Posts

Showing posts with the label Life Experiences

गुरुपोर्णीमा २०२०

Image
आस्तीक-नास्तीकच्या गोंधळा पलीकडे, तर्कविज्ञान आणि शास्त्र यातल्या रेषा बोथट झाल्यानंतर एक गोष्ट पटलीय, ती म्हणजे गुरुंशिवाय आयुष्याला अर्थ नाही...! भवसागरात आयुष्याची नौका हिंदोळे घेते, वादळं सहन करते, पण भरकटत नाही, खडकावर आपटून फुटत नाही - गुरु त्या नौकेला पार लावतात... मार्ग दाखवतात, फक्त विश्वास असावा...! तिथे तर्क चालत नाही, शास्त्राचे नियम चालत नाही, मोजमाप तर नाहीच नाही...! हा मार्ग तर्काचा नाही, अनुभवांचा, आणि अनुभूतीचा आहे...!  ... गुरुस्थान अशी एक जागा आहे जिथे आपल्या मनातला प्रश्न सहज मांडता येईल, उत्तर मिळेल याची खात्री असेल, ते आपल्याला चुकू देणार नाही याची माहिती असेल, आपण आपल्या कर्मानं चुक केली तर तडाखा बसेल याची भिती असते. ती शक्ती आपल्यावर सदैव लक्ष ठेवून आहे ही जाणीव आणि आपल्याकडे सदैव लक्ष ठेवून आहे हा विश्वास असतो...! "मी" पणाचा फसवेपणा त्यांच्यासमोर क्षणार्धात गळून पडतो - खरं तर "मी" असा उरतच नाही, एकरूपता येते... मोक्ष मिळाल्यानंतर निर्विकार मन होत असावं, गुरुसानिध्य त्या निर्विकार, एकरुप मनाची जाणीव करून देतं...! ... आ...

TK Prosperity Private Limited

Image
२९ मे २०२०... २०१५ शेवटापर्यंत एका मराठी न्यूज चॅनेलमध्ये टाईमपास करत होतो... दुसरीकडे पुण्यात MCA सुरु होतं...! मास्टर्स पुर्ण झालं आणि मी माझ्या मूळ ट्रॅकवर आलो... म्हणजे टेक्नॉलॉजी बेस्ड !... छोटे छोटे प्रोजेक्ट घेणं सुरु होतं... कॉलेजमध्ये कॅम्पस होत होते... फ्लो विथ् फ्लो सारखं सगळे देतात तसं इंटरव्ह्यू सेशन्सही सुरु होते... ... मनात आयुष्यासाठी विशलिस्ट असते - भविष्यात उद्योग उभा करायचाय असं माझ्या विशलिस्ट मध्ये होतं - फेसबुकवर Quotations मध्ये "चांगल्या पगाराची नोकरी करणारा होण्यापेक्षा, चांगल्या पगाराची नोकरी देणारा होईल" हे वाक्य खुप आधीपासून आहे...  MCA होतांना ती इच्छा प्रखर होत होती, आणि त्या इच्छेला त्या दरम्यान हवा मिळाली -  इच्छा म्हणजे एक गोल सेट झालं...! हवा मिळण्याची स्टोरी भन्नाट आहे...  एक मराठी सिनेमा आहे : वन रुम किचन. भरत जाधवचा... त्यात भरत जाधव एका मिलमध्ये काम करतो... चाळीत राहतो... एकदा तो आणि त्याची बायको बायकोच्या मैत्रिणीला भेटायला जातात ... मोठ्ठी सोसायटी, जबरदस्त फ्लॅट... तिथे त्या मैत्रिणीचा नवरा राजेश श्रृंगारपू...

व्यवसायिक प्रयोग

= व्यवसायिक प्रयोग = . २०१९ हे वर्ष टि.के. गृपला उत्तम व्यवसायिक अनुभव देणारं ठरलं... आमचे काही प्रयोग प्रचंड यशस्वी ठरले. आणि ज्यातून गेल्या कॅलेंडर वर्षीच्या तुलनेत कंपनीची वाढ आणि फायदा अपेक्षेपेक्षा जास्त दिसतोय... ते प्रयोग कंपनीच्या पहिल्या पाच वर्षात धाडस ठरावं असं होतं. कंसेप्ट माझ्या बायकोनी दिली... आधी धाकधूक होती - पण आता जेव्हा आम्ही Analysis केलं तेव्हा त्यातलं यश स्पष्ट दिसतंय. .. प्रयोग १ : MoU - TieUp आमचे प्रमुख ४ डोमेन्स आहेत. Technology (Software), Consultancy and HR, Education (School) and Media (Production)... आम्ही या वर्षी Individual Expansion सह MoU and TieUp किंवा Joint Expansion चा प्रयोग केला. म्हणजे कसं ? - तर, ज्या कंपनी किंवा स्टार्टअप गृप्स समव्यवसायात आहेत त्यांना आम्ही आमंत्रित केलं. आणि त्यांच्याशी MoU करुन जॉइंट प्रोजेक्टस् सुरू केले. जे स्टार्टअप होते त्यांना आमचा फायदा झाला, त्यांच्या Innovation and Skill Set चा आम्हाला फायदा झाला...! मुंबईत ३, पुण्यात ४ आणि नाशिकमध्ये १ असं Association झालं...! आम्ही Individual Asset म्हणून आहो...

वरची रेषा मोठी करण्यासाठी खालची रेषा लहान काढावी लागते

Image
एखाद्या गोष्टीचा कंटाळा आला असेल किँवा निवड करण्यात गडबड होत असेल तर साधं आणि सोप्पं काम करावं - त्यापेक्षा वाह्यात गोष्टीचा अनूभव घ्यावा... मी अनेकदा असं ट्राय केलंय... . बायकोला गोरेगांवला आवडत नव्हतं. काही ना काही कमी वाटायचं... माझं ऑफीस अंधेरीत, आणि आधीपासून सवय वेस्टर्नची आहे त्यामूळे मी शक्यतोवर वेस्टर्नलाच राहण्याचा ट्राय करतो... मागचा पुर्ण आठवडा तिला फिरवलं... नालासोपारा, वसई रोड, विरार पर्यँत. सेँट्रल लाईनला उल्हासनगर, बदलापूर वगैरे, नवी मुंबईत पनवेल पर्यँत... आता  गोरेगांव आमच्यासाठी स्वर्ग झालंय  :-D . मी स्वत: पुणे की मुंबई अश्या निवडीत अडकलो होतो. तेव्हा एकीकडे मुंबईतल्या इंडस्ट्रीचे फोटो लावले आणि दुसरीकडे पुण्यातल्या मंडईचे... मला तिथली टिपीकल कचकच आवडत नाही. त्यामूळे मुंबईची निवड मला सहज वाटली. . करंट अकाऊंट महाराष्ट्र बॅँकेत उघडावं की नको याच्या विचारात होतो. मी एक दोनदा एसबीआय जावून आलो. आता महाराष्ट्र बॅँकेत अकाऊंट आहे. . गाडी घेवून ऑफीसला जायचं नाही... बाईकवर मस्त वाटतं. .. मनात फूटबॉल सुरु होतं... त्यामूळे रोजच्या ट्रॅकवर मुद्दाम ट्राफीकच्या वेळेला गेलो...

= बहीण =

काही गोष्टीँना रक्ताच्या नात्याचं कंम्पलशन नसतं... ते कुठेही फुलतं, घट्ट होतं... टिकतं... काही नाती अशीच आयुष्यात आली, बहरली... रक्ताच्या नात्यांइतकीच ती नाती घट्ट झाली... कदाचित कणभर जास्तच ! . ही नाती कुठे जुळली कशी जुळली हे आता निट आठवतही नाही... पण वीण घट्ट आहे. . पुण्यातल्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तिच्या वडीलांची ट्रिटमेँट सुरु होती आणि त्यात कुठलीशी फॉर्म्यालिटी करण्यासाठी ओळख हवी होती. तिचा मला फोन आला, फॉर्म्यालिटीज पुर्ण झाल्या. पुढच्या रक्षाबंधनाला राख्या आल्यात. वैयक्तीक नातं कौटूंबिक झालं... ! ७ वर्षाँपासून आता दर रक्षाबंधनाला राख्या येतात. दर आठवड्याला फोन येतात. तिला माझ्या घरी सख्ख्या मुलीप्रमाणे समजतात... तिच्या नवऱ्‍याविषयी सख्या मेव्हण्यासारखा आदर वाटतो... सख्खी मोठी बहीण असती तर तिने जो जीव लावला असता तोच सायलीदिदी लावतेय... ती कुणालाही सांगतांना तिला तीन भाऊ असल्याचं सांगते...! नशीबानं मिळतात काही गोष्टी.. !. . मयुरी-वर्षा... नाशिकच्या दोघी बहीणी. कुठे ओळख झाली, कधी झाली आठवत नाही... राखीसाठी येतात, भाऊबीजेला येतात. कुटूंबही एकमेकांशी दुधात साखर एक व्हावी तशी झाली.....

Saved Business

एका जवळच्या मित्राचा काल संध्याकाळी फोन आलेला. "तेजा, भेटूयात.. जरा महत्वाचं बोलायचंय. !"... मुंबईत एका प्रोजेक्टमध्ये भेटलेलो आम्ही... दोघेही देशस्थ... मी खान्देशातला, तो विदर्भातला... आणि जवळपास एकाच वेळी आपापल्या व्यवसायात स्टार्टअप केलेलं...! त्यामूळे एकमेकां सहाय्य उक्ती जागत आम्ही चार-पाच प्रोजेक्ट एकत्र केले... बऱ्‍यापैकी फायदा झाला... त्याची कंपनी सुद्धा हळू हळू वाढायला लागली... तीन वर्षात जितकी हवी त्यापेक्षा काही टक्के चांगलीच... . आज सकाळी तो घरी आला... चेहर प्रचंड दडपणात असलेला... उसनं हसू आणत त्याने गुड मॉर्निँग वगैरे केलं... "तेजा, सॉरी यार - खूप सकाळीच आलो घरी. थोडं महत्वाचं बोलायचंय..." एरव्ही तेजासेठ बोलत पाठीवर जोरदार फटका देत बोलणारा तो आज एकदम गरीब गाय झालेला. म्हणजे नक्कीच सिरीयस मॅटर असणार... त्याचं एका पोरीसोबत दोन वर्षाँपासून प्रकरण चालू होतं. त्यात बऱ्‍याचदा मोठी भांडणं झालेली, मी घरचं कार्य समजून सोडवलीय... त्यामूळे हा तिच्यामूळे व्यथितबिथीत झालाय कां ? आणि हो, तर आता पुन्हा दोन तास याचं देवदास ऐकावं लागणार म्हणून माझ्या चेहऱ्‍यावर प्रश्ना...

उंगली टेढी

Image
= उंगली टेढी = . धुळे टू मुंबई असं स्लीपर गाडीचं तिकीट कालच्या प्रवासासाठी मी परवा सकाळीच पोर्टल वरुन बुक केलं... कन्फर्मेशन मेसेज आला. रिटर्न तिकीटाच्या भरवश्यावर मी ट्रिप प्लान केली... धुळ्यात आलो...! काम झालं की रात्री परत मुंबईला जाता येईल अशी तयारी केली... आणि काल सकाळी आठ वाजताच त्या पोर्टलचा गाडी कॅन्सल झाल्याचा आणि १००% रिफंड झाल्याचा मेसेज आला... व्यवहार संपला ! दुसरी गाडी थोड्यावेळात बघू म्हणून ते बाजूला ठेवलं. . नऊ-साडेनऊला ट्रॅवल्सच्या ऑफीसमधून फोन आला. - "सर, ती गाडी कॅन्सल झालीय, तर आम्ही तुम्हाला दुसऱ्‍या गाडीत शिफ्ट करु कां ?" - चालेल. पण गाडी कोणती आहे ? - सिटीँग आहे... - आणि चार्जेस ? - आधीच्या गाडीइतकेच... ७०० ! - पण ही सिटीँग आहे ना ? - हो. पण चार्जेस सेम आहेत. - मग नको. माझं बुकीँग कॅन्सल करा. मी दुसऱ्‍या स्लीपर गाडीनं जाईल... सिटीँगला नको. - ठिक आहे. विषय संपला. पावसाच्या बातम्या आणि गाड्यांना गर्दी असल्याने मी पण कालचं जाणं कॅन्सल केलं. . सकाळीच प्रकरणाचा निकाल लावल्यानंतरही काल संध्याकाळ पर्यँत त्यांच्या बुकीँग कन्फर्म - बुकीँग कॅन्सलच्या मेसेजेसचे आप...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved