Posts

Showing posts with the label CopyPaste

नापास सरकार... हतबल दरबार

जे पाच लाॅकडाऊन मध्ये साध्य झालं नाही ते सहाव्या लाॅकडाऊन मध्ये होईल ही महाराष्ट्र शासनाची अपेक्षा व्यर्थ आहे. काहीतरी रणनितीमधे (strategy), दृष्टीकोनामधे (approach), गृहितकांमध्ये (premise / assumptions) बदल केल्याशिवाय आणि व्यवहारी (practical) परंतु सृजनशील विचार (creative thinking) केल्याशिवाय गत्यंतर नाही.  सरसकट “लाॅकडाऊन” टाळला पाहिजे. शासनकलेमध्ये (statecraft) सूक्ष्मनियोजनाची (micro-planning) एक पध्दत आहे. ती अवलंबवून स्थानिक परिस्थितीचा नेमका अंदाज घेऊन नियोजन केलं पाहिजे. अंमलबजावणीचे अधिकार विकेंद्रीत केले पाहिजेत.   साथीच्या रोगाचा प्रतिकार कसा करायचा ह्यासाठी साथरोग नियंत्रणाची जी नियमपुस्तिका (rule-book) आहे त्यात स्वयंसेवी संस्था, वस्ती पातळीवरील नेते, प्रभाव असलेल्या व्यक्ती आणि स्थानिक भाषेत संदेश (efrective local communication) देणं महत्वाचं असतं.. ते इथे काहीही झालं नाही.  “लाॅकडाऊन” चे दोन प्रमुख उद्देश असतात. १) संसर्ग रोखणे; आणि २) शासनपातळीवर क्षमता (तपासणी, मागोवा, उपचार) वाढवणे. दोन्हीमध्ये महाराष्ट्र शासन पहिल्या पाच “लाॅकडाऊन” मध्य...

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन - द बिगेस्ट ड्रामा (साभार : सोर्स - अज्ञात )

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन - द बिगेस्ट ड्रामा काही दिवसांपूर्वी ट्रम्प तात्या यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधासाठी भारताला धमकी दिली आणि भारताने घाबरून लगेच औषध सप्लाय केले अशा बातम्या आल्या होत्या. खरेतर तात्यांनी धमकी दिलीच नव्हती, पूर्ण प्रेस कॉन्फरन्स न पाहता फक्त तेवढी क्लिप पाहील्याने आपल्याकडे लगेच त्यांनी धमकी दिल्याचा आणि त्या धमकीमुळे 56 इंची छाती फाटल्याचा उद्धार झाला होता. आपल्याकडे मूर्ख बनवायला पूर्ण व्हिडिओतून कट केलेला एक तुकडा दाखविणे पुरते. म्हणून ट्रम्पची धमकी असो की आलू बनाने की मशीन, या व्हिडीओजद्वारे दुसऱ्याला मूर्ख समजणारांना हेच कळत नाही की मूर्ख ते स्वतःच बनले आहेत. असो, तर हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा भारत हा सर्वात मोठा सप्लायर असल्याने कोविड-19साठी (त्याला करोना म्हणू तेच बरे वाटते) भारत हा जगाचा आधारस्तंभ ठरला. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे अतिशय स्वस्त औषध आहे, त्यामुळे ते जर करोनावर प्रभावी ठरले तर सगळ्या जगासाठी ते एक वरदान ठरणार होते.  पण जे जगासाठी वरदान ठरते ते अनेक फार्मसी कंपन्यांसाठी शाप ठरू शकते. कारण जर समजा हायड्रोक्सीक्लोरोक्वीन करोना...

कोरोना : जागतिक संकट (साभार)

कोरोना विषाणू : मानवजातीवर सुटलेले ब्रम्हास्त्र.              सूर्यापासून फेकल्या गेलेल्या वायूच्या धगधगत्या गोळ्यातुन पृथ्वीची उत्पत्ती सुमारे ४८० कोटी वर्षांपूर्वी झाली.  सुमारे ३८५ कोटी वर्षांपूर्वी पहिले सजीव, म्हणजे अतिसूक्ष्मजीव  अवतरले. नंतर तीन साडेतीनशे कोटी वर्षे पृथ्वीवर सूक्ष्मजीवांचे राज्य होते. आपल्या कल्पनेतही न बसणारे, पृथ्वीवरील तापमान व वातावरणाचे टोकाचे बदल व  प्रतिकूलता त्यांनी पचवली. पृथ्वीवरील सजीव जैविक वस्तुमानाचा विचार केला तर त्यापैकी साधारण ८०% भाग हा सूक्ष्मजीवांचा आहे. दिसणाऱ्या सजीवांच्या २० कोटी व सूक्ष्मजीवांच्या सुमारे ४० कोटी प्रजाती, शंभर वर्षांपूर्वी होत्या.  'विषाणू' हा माणसासाठी हानिकारक अतिसूक्ष्मजीव, अनुकूल स्थिती व पोषण उपलब्ध असल्यास, एका दिवसात २८०००० अब्ज जीव वाढवतो. आपण लोकसंख्या वाढली वाढली म्हणून ओरडा करतो. पण पृथ्वीवर  माणसांची संख्या वाढून वाढून किती झाली, तर सुमारे ७५० कोटी. आता समजुन जा, सूक्ष्मजीवांच्या संख्येचा व क्षमतेचा विचार केला तर आपण त्यांच्या खिजगणतीतही नाही....

खोपा शिडीला टांगला...

खोपा शिडीला टांगला... 'टाटा मोटर्स'चा, म्हणजे पिंपरी आणि चिंचवडच्या कारखान्याचा परिसर मोठा निसर्गरम्य आहे. पिंपरी वाघिरे भागातला एकेकाळी ओसाड, माळरान, खडकाळ, ओबडधोबड, दगडग...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved