Shriyan and Songs
माझ्या लेकराला दोन-तीन दिवसापासून twinkle twinkle little star गाण्याचा नाद लागलाय... त्याआधी कुठलंसं हिंदी गाणं होतं... बहुतेक "आपकी आँखोमे कुछ..." होतं..., त्याआधी किलबील... त्याच्यासमोर प्ले झालं आणि आवडलं... तिथून पारायणं सुरु होतात - जोपर्यंत दुसरं आवडत नाही तोपर्यंत... ... गर्भसंस्काराच्या काळात आम्ही त्याला प्रकृतीप्रमाणे - वेळा सांभाळून राग ऐकवायचो - कधी मी गायचो कधी त्याचा मामा, - किंवा रोजचा रियाजही समोर बसवून व्हायचा. त्यामूळे बहुतेक त्याचं गाणं उपजत आलंय, आणि जर तेच राग जर ऐकवले तर त्याचं एक्स्प्रेशन जबरदस्त असतं... ... गाण्याचंही असंच - तेच तेच गाणं लूप मध्ये प्ले करावं लागतं, संपलं की एकीकडे याचा ठणाणा सुरु होतो... परत प्ले करा... दिवसभर जेव्हाही हुक्की येईल तेव्हा हा खेळ सुरु होतो, त्यात दुसरं गाणं लागलेलं चालत नाही, बंद केलेलं तर नाहीच नाही.. मध्ये मध्ये कुणी बोललेलं चालत नाही, तो ऐकतांना आपणही कंपनी दिलीच पाहीजे - तसे एक्स्प्रेशन्स दिलेच पाहीजे... जो कुणी या गाण्याच्या कार्यक्रमात त्याच्या हातात सापडला त्याची तासभर तरी सुटका होत ना...