Posts

Showing posts with the label Business Experience

TK Prosperity Private Limited

Image
२९ मे २०२०... २०१५ शेवटापर्यंत एका मराठी न्यूज चॅनेलमध्ये टाईमपास करत होतो... दुसरीकडे पुण्यात MCA सुरु होतं...! मास्टर्स पुर्ण झालं आणि मी माझ्या मूळ ट्रॅकवर आलो... म्हणजे टेक्नॉलॉजी बेस्ड !... छोटे छोटे प्रोजेक्ट घेणं सुरु होतं... कॉलेजमध्ये कॅम्पस होत होते... फ्लो विथ् फ्लो सारखं सगळे देतात तसं इंटरव्ह्यू सेशन्सही सुरु होते... ... मनात आयुष्यासाठी विशलिस्ट असते - भविष्यात उद्योग उभा करायचाय असं माझ्या विशलिस्ट मध्ये होतं - फेसबुकवर Quotations मध्ये "चांगल्या पगाराची नोकरी करणारा होण्यापेक्षा, चांगल्या पगाराची नोकरी देणारा होईल" हे वाक्य खुप आधीपासून आहे...  MCA होतांना ती इच्छा प्रखर होत होती, आणि त्या इच्छेला त्या दरम्यान हवा मिळाली -  इच्छा म्हणजे एक गोल सेट झालं...! हवा मिळण्याची स्टोरी भन्नाट आहे...  एक मराठी सिनेमा आहे : वन रुम किचन. भरत जाधवचा... त्यात भरत जाधव एका मिलमध्ये काम करतो... चाळीत राहतो... एकदा तो आणि त्याची बायको बायकोच्या मैत्रिणीला भेटायला जातात ... मोठ्ठी सोसायटी, जबरदस्त फ्लॅट... तिथे त्या मैत्रिणीचा नवरा राजेश श्रृंगारपू...

Business Motivation Speakers are...

बिजनेस मॉडल, स्ट्रॅटेजीज्, Constitution या गोष्टी कधीच कॉपी करु नये - फुकटचे सल्ले वापरून तर नाहीच नाही. कारण प्रत्येक व्यवसाय, तो चालवणाऱ्याला माणसाचं गोल, स्वभाव, अडथळे, आयडीयाज् वेगवेगळ्या असतात... सणक वेगळी असते... मी तर म्हणतो लोगो, टॅगलाईन, प्रोफाईल्स आणि घटना ही पुर्णपणे स्वतःच्या हाताने लिहावी.... थोडे एक्स्ट्रा लागतील - पण काम म्हणजे काम होईल ! तर आणि तरच कुठल्याही संकटात आपला व्यवसाय टिकवून ठेवण्याचं बळ मिळतं... आपण किती पाण्यात आहे, आणि स्टाफ पाण्यात उतरतोय की कपडे सांभाळतोय, वेळप्रसंगी हातातली अदृष्य दोरी ओढून स्टाफला पाण्यात ओढण्याची आपल्यात धमक आहे की नाही हे सगळं कळतं...! जन्माला घालतो तोच संकटात रक्षण करतो... आपण व्यवसाय उभा केलाय तर तो आपल्यालाच मजबूत करावा लागतो... ... हजारो रुपये घेवून मोटीवेशनल लेक्चर्स ठोकणाऱ्यांच्या नादी लागू नका... ढिगानं रोज जन्माला येतात - जातात... कुठलातरी नितीवाला गेले दहा दिवस फोन करून मागे लागला होता, "व्यवसायिकांसाठी कोरोनानंतरच्या संधी आणि आव्हानं" यावर ऑनलाईन ट्रेनिंग घ्या म्हणून... फि : ३९९९९ फक्त ! प...

व्यवसायिक प्रयोग

= व्यवसायिक प्रयोग = . २०१९ हे वर्ष टि.के. गृपला उत्तम व्यवसायिक अनुभव देणारं ठरलं... आमचे काही प्रयोग प्रचंड यशस्वी ठरले. आणि ज्यातून गेल्या कॅलेंडर वर्षीच्या तुलनेत कंपनीची वाढ आणि फायदा अपेक्षेपेक्षा जास्त दिसतोय... ते प्रयोग कंपनीच्या पहिल्या पाच वर्षात धाडस ठरावं असं होतं. कंसेप्ट माझ्या बायकोनी दिली... आधी धाकधूक होती - पण आता जेव्हा आम्ही Analysis केलं तेव्हा त्यातलं यश स्पष्ट दिसतंय. .. प्रयोग १ : MoU - TieUp आमचे प्रमुख ४ डोमेन्स आहेत. Technology (Software), Consultancy and HR, Education (School) and Media (Production)... आम्ही या वर्षी Individual Expansion सह MoU and TieUp किंवा Joint Expansion चा प्रयोग केला. म्हणजे कसं ? - तर, ज्या कंपनी किंवा स्टार्टअप गृप्स समव्यवसायात आहेत त्यांना आम्ही आमंत्रित केलं. आणि त्यांच्याशी MoU करुन जॉइंट प्रोजेक्टस् सुरू केले. जे स्टार्टअप होते त्यांना आमचा फायदा झाला, त्यांच्या Innovation and Skill Set चा आम्हाला फायदा झाला...! मुंबईत ३, पुण्यात ४ आणि नाशिकमध्ये १ असं Association झालं...! आम्ही Individual Asset म्हणून आहो...

नगासी महानग

= व्यवसायातले नग = ... साधारण दहा महिन्यांपूर्वी फेबुवारीत एक महोदया अंधेरी ऑफीसला जॉईन झाली...! जावा प्रोफाईल, दोन वर्षांचा आधीचा अनुभव होता... टू पॉइंट फोरचं पॅकेज दिलं...! जॉईन क...

व्यवसायात भेटणारे नग

. ओळखीचं कुटूंब एका कौटूंबिक सोहळ्यात भेटलं... त्यातल्या काकांशी ओळख तशी जुनी. काकू पहिल्यांदाच भेटल्या. त्यांचा एक मुलगा आहे, माझ्यापेक्षा वयाने १० वर्ष मोठा. ज्याने काहीतरी प्रोजेक्ट केलाय...! असा एकूण बॅकग्राऊंड - आता काकू आणि त्यांचा मुलगा "नग" कसे झाले याची ही कहाणी. . कौटूंबिक सोहळ्यात भेटल्यावर कसं काय याची विचारपूस झाली आणि काकूंनी त्यांच्या मुलाची ओळख सांगितली. त्याने कुठलातरी ग्राफीक्स मध्ये प्रोजेक्ट केलाय... तो मुलगा त्यावेळी तिथे नव्हता. त्याला स्टार्टअप करायचंय, आणि अॅज अ इस्टॅब्लीश्ड् सेटअप तू त्याला मदत कर - इति काकू. व्यवसाय, शिक्षण किँवा नोकरी यासाठी ज्याला मदत हवी त्याला माझ्याकडून शक्य ती (आर्थिक : क्षमस्व) मदत करायचा मी प्रयत्न करतो. त्यात कधी कधी चांगले प्रोजेक्टस मलाही मिळतात - अर्थातच व्यवसायिक फायदा होतो. प्रामाणिक मदत करतो, बाकी ज्याचं त्याचं तो जाणे. . तर, काकूंनी त्यांच्या मुलाला मदत करण्याबद्दल सांगितलं... मी त्या धावपळीत माझं कार्ड दिलं. आणि त्याला फोन करायला सांगा, किँवा मुंबईला ऑफीसला पाठवा म्हणून बोललो. . दोन दिवस गेले, काकूंचा फोन आला. - मी ...

Saved Business

एका जवळच्या मित्राचा काल संध्याकाळी फोन आलेला. "तेजा, भेटूयात.. जरा महत्वाचं बोलायचंय. !"... मुंबईत एका प्रोजेक्टमध्ये भेटलेलो आम्ही... दोघेही देशस्थ... मी खान्देशातला, तो विदर्भातला... आणि जवळपास एकाच वेळी आपापल्या व्यवसायात स्टार्टअप केलेलं...! त्यामूळे एकमेकां सहाय्य उक्ती जागत आम्ही चार-पाच प्रोजेक्ट एकत्र केले... बऱ्‍यापैकी फायदा झाला... त्याची कंपनी सुद्धा हळू हळू वाढायला लागली... तीन वर्षात जितकी हवी त्यापेक्षा काही टक्के चांगलीच... . आज सकाळी तो घरी आला... चेहर प्रचंड दडपणात असलेला... उसनं हसू आणत त्याने गुड मॉर्निँग वगैरे केलं... "तेजा, सॉरी यार - खूप सकाळीच आलो घरी. थोडं महत्वाचं बोलायचंय..." एरव्ही तेजासेठ बोलत पाठीवर जोरदार फटका देत बोलणारा तो आज एकदम गरीब गाय झालेला. म्हणजे नक्कीच सिरीयस मॅटर असणार... त्याचं एका पोरीसोबत दोन वर्षाँपासून प्रकरण चालू होतं. त्यात बऱ्‍याचदा मोठी भांडणं झालेली, मी घरचं कार्य समजून सोडवलीय... त्यामूळे हा तिच्यामूळे व्यथितबिथीत झालाय कां ? आणि हो, तर आता पुन्हा दोन तास याचं देवदास ऐकावं लागणार म्हणून माझ्या चेहऱ्‍यावर प्रश्ना...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved