शहांचे म्हणणेच अधोरेखीत केले. आजच्या एकूणच लसलसत्या राजकीय वातावरणात विपरीत वाटेल असा घेतलेला एक पण सकारात्मक निर्णय. किंबहुना ज्या परिवर्तनाची भलावण देवेंद्र फडणवीस करत होते ते त्यांनी या स्वरुपात मुंबै महापालिकेत आणले. म्हणजे एकतर सुशासन स्वतः देऊ किंवा सुशासन द्यायला भाग पाडू, अन्य कुणाचा त्यात ब्लैकमेल, मांडवलीवाला हस्तक्षेप न होता. ते ही मोकळ्या मनाने. सत्तेत भागीदारी घेऊनही रोज उठून कण्हतकुतंत , बोटं कडकडा मोडत बसणार्या शिवसेनेसमोर देवेंद्र फडणवीसांनी स्वतःची आणि भाजपची उंची या निर्णयाने वाढवली आहे. ब्राव्हो टीम देवेंद्र.

मुंबई भाजपा - सेना ! देवेंद्र फडणवीस द बॉस

(बातमी : भाजपा मुंबईत महापौर, उपमहापौर किंवा कुठल्याही समितीसाठी उमेदवार देणार नाही.) . मुंबईत भाजपाने एक जबरदस्त खेळी केलीय. शिवसेना विजयी होऊन पण पराभवी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भुमिकेचं विश्लेषण एक जबरदस्त राजकीय खेळी असच करावं लागेल. कसं ते बघुया. 1) भाजप महापालिकेची महापौरासकट कोणतीही निवडणुक लढवणार नाही त्याचवेळी विरोधी पक्षनेतेपदही घेणार नाही. यामुळे काॅग्रेसला आपोआपच विरोधी पक्षनेतेपद मिळेल. पण त्यामुळे होईल काय की सेनेच्या विरोधात आपोआपच सर्व पक्ष येतील. त्यामुळे कोणताही चुकीचा निर्णय शिवसेना घ्यायला गेली तर 88 विरुध्द बाकी सर्व असल्यामुळे तो निर्णय रद्द करावा लागेल. 2) त्याचवेळी सेनेला चांगला निर्णय राबवतांना संख्याबळ कमी पडलं तर आम्ही मदत करु. म्हणजे चांगल्या निर्णयाला मुंबईकरांच्या हितासाठी पाठींबा पण चुकीच्या निर्णयाला विरोध करणार. आणि हे सर्व सत्तेत सहभागी न होता. म्हणजे सेना राज्यातील सत्तेत सहभागी पण आहे आणि विरोध पण करतेय. पण एकप्रकारे सेनेला असा इशारा आहे की सत्तेत सहभागी होऊन विरोध करु नका तर आमच्यासारखा बाहेरुन पाठींबा देऊन विरोध करा. 3)तसेच या भुमि

Sena

१९६६ : खंजीर, कोथळा, मावळे, वाघ, निजाम, वार, औरंगजेब, औलाद, रक्त, थडगं... वेग्रे वेग्रे (५० वर्षांनंतर) २०१६ : खंजीर, कोथळा, मावळे, वाघ, निजाम, वार, औरंगजेब, औलाद, रक्त, थडगं... वेग्रे वेग्रे ..... प्रश्न - यूती, भाजपा, मोदी हे मुद्दे रोजचेच आहेत हो, सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात काहीतरी चांगलं, लक्षात राहील असं हवं होतं... उठा - हो नं, पण ऐनवेळी मेलं ते आजचं भाषण विसरलो, आणि वेळ मारून नेण्यासाठी विधानसभेवेळी पाठ केलेलं भाषण "म्हणून दाखवलं"... . प्रश्न - यूतीचं काय ते व्यवस्थित कळलं नाही... उठा - मला तरी कुठे कळतंय ? पण युती तोडून कसं चालेल ? स्वबळावर एक ग्रामपंचायत यायचे वांधे... काल बघितलं नाही कां ? आणि भाषणात मुद्दे कुठून आणायचे ? प्रश्न - पण मावळे तर होsss म्हणता युती तोडायला... उठा - शूsss... ते आम्हीच सांगितलं होतं... असं बोला मधे मधे . प्रश्न - भाजपेयी जर निझामाची औलाद असतील, औरंगजेबाची फौज असेल तर केंद्रात -राज्यात त्या फौजेत तुम्ही सामिल कां ? "निघून जा" असं स्पष्ट सांगूनपण तुम्ही चिटकलेले आहात... कशासाठी ? उठा - सुटत नै न... यूती तुटली तर हम सेन

असहीष्णू

Image
"असहीष्णू :: ये क्या होता है भाई ??" . कालच... ऑफीसच्या गेटवर उभ्या असलेल्या "उत्तर भारतीय" वॉचमनला निघता निघता Happy Diwali केलं... त्यानं मस्त हसून रिप्लाय केलं... त्यानंतर रस्त्यावर, चौकांत ओळखीचे ट्रॅफीक पोलीस भेटले. पाच मिनिटं थांबून प्रत्येकाशी बोललो, शक्य असेल तर सुट्टी घ्या आणि दिवाळी घरी करा असा न मागताच सल्ला आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या...  "आमच्या नशीबी कसली रे सुट्टी... धुळ्याहून आलास की घरी ये फराळाला" असं आग्रहाचं निमंत्रणही घेतलं... पुण्याहून धुळ्याला आल्यावर सकाळी उतरतांना ट्रॅव्हल्सच्या ओळखीच्या ड्रायव्हर- आणि "ख्रिश्चन" मॅनेजरनं स्वत:हून Happy Diwali केलं... परत जातांना मिठाई घेऊन ये अशी मागणीही झाली. . आणि आत्ता इतक्यातच... गाडी सर्व्हिसीँगला नेली, ओळखीचाच मेकॅनिक... २३६ रुपयांचं बिल फाडतांना सवयीप्रमाणं "कितना दूँ रहमान ? दिवाली डिस्काउंट देके बिल बना..." म्हणत २०० त आवरलं... निघतांना तो आठवणीनं Happy Diwali tejaabhai बोलला... . "असहीष्णू" वातावरण झालंय नां ? मला तर नाही ब्ब्बॉ दिसलं कुठे... उलट, चाँद,

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved