Posts

Showing posts with the label Entertainment

Biopic

कुठलाही मराठी सिनेमा स्पेशली बायोपीक फार फार एक किंवा दोन आठवडे सत्तर एम एम वर असतो, तिथे लाज काढून झाली कि झी टॉकीज प्रीमिअरच्या नावाखाली आठवड्यात दोन वेळा स्वतःला कानफाडून घेत असतो - त्यामुळे अकाउंटमधले पाचशे रुपये वळवळ करत नसतील तर दोन आठवडे थांबा आणि फुकटात घरबसल्या बघा... कारण - पाचशे रुपये खर्च करुन काहीतरी पदरात पडेल अश्या दर्जाचे कलाकार, विषय आणि सिनेमे येत नाही. सुबोध भावेनी बालगंधर्व केला, लोकमान्य केला - आता घसरून राहुल गांधी करणार बोललंय. प्रसाद ओक दिघे कमी, स्वस्तातला पुष्पा वाटतोय... झुकेगा नाही साला टाईप गद्दाराला माफी नाही वाटतंय... थोडक्यात - कास्टिंग गंडलय. .. कुठलाही बायोपीक बघून आपल्या आयुष्यात फार मोठी क्रांती होणार आहे असं नाही. कितीही सिरीयस विषय असला तरी काहीतरी किडा दिसतो आणि तो बघतांना हसू येतं... एमएसडी फक्त सिरियसली पाहिलेला, तिकीट विकत घेऊन. बाकी जवळपास सगळे सिनेमे टीव्हीवर आल्यावर किंवा वि च्या रिचार्जबरोबर हॉटस्टार फ्री मिळतं त्यावर बघितले. .. संजय राऊतांवर एखादा कॉमेडी बायोपीक निघावा. तो जबरदस्त चालेल. अमिषा पटेल समोर वाकलेले राऊत धडपडले, एनजीओप्लास्टिच्...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved