Posts

Showing posts with the label Shriyan Diaries

Drawings

माझं अडीच वर्षाचं लेकरु हुक्की आली की एक पेपर-पेन घेऊन येतं आणि पुढचा किमान तासभर एक एक ऑर्डर सोडतं... कालपासून हा नवीन उद्योग सापडलाय. ... पप्पा, मून काढ... स्टार काढ... त्यात एक एका कलरची व्हरायटी.  पप्पा, गाडी काढ... मग त्या गाड्यांच्या व्हरायटी निघतात. तुटकी गाडी, रेड गाडी, येल्लो गाडी, ग्रीन गाडी, पप्पाची गाडी, काकाची गाडी... मग ती गाडी बघून फिरायला जायचं आठवतं, काल संध्याकाळ पासून चार वेळा भुर्रर्रर्र चक्कर झालाय. गाडी, चोकोबार, चॉकलेट, एसी, श्रीयानचा शर्ट, श्रीयानचा हात, पप्पाचा हात, मम्मा, फोन, पंखा, चिऊ, काऊ, हत्ती, घोडा, मूनचा हात, बस, चाक आणि त्या प्रत्येकाच्या पाच-सहा व्हरायटी असं सगळं प्रकरण सुरु आहे... ... गोल गोल काढून त्याला डोळे, नाक, शेंडी लावली आणि ही कोण असं विचारलं की बरोब्बर सांगतो.  .. कालपासून शंभर-एक चित्रं आणि त्या चित्रांची मापं काढली गेलीय, त्याचं मन भरेपर्यंत नॉनस्टॉप सुरु असतं. एकूण सगळं खूप जबरदस्त आहे.

Shriyan and Songs

Image
माझ्या लेकराला दोन-तीन दिवसापासून twinkle twinkle little star गाण्याचा नाद लागलाय... त्याआधी कुठलंसं हिंदी गाणं होतं... बहुतेक "आपकी आँखोमे कुछ..." होतं..., त्याआधी किलबील... त्याच्यासमोर प्ले झालं आणि आवडलं... तिथून पारायणं सुरु होतात - जोपर्यंत दुसरं आवडत नाही तोपर्यंत... ... गर्भसंस्काराच्या काळात आम्ही त्याला प्रकृतीप्रमाणे - वेळा सांभाळून राग ऐकवायचो - कधी मी गायचो कधी त्याचा मामा, - किंवा रोजचा रियाजही समोर बसवून व्हायचा. त्यामूळे बहुतेक त्याचं गाणं उपजत आलंय, आणि जर तेच राग जर ऐकवले तर त्याचं एक्स्प्रेशन जबरदस्त असतं...  ... गाण्याचंही असंच - तेच तेच गाणं लूप मध्ये प्ले करावं लागतं, संपलं की एकीकडे याचा ठणाणा सुरु होतो... परत प्ले करा... दिवसभर जेव्हाही हुक्की येईल तेव्हा हा खेळ सुरु होतो, त्यात दुसरं गाणं लागलेलं चालत नाही, बंद केलेलं तर नाहीच नाही.. मध्ये मध्ये कुणी बोललेलं चालत नाही, तो ऐकतांना आपणही कंपनी दिलीच पाहीजे - तसे एक्स्प्रेशन्स दिलेच पाहीजे... जो कुणी या गाण्याच्या कार्यक्रमात त्याच्या हातात सापडला त्याची तासभर तरी सुटका होत ना...

खाSSरे

#गोड_गोष्टी ... तेजू आणि माझं लेकरु तिच्या माहेरी सेलूला आहे... ते पुढच्या महिन्यात येतील... त्याला मी पंधरा - वीस दिवसांत भेटायला जातो... आणि कधी कधी माझे मम्मी पप्पा सुद्धा सोबत असतात...  लेकराला माझ्या पप्पांचा आवाज, स्पर्श खूप कळतो...  आणि कितीही रडत असला तरीही पप्पांनी त्याला एकदा हाक मारली की गप्प बसतो... हसतो...! रडत असला तर पप्पा त्याला "का रे बाळा ... का रडतोय ?'' हे म्हणतात... त्याला ते "का रे बाळा" एकदम ओळखीचं झालंय...! पप्पा बोलले की तो हाताने ये ये करतो..! ... आज लस देवून आणलेली तर एकदम गाढ झोपला होता - तेजूच्या कॉलनीत खारे शेंगदाणे वगैरे विकणारी गाडी आली, तो माणूस "खाsssरे" म्हणत ओरडत होता... ते "खाsssरे" गाढ झोपलेल्या लेकराच्या कानावर आलं... त्याला ते "का रे - का रे" ऐकू आलं, आणि वाटलं पप्पा आले... लेकरु खुश होवून हसायला लागलं... हाताने ये ये सुरु केलं ... तो आवाज जसा जसा कमी होत गेला तसं त्याला कळलं आणि चेहऱ्यावरचं हसू सुद्धा कमी झालं... आवाज बंद झाला आणि लेकराने जोरदार भोंगा पसरला... ... ...

तंद्री

माझं अडीच महिन्याचं लेकरू अख्खा दिवस-रात्र गाजवतंय... झोपता झोपत नाही... मी पंधरा दिवसातून दोन-तीन दिवस तिथे जातो - पण माझी बायडी त्याच्या सेवेत २४ तास असते... तो मोठ्या मुष्कीलीने झोपतो, आणि झोपला तेवढ्याच वेळात तिला जेवण वैगेरे आवरावं लागतं...  त्यातही तो उठून उठून रडतो, तर सगळं सोडून त्याच्याभोवती रहावं लागतं.  दोघांच्याही डोक्यात तोच तो राहतो... ... आत्ताची गोष्ट -  मोठ्या मुष्कीलीने तो झोपला, तिने मला फोन केला -  मी - झोपला का ? ती - हो.. हुश्श... आत्ताच झोपला...! मी - (मी Naturally एकदम हळू आवाजात बोलायला लागलो...) हा बोल मग... काय करतेय ? ती - तू का इतक्या हळू आवाजात बोलतोय पण ? मी - तो झोपलाय तर उठेल ना परत...  ती - आहो... तू फोन वर आहेस तर कसा आवाज जाईल ? झोपेत ए का तू ? ... बाळाच्या नादात काय काय होतंय.... तंद्रीत तंद्रीत राहतोय आम्ही दोघंही.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved