Posts

Showing posts with the label Sweet

Shriyan and Songs

Image
माझ्या लेकराला दोन-तीन दिवसापासून twinkle twinkle little star गाण्याचा नाद लागलाय... त्याआधी कुठलंसं हिंदी गाणं होतं... बहुतेक "आपकी आँखोमे कुछ..." होतं..., त्याआधी किलबील... त्याच्यासमोर प्ले झालं आणि आवडलं... तिथून पारायणं सुरु होतात - जोपर्यंत दुसरं आवडत नाही तोपर्यंत... ... गर्भसंस्काराच्या काळात आम्ही त्याला प्रकृतीप्रमाणे - वेळा सांभाळून राग ऐकवायचो - कधी मी गायचो कधी त्याचा मामा, - किंवा रोजचा रियाजही समोर बसवून व्हायचा. त्यामूळे बहुतेक त्याचं गाणं उपजत आलंय, आणि जर तेच राग जर ऐकवले तर त्याचं एक्स्प्रेशन जबरदस्त असतं...  ... गाण्याचंही असंच - तेच तेच गाणं लूप मध्ये प्ले करावं लागतं, संपलं की एकीकडे याचा ठणाणा सुरु होतो... परत प्ले करा... दिवसभर जेव्हाही हुक्की येईल तेव्हा हा खेळ सुरु होतो, त्यात दुसरं गाणं लागलेलं चालत नाही, बंद केलेलं तर नाहीच नाही.. मध्ये मध्ये कुणी बोललेलं चालत नाही, तो ऐकतांना आपणही कंपनी दिलीच पाहीजे - तसे एक्स्प्रेशन्स दिलेच पाहीजे... जो कुणी या गाण्याच्या कार्यक्रमात त्याच्या हातात सापडला त्याची तासभर तरी सुटका होत ना

Meanwhile...

Meanwhile... ... १. बाळ झाल्यानंतर तेजूला आणि बाळाला तिच्या माहेरून घरी परत आणायची तयारी होत होती, तेव्हा फेब्रुवारी एन्डला ती गमतीत बोललेली "मी आता मे शिवाय येणार नाही"... बहूतेक कोणतातरी पक्षी सुमडीत तथास्तू बोलला आणि अडकली... सॉलीड खोड मोडली गेली... आता अर्धा जूनही तिथे काढावा लागतो की काय असं झालंय... ! ... २. यूएसएची अति क्रेझ होती... तिथले प्रोजेक्टस् घेण्यासाठी - जाण्यासाठी जीव तोडायचो... यूएसए भिनलं होतं... तेच ते डोक्यात... २०१९ जानेवारीत एक प्रोजेक्ट मिळाला, २०१९ डि सेंबरपासूनच जाण्याची तयारी सुरू केली - २०२० मे मध्ये जायचं ठरलं... पुर्ण तयारी झाली आणि कोरोनाने यूएसची काशी केलीय... आता धास्ती बसलीय... जायची इच्छा आणि क्रेझ संपली... कुणी फुकटही नेलं तरी किमान तीन वर्ष जायची हिंमत होणार नाही... ... ३. १६-१७ ला मुंबईहून पुतणीला भेटण्यासाठी धुळ्याला आलो, २२ ला लॉकडाऊन लागलं... वाचलो... तिथे एकटा असतो तर "हाल"चा लाईफटाईम अनुभव मिळाला असता... मला चहा येतो फक्त, तो पण धड बनत नाही... बाकी कामाची बोंब... जे होतं चांगल्यासाठी होतं...! ... ४. फार डोकं उठलं तर दवंडी

खोपा शिडीला टांगला...

खोपा शिडीला टांगला... 'टाटा मोटर्स'चा, म्हणजे पिंपरी आणि चिंचवडच्या कारखान्याचा परिसर मोठा निसर्गरम्य आहे. पिंपरी वाघिरे भागातला एकेकाळी ओसाड, माळरान, खडकाळ, ओबडधोबड, दगडगोट्यांनी आणि काटेरी झुडुपांनी व्यापलेला सुमारे अठराशे एकरांचा हा परिसर आता वड, पिंपळ, औदुंबर, कदंब, कांचन, पांगार, बहावा, टबुबिया, कँशिया, स्पँथोडिया, ग्लिरिसिडिया, जँकरेंडा, पेल्टाफोरम, बाँटलब्रश, निरगिरी इ. कितीतरी बहुगुणी आणि पर्यावरण समृद्ध करणाऱ्या वृक्षांची लागवड केल्याने आता नंदनवन झालाय. नानाविध पक्षांचा तिथे मुक्त संचार असतो. पिंपरीच्या कारखान्याच्या परिसरात तर चक्क एका वाघोबानेही काही काळ तिथे निवास केल्याचे ऐकले असेल! जगविख्यात पक्षिनिरीक्षक डाँ. सलीम अली सुद्धा इथे पक्षी पाहण्यासाठी आवर्जून येत असत कधी कधी. चिंचवडचा प्लँट म्हणजे पूर्वीची 'इन्व्हेस्टा मशीन टूल्स कंपनी.'  'टेल्को' कंपनीने ती  ताब्यात घेऊन तिथे आपली ' मशीन टूल डिव्हिजन' सुरू केली. कालांतराने फौंड्री, ए पी डी इ. विभाग सुरू केले. तर या चिंचवडच्या कारखान्यात, उत्तरेला 'स्टँडर्स बिल्डिंग' नावाची, इंग्रजी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved