Posts

Showing posts with the label Marathi

Biopic

कुठलाही मराठी सिनेमा स्पेशली बायोपीक फार फार एक किंवा दोन आठवडे सत्तर एम एम वर असतो, तिथे लाज काढून झाली कि झी टॉकीज प्रीमिअरच्या नावाखाली आठवड्यात दोन वेळा स्वतःला कानफाडून घेत असतो - त्यामुळे अकाउंटमधले पाचशे रुपये वळवळ करत नसतील तर दोन आठवडे थांबा आणि फुकटात घरबसल्या बघा... कारण - पाचशे रुपये खर्च करुन काहीतरी पदरात पडेल अश्या दर्जाचे कलाकार, विषय आणि सिनेमे येत नाही. सुबोध भावेनी बालगंधर्व केला, लोकमान्य केला - आता घसरून राहुल गांधी करणार बोललंय. प्रसाद ओक दिघे कमी, स्वस्तातला पुष्पा वाटतोय... झुकेगा नाही साला टाईप गद्दाराला माफी नाही वाटतंय... थोडक्यात - कास्टिंग गंडलय. .. कुठलाही बायोपीक बघून आपल्या आयुष्यात फार मोठी क्रांती होणार आहे असं नाही. कितीही सिरीयस विषय असला तरी काहीतरी किडा दिसतो आणि तो बघतांना हसू येतं... एमएसडी फक्त सिरियसली पाहिलेला, तिकीट विकत घेऊन. बाकी जवळपास सगळे सिनेमे टीव्हीवर आल्यावर किंवा वि च्या रिचार्जबरोबर हॉटस्टार फ्री मिळतं त्यावर बघितले. .. संजय राऊतांवर एखादा कॉमेडी बायोपीक निघावा. तो जबरदस्त चालेल. अमिषा पटेल समोर वाकलेले राऊत धडपडले, एनजीओप्लास्टिच्...

Raju Parulekar - Devendra Fadanavis Insider Interview

Image
परुळेकर - फडणवीस इनसाईडर चॅनेलची मुलाखत वेळ मिळेल तसं तीन-चार दिवसात बघून संपवली... ... फडणवीसांची आजपर्यंतची सर्वांत चांगली मुलाखत म्हणजे ही मुलाखत झालीय... तो माणूस मूळातच जबरदस्त आहे, पण जबरदस्त माणसाला बोलतं करण्यासाठी मुलाखत घेणाराही त्या तोडीचा असावा लागतो... राजू परुळेकरांना श्रेय द्यायलाच हवं... फडणवीस परुळेकरांना मुलाखत देतायेत ऐकल्यावर विरोधाच्या सूरात माझाही सूर होता, पण मुलाखत बघीतल्यानंतर फडणवीसांनी जे केलं ते योग्य केलं हे समजलं...! ... परुळेकर जुन्या फळीतले पत्रकार आहेत, त्यांची काही मतं पटत नाहीत, काही १०० टक्के पटतात - (स्पेशली : शिवसेनेबद्दलची...!) जसं, जगाचा-देशाचा अभ्यास नसेल, पण मुंबईसह महाराष्ट्राची आणि ठाकरसेनेची नस ते जाणून आहेत, परखड आहे... आणि मूळात हल्लीच्या जाधव, सरदेसाई वगैरे फडतूस लोकांसारखं बोलणाऱ्याला इन्टरप्ट न करता उत्तरं देण्यासाठी पुर्ण वेळ दिला...! चांगलं ते चांगलं म्हणायलाच हवं... परुळेकरांनी मुलाखत व्यवस्थित हँडल केली... अर्थात "ट्रोलर्सना सौम्य घ्यायला सांगा..." हे सांगणं त्यामागे आहेच... परुळेकरांची प्रतिमा थोड...

मराठी राजभाषा दिन २०२०

#मराठीराजभाषादिन ... = मी आणि माझी मराठी = ...  "मराठी" - स्वरुप, लिपी एक असली तरीही मराठी माझी वेगळी - तुमची वेगळी आहे - प्रत्येकासाठी ती त्याची त्याची असते... आईचं जागतिक महत्व, स्वरुप जरी एक असलं तरीही आपली आई - आपलीच आई असते... आपल्यासाठीच असते... मराठीचंही तसंच आहे... भाषा प्रत्येकासाठी वेगळ्या रुपात असते, स्वरूप एक, लिपी एक पण भाषा मात्र प्रत्येकाची वेगळी असते... प्रत्येकाला उमगलेली वेगळी असते, भेटलेली वेगळी असते... आपली आपली असते...! ... हे माझ्या मराठीविषयी...! ... माझ्या आई-पप्पांनी माझ्या आयुष्यातला पहीला उत्तम निर्णय कोणता घेतला असेल ? - तर मला मराठी शाळेत घालणं... मराठी शाळेत जे मराठी वळण लागलं, ते इतर कुठेही लागलं नसतं. लहानपणी मराठीतून लिहीणं - वाचणं शिकल्याने न आणि ण, ळ आणि ल, श आणि ष, जगातला ज आणि जनावरातला ज यांतला फरक कळल्याने उच्चार स्पष्ट झाले, आणि त्यामूळेच कदाचित गाणंही जमलं... मराठीतूनच शब्दाचा योग्य अर्थासहित उच्चार होतो, आणि समोरच्यापर्यंत पोहचतो. . मातृभाषा कशाला म्हणतात ? जी आपल्या मनाची भाषा असते... आणि मनाची भाषा असल्याने...

प्रिय एबीपी माझा,

प्रिय एबीपी माझा, व्यवसाय चालवतांना जर चुकूनही आपल्याकडून माती खाल्ली गेली, आणि एंड यूजर दुखावला गेला तर त्याच्यापुढे नाक घासून, प्रसंगी डोकं फोडून माफी मागावी... पण एकुण मामला शक्य तेवढा लवकर थंड करावा... तेच फायद्याचं ठरतं... . कारण जर प्रकरण एका लिमिटबाहेर गेलं तर त्याचा परिणाम आपल्या व्यवसायाचा प्राणवायू - म्हणजे पैसा तुटण्यावर होतो. आणि याचा शेवट व्यवसायासाठी खुप वाईट असतो... . एबीपी माझा इथेच चुकतंय. टायटल चुकलं किँवा कार्यक्रम चुकला - मान्य...! बोस्टन हाऊसमध्ये हाडामासाची माणसंच काम करतात. चुक होते ! . पण ट्विटर, फेसबूक आणि त्यांच्या ऑफीसला येणाऱ्‍या मेल्स, पत्र यांतून महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी (जे एंड यूजर्स आहेत) बिनशर्त माफी मागण्याची मागणी केली... जी प्रेक्षकांच्या दृष्टीने योग्य आहे - ती एबीपीने सातत्याने फाट्यावर मारली, ही घोडचूक ठरतेय... एबीपी माझा जरी स्वतंत्र चॅनेल असलं तरीही कार्यक्रम बघणारे प्रेक्षक आहेत, त्यांच्या संख्येनूसार जाहिराती देणारे जाहिरातदार आहेत... आणि एका चुकीमूळे प्रेक्षकांचा एक पुर्ण वर्ग जर दुरावत असेल तर व्यवसायासाठी ती धोक्याची घंटा आहे. . या प...

पु. ल.

१२ जून २००० पु. ल. या देवाचं अवतारकार्य संपला तो दिवस...! . शोधीसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी... त्याला पु. ल. तरी अपवाद कसे ठरतील...? पुलं तुम्हाला पुण्यात रुपालीच्या पहील्या मजल्यावर तर शोधूनही सापडणार नाहीत... पु.ल. त्यांच्या पुस्तकांची पारायणं करुनही भेटणार नाही... हा देव तुम्हाला अवतीभवती मात्र चराचरात दिसेल... . दातांच्या जागी छापखान्यातले खिळे बसवलेला आणि जिभेवर साक्षात सरस्वतीने मराठी भाषेचे क्लासेस उघडलेय अश्या सखाराम गटणेच्या रुपात... उघड्या तोँडाच्या पण तितक्याच प्रेमळ माणसांच्या अंतू बर्व्याच्या रुपात... सोसायटीच्या मिटीँग्समध्ये... मराठी शाळाशाळांत तर असंख्य चितळे मास्तर भेटतील... रावसाहेब तर गल्लीगल्लीत - घराघरात, घर म्हणून अख्खं गाव दाखवणाऱ्‍यांत पुलंची अनेक पात्र भेटतात... पोष्टातल्या काऊंटरमागच्या माणसाच्या टक्कलावर केस आले की आज सुद्धा मराठी माणूस त्याची बदली झाल्याचं लगेच ओळखतो... पहीली परदेशवारी आठवून बघा... पुलंना मिळाले तेच सल्ले आपल्यालाही मिळतात... लग्नकार्यात येणारा नारायण हल्ली कुणाच्या मयतालाही दिसतो... . तुम्ही मुंबईत विरारला राहतांना अ...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved