पु. ल.
१२ जून २००० पु. ल. या देवाचं अवतारकार्य संपला तो दिवस...! . शोधीसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी... त्याला पु. ल. तरी अपवाद कसे ठरतील...? पुलं तुम्हाला पुण्यात रुपालीच्या पहील्या मजल्यावर तर शोधूनही सापडणार नाहीत... पु.ल. त्यांच्या पुस्तकांची पारायणं करुनही भेटणार नाही... हा देव तुम्हाला अवतीभवती मात्र चराचरात दिसेल... . दातांच्या जागी छापखान्यातले खिळे बसवलेला आणि जिभेवर साक्षात सरस्वतीने मराठी भाषेचे क्लासेस उघडलेय अश्या सखाराम गटणेच्या रुपात... उघड्या तोँडाच्या पण तितक्याच प्रेमळ माणसांच्या अंतू बर्व्याच्या रुपात... सोसायटीच्या मिटीँग्समध्ये... मराठी शाळाशाळांत तर असंख्य चितळे मास्तर भेटतील... रावसाहेब तर गल्लीगल्लीत - घराघरात, घर म्हणून अख्खं गाव दाखवणाऱ्यांत पुलंची अनेक पात्र भेटतात... पोष्टातल्या काऊंटरमागच्या माणसाच्या टक्कलावर केस आले की आज सुद्धा मराठी माणूस त्याची बदली झाल्याचं लगेच ओळखतो... पहीली परदेशवारी आठवून बघा... पुलंना मिळाले तेच सल्ले आपल्यालाही मिळतात... लग्नकार्यात येणारा नारायण हल्ली कुणाच्या मयतालाही दिसतो... . तुम्ही मुंबईत विरारला राहतांना अ...