Be Safe...!
(लेख थोडा मोठा आहे - पण तुमच्या नक्की कामी येईल.... वाचतांना शांत डोक्याने वाचा. एक एक गोष्ट समजून घेत वाचा.) सायबर गुन्ह्यांबद्दल गेल्या तीन ते चार दिवसात बरंच काही घडलंय. आणि बँकेकडून तसेच सायबर तज्ञांकडून याबाबतीत युद्धपातळीवर जनजागृती सुरुय. महाराष्ट्र बँकेने तर काल दुपारी प्रत्येकाला याबद्दल मेसेज सुद्धा केले. आपणच आपल्या माहितीची आणि पैश्यांची सुरक्षा करू शकतो. आयटी क्षेत्रात काम करतांना यातील खाचा किंवा पळवाटा ओळखून मी स्वतःसाठी सुरक्षा तयार केलीय. पुढील काही दिवस याबद्दल डीटेल्स बोलू, वाटल्यास लाइव चर्चा करू. जितकी माहिती मला आहे ती मी शेअर करतो, जितकी तुम्हाला आहे तितकी तुम्ही करा... बँक खाते, आपले सोशल मिडिया खाते, आपली ओळख, वैयक्तिक आयुष्य या सगळ्यांवर कुठेतरी प्रभाव पडतोय. त्यामुळे एक एक गोष्ट आपण सुरक्षित करत जाऊ... मी सगळ्यात आधी बँकेतल्या पैशांची सुरक्षा कशी केलीय ते सांगतो. ते इथे सांगण्यात धोका नाही, कारण त्यापर्यंत पोहचण्याचा मार्गच नाहीय. तत्पूर्वी - मी स्वतः स्पॅम मेल्स न उघडणं, अवांतर लिंक्स न उघडणं, एटीएमचा वापर सावधपणे करणे हि काळजी घेतो... ...