Dr. Shriram Lagoo
डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनानं मराठी अभिनयसृष्टीच्या नटसम्राटाची अखेर झाली. वरच्या फळीतले कदाचित लागू एकमेव शेवटचे उरले होते, ते ही आज गेले. .. डॉ. श्रीराम लागू पर्व संपलं. आणि त्यांच्यासोबत कदाचित एक पिढीही संपली...! ... मन संकल्पना, भूतभविष्य, देव-दानव, श्रद्धा-अंधश्रद्धा यांना त्यांच्या जडवादाने नेहमीच विरोध केला. मृत्यूनंतर काहीही राहत नाही या त्यांच्याच सिद्धांताने त्यांना "श्रद्धांजली" म्हणणं योग्य ठरणार नाही. त्यांचं राजकीय-वैचारीक मत गोंधळलेलं होत, पण अभिनयातील त्यांच्या भव्य कारकिर्दीसाठी आदर...!