Posts

Showing posts with the label Dhule

मराठी राजभाषा दिन २०२०

#मराठीराजभाषादिन ... = मी आणि माझी मराठी = ...  "मराठी" - स्वरुप, लिपी एक असली तरीही मराठी माझी वेगळी - तुमची वेगळी आहे - प्रत्येकासाठी ती त्याची त्याची असते... आईचं जागतिक महत्व, स्वरुप जरी एक असलं तरीही आपली आई - आपलीच आई असते... आपल्यासाठीच असते... मराठीचंही तसंच आहे... भाषा प्रत्येकासाठी वेगळ्या रुपात असते, स्वरूप एक, लिपी एक पण भाषा मात्र प्रत्येकाची वेगळी असते... प्रत्येकाला उमगलेली वेगळी असते, भेटलेली वेगळी असते... आपली आपली असते...! ... हे माझ्या मराठीविषयी...! ... माझ्या आई-पप्पांनी माझ्या आयुष्यातला पहीला उत्तम निर्णय कोणता घेतला असेल ? - तर मला मराठी शाळेत घालणं... मराठी शाळेत जे मराठी वळण लागलं, ते इतर कुठेही लागलं नसतं. लहानपणी मराठीतून लिहीणं - वाचणं शिकल्याने न आणि ण, ळ आणि ल, श आणि ष, जगातला ज आणि जनावरातला ज यांतला फरक कळल्याने उच्चार स्पष्ट झाले, आणि त्यामूळेच कदाचित गाणंही जमलं... मराठीतूनच शब्दाचा योग्य अर्थासहित उच्चार होतो, आणि समोरच्यापर्यंत पोहचतो. . मातृभाषा कशाला म्हणतात ? जी आपल्या मनाची भाषा असते... आणि मनाची भाषा असल्याने...

Dhule, Gote and Elections

Image
धुळे शहरात तुला ना मला घाल ...ला.... . लोकसंग्रामचे गोटे, अपक्ष कदमबांडे यांच्या लढतीत एमआयएमचा उमेदवार निवडून आलाय...! . माझं मतदान याच मतदारसंघात आहे... . हे धक्कादायक झालंय...! .. काय झालं ? धुळे शहरात मतदान झालं ५० टक्के - त्यालाही कमी. अनिल गोटे यांचा पिंड संघाचा आहे, आणि धुळ्यात त्यांनी केलेली कामे तुफान आहेत. त्यामुळे लोकांनी ३ वेळा केवळ त्यांच्या नावावर निवडून दिलं. अगदी यावेळी देखील तेच येतात असं चित्र होतं. भाजपचे आमदार अनिल गोटेंनी आधी महापालिका, मग लोकसभेवेळी भाजपाची पिसे काढली होती. ज्यामुळे गिरीश महाजन शहरात येऊन अनिल गोटे कसे जिंकतात हे मी बघतोच वैगेरे गोष्टी करून गेले. शहर विधानसभा सुटली सेनेला - आणि सेनेने जो उमेदवार दिला तो मुळात शहरात लढायलाच तयार नव्हता. त्यांचं होमपीच धुळे ग्रामीण (धुळे बाह्य भाग) आहे. त्याला ऐनवेळी उभा केला. त्यामुळे अर्धी लढाई इथेच संपली. दुसरा उमेदवार अपक्ष उभा होता (फुगा)... ज्यांच्याकडून गोटेंना फाईट मिळेल असं वाटलं. ते उमेदवार आधी राष्ट्रवादी मधून बाहेर पडले, आणि अपक्ष लढले. जिथे शहरात विकास हा एकमेव मुद्द...

उंगली टेढी

Image
= उंगली टेढी = . धुळे टू मुंबई असं स्लीपर गाडीचं तिकीट कालच्या प्रवासासाठी मी परवा सकाळीच पोर्टल वरुन बुक केलं... कन्फर्मेशन मेसेज आला. रिटर्न तिकीटाच्या भरवश्यावर मी ट्रिप प्लान केली... धुळ्यात आलो...! काम झालं की रात्री परत मुंबईला जाता येईल अशी तयारी केली... आणि काल सकाळी आठ वाजताच त्या पोर्टलचा गाडी कॅन्सल झाल्याचा आणि १००% रिफंड झाल्याचा मेसेज आला... व्यवहार संपला ! दुसरी गाडी थोड्यावेळात बघू म्हणून ते बाजूला ठेवलं. . नऊ-साडेनऊला ट्रॅवल्सच्या ऑफीसमधून फोन आला. - "सर, ती गाडी कॅन्सल झालीय, तर आम्ही तुम्हाला दुसऱ्‍या गाडीत शिफ्ट करु कां ?" - चालेल. पण गाडी कोणती आहे ? - सिटीँग आहे... - आणि चार्जेस ? - आधीच्या गाडीइतकेच... ७०० ! - पण ही सिटीँग आहे ना ? - हो. पण चार्जेस सेम आहेत. - मग नको. माझं बुकीँग कॅन्सल करा. मी दुसऱ्‍या स्लीपर गाडीनं जाईल... सिटीँगला नको. - ठिक आहे. विषय संपला. पावसाच्या बातम्या आणि गाड्यांना गर्दी असल्याने मी पण कालचं जाणं कॅन्सल केलं. . सकाळीच प्रकरणाचा निकाल लावल्यानंतरही काल संध्याकाळ पर्यँत त्यांच्या बुकीँग कन्फर्म - बुकीँग कॅन्सलच्या मेसेजेसचे आप...

Vote India Vote

मतदान करा "च" !  लोकसभेची निवडणूक रोज रोज येत नाही. १०० वर्ष जगलो तर आपल्या उभ्या आयुष्यात जास्तीत जास्त १६ - १७ लोकसभा येतात. त्यात मतदानाला जाणं - मतदानाची प्रक्रीया करणं - परत येणं, यात अर्धा ते पाऊण तास, खुप झालं तर १ तास जातो. दर ५ वर्षातला हा १ तास आपण देशाचा पंतप्रधान असतो, राजा असतो. पुढच्या पाच वर्षासाठी देशाचं धोरण आपण ठरवत असतो. अनेक योजना, महत्वाचे कायदे पास करत असतो. देशाचा विकास करत असतो. म्हणजे पुर्ण आयुष्यात जास्तित जास्त फक्त १७ तास आपल्याला ही संधी मिळते. उद्याचा दिवस तसाच... राजा असण्याचा. पंतप्रधान असण्याचा. मतदान करा !  हक्क आहे आपला, तो मिळवा. पुढच्या पाच वर्षात देश जी काही प्रगती करेल तिचे आपण बरोबरीचे शिल्पकार असू, जबाबदार असू...! त्यामूळे मतदान करा.... कराच !  उद्याचा दिवस पंतप्रधान व्हा !  राजा व्हा ! - तेजस कुळकर्णी  ... मतदानाची आजची पूर्वतयारी : .. १. आपलं मतदान कुठल्या केंद्रावर आहे याची खात्री करा. यासाठी https:://www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा Voter Helpline App वर मार्गदर्शन मिळेल. त्यावरून ...

खुनी गणपती Khuni Ganapati

Image
"खुनी गणपती" ... नांव वाचून आश्चर्य वाटलं नं ? पण हा धुळ्यातला मानाचा गणपती आहे... ! फोटोत दिसतंय ते खुनी गणपतीची - खुनी मशिदीजवळ होते ती ऐतिहासिक महत्व असलेली महापूजा...!  . १८९५ मध्ये खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनीक गणेशोत्सव सुरु केला. त्या गणेशाची विसर्जन मिरवणूक १००० वर्ष जून्या शाही जामा मशिदीवरुन सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी पालखीतून जात होती. त्यावेळी विरोध झाला... त्याचं रुपांतर हाणामारीत झालं आणि ब्रिटीशांनी गोळीबार केला. त्यात बरेच लोक मृत्यूमुखी पडले, जखमी झाले... आणि आहिराणीत "त्या मशिदजवळ खून पडनात", "खुन नी मसिद", गणपतीना वकतले तथा खून पडनात"... या चर्चांमूळे मशिदीला खुनी मशिद आणि गणपतीला खुनी गणपती नांव प्रचलीत झालं...! त्यावेळी ५ दिवस गणपती त्या मशिदीसमोर होता... .. पुढे ब्रिटीशांनी दोन्ही गटात समेट घडवला आणि एकमेकांच्या धर्माच्या सन्मानासाठी ठोस पाऊल उचललं. ब्रिटीशांकडून २२८ रुपये दोन्ही गटांना दिले जातात. आणि त्यातून ही ऐतिहासिक प्रथा सुरु झाली. .. दर अनंत चर्तुदशीला गणपतीची विसर्जन ...

डोलची : धुळ्यातली होळी

Image
धुळ्यात होळी म्हणजे प्रेमानं ऑ ऑ करुन चेष्टेनं रंग लावणं नसतं ... इथल्या लोकांत सुप्त / उपजत आडदांडपणा असतो. जो होळीला उफाळून येतो... ! .. धुळ्यात पिचकारीनं नाही - डोलचीने होळी खे...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved