Posts

Showing posts with the label Election

Raju Parulekar - Devendra Fadanavis Insider Interview

Image
परुळेकर - फडणवीस इनसाईडर चॅनेलची मुलाखत वेळ मिळेल तसं तीन-चार दिवसात बघून संपवली... ... फडणवीसांची आजपर्यंतची सर्वांत चांगली मुलाखत म्हणजे ही मुलाखत झालीय... तो माणूस मूळातच जबरदस्त आहे, पण जबरदस्त माणसाला बोलतं करण्यासाठी मुलाखत घेणाराही त्या तोडीचा असावा लागतो... राजू परुळेकरांना श्रेय द्यायलाच हवं... फडणवीस परुळेकरांना मुलाखत देतायेत ऐकल्यावर विरोधाच्या सूरात माझाही सूर होता, पण मुलाखत बघीतल्यानंतर फडणवीसांनी जे केलं ते योग्य केलं हे समजलं...! ... परुळेकर जुन्या फळीतले पत्रकार आहेत, त्यांची काही मतं पटत नाहीत, काही १०० टक्के पटतात - (स्पेशली : शिवसेनेबद्दलची...!) जसं, जगाचा-देशाचा अभ्यास नसेल, पण मुंबईसह महाराष्ट्राची आणि ठाकरसेनेची नस ते जाणून आहेत, परखड आहे... आणि मूळात हल्लीच्या जाधव, सरदेसाई वगैरे फडतूस लोकांसारखं बोलणाऱ्याला इन्टरप्ट न करता उत्तरं देण्यासाठी पुर्ण वेळ दिला...! चांगलं ते चांगलं म्हणायलाच हवं... परुळेकरांनी मुलाखत व्यवस्थित हँडल केली... अर्थात "ट्रोलर्सना सौम्य घ्यायला सांगा..." हे सांगणं त्यामागे आहेच... परुळेकरांची प्रतिमा थोड...

हायव्होल्टेज ड्रामा आणि तथ्य

Image
मुख्यमंत्री निवड घटनात्मक तरतुदी 1. बहुमत असलेला नेता राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतो. राज्यपालाची खात्री झाल्यानंतर राज्यपाल मुख्यमंत्री पदाची  शपथ देतात. नंतर ठराविक कालावधीत बहूमत सिध्द करण्यास सांगितले जाते. 2. भारतात बहु पक्ष पध्दती असल्यामुळे निवडणूकी नंतर  प्रत्येक पक्ष आपला विधी मंडळ नेता निवडतो. 3. विश्वास दर्शक ठरावा दिवशी प्रत्येक आमदाराने सरकार स्थापनेच्या ठरावावर मत द्यायचे. परंतु  पक्षाचा विधी मंडळ नेता व्हिप बजावून ठराविक पक्षालाच मत देण्याचे आदेश देऊ शकतो. हा आदेश प्रत्येक आमदारांवर बंधनकारक असतो. 4. सध्या राष्टवादीचे गट नेते अजित पवार आहेत. त्यांच्या कडे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या सह्यांचे पत्र आहे. जे त्यांनी राज्यपालांना सादर केले. त्या नुसार मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणविस यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. 5. विश्वासदर्शक ठरावा दिवशी अजित पवार व्हिप बजावून भाजपा ला मतदान करण्याचे आदेश देऊ शकतात. जो आदेश राष्ट्रवादीचे आमदार डावलू शकत नाहीत. जर विरोधात मतदान केले तर मत बाद होईल. 6. शरद पवारांनी जरी पक्षाची ...

राष्ट्रपती राजवट

Image
महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रपती राजवटीच्या मन:पूर्वक शुभेच्छा... हि राष्ट्रपती राजवट आपल्याला भरपूर मनोरंजन देणारी, नवीन अनुभव देणारी, टीव्हीच्या रिचार्जच्या दुप्पट रिटर्न्स देणारी ठरो - हि महामहीम राष्ट्रपती, राज्यपाल आणि मोटाभायला प्रार्थना...! ... राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? कलम ३५६ नुसार घटकराज्य शासन कारभार राज्यघटनेनुसार चालणे अशक्य असल्याचा अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींनी दिला किंवा राष्ट्रपतींना सुमोटो पद्धतीने तशी खात्री पटल्यास राष्ट्रपती जाहीरनामा काढून राष्ट्रपती राजवटीची घोषणा करू शकतात. राष्ट्रपती राजवट समाप्त होण्याची घोषणाही राष्ट्रपतीच करतात. संसदेने अशा घोषणेला मान्यता दिल्यानंतरच ती अंमलात आणली जाते. राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत संसदेची मान्यता मिळवणे आवश्यक असते. मात्र मंजूरी मिळाल्यानंतर केवळ सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येते. परंतु संसदेने या घोषणेला पुन्हा पुढील सहा महिन्यांसाठी मान्यता दिल्यास राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवता येऊ शकतो. अशाप्रकारे वाढ करून जास्तीत जास्त एखाद्या प्...

Dhule, Gote and Elections

Image
धुळे शहरात तुला ना मला घाल ...ला.... . लोकसंग्रामचे गोटे, अपक्ष कदमबांडे यांच्या लढतीत एमआयएमचा उमेदवार निवडून आलाय...! . माझं मतदान याच मतदारसंघात आहे... . हे धक्कादायक झालंय...! .. काय झालं ? धुळे शहरात मतदान झालं ५० टक्के - त्यालाही कमी. अनिल गोटे यांचा पिंड संघाचा आहे, आणि धुळ्यात त्यांनी केलेली कामे तुफान आहेत. त्यामुळे लोकांनी ३ वेळा केवळ त्यांच्या नावावर निवडून दिलं. अगदी यावेळी देखील तेच येतात असं चित्र होतं. भाजपचे आमदार अनिल गोटेंनी आधी महापालिका, मग लोकसभेवेळी भाजपाची पिसे काढली होती. ज्यामुळे गिरीश महाजन शहरात येऊन अनिल गोटे कसे जिंकतात हे मी बघतोच वैगेरे गोष्टी करून गेले. शहर विधानसभा सुटली सेनेला - आणि सेनेने जो उमेदवार दिला तो मुळात शहरात लढायलाच तयार नव्हता. त्यांचं होमपीच धुळे ग्रामीण (धुळे बाह्य भाग) आहे. त्याला ऐनवेळी उभा केला. त्यामुळे अर्धी लढाई इथेच संपली. दुसरा उमेदवार अपक्ष उभा होता (फुगा)... ज्यांच्याकडून गोटेंना फाईट मिळेल असं वाटलं. ते उमेदवार आधी राष्ट्रवादी मधून बाहेर पडले, आणि अपक्ष लढले. जिथे शहरात विकास हा एकमेव मुद्द...

एक महत्वाचं कौतूक

एक महत्वाचं कौतूक . गेले अडीच ते तीन महीने निवडणूकीची धांदल आपण पाहिली. एक्क्याण्णव कोटी मतदार, पाचशे बेचाळीस जागा, वीस हजाराच्या जवळपास उमेदवार, सात फेऱ्‍या आणि जगातली सर्वात मोठी लोकशाही... . भारतात लोकशाही टिकवणं सोप्पं नाही. इथे दर तीन लोकांमागे एक जण द्वाड आहे, एक जण उपद्व्यापी आहे. एक जण दिडशहाणा आहे. भौगोलिक परिस्थिती वेगवेगळ्या आहेत. राज्याराज्यात लोकल गावगुंड आहेत. भाषा, प्रथा, परंपरा वेगवेगळ्या आहेत. आणि त्यातही मे चं कडक ऊन. भरीस भर म्हणजे कंट्रोल न ठेवता येणारं सोशल मिडीया. . तरीही भारतीय लोकशाहीचा प्रचंड विजय झाला... पक्षाचा विचार बाजूला ठेवा. लोकशाहीने सतरावी लोकसभा देशाला दिलीय.... आचारसंहीता पाळून. पवित्रपणे, प्रामाणिकपणे...! . तीन महिन्याच्या प्रचारात प्रचंड धुराळा उडाला. इव्हीएमवर आरोप झाले. एकमेकांवर चिखलफेक झाली, हाणामाऱ्‍या झाल्या, पण शेवटी सगळ्या गोष्टी नियंत्रणाखाली होत्या... मोदीँपासून राहुलपर्यँत सगळ्यांवर या यंत्रणेची घट्ट पकड होती... ती यंत्रणा म्हणजे "भारतीय निवडणूक आयोग"... आज मोदी किँवा राहूल जिँकले नाही, तर भक्कमपणे हा लोकन्नाथाचा रथ ओढून संसदे...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved