Sushant...
चार पैसे कमी मिळाले चालतील, ग्लॅमर नसलं तरी चालेल, फार यशही मिळालं नाही तरी चालेल... पण आयुष्य समाधानी आणि शांत असावं...! पुर्ण असावं ...! ... आयुष्यात कुठल्याही टप्प्यावरुन परत फिरता येईल असा एक बेसकॅम्प असावा... कुठेही जाणवलं की शक्ती संपलीय, बिनधास्त परत फिरुन नव्याने सुरुवात करावी... जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपलं आयुष्य आपलं असतं...! ... पैसा आणि ग्लॅमर आपली काळी बाजू सोबत घेवून येतो... मुंबईच्या लाईम लाईटमध्ये एक म्हण आहे - "बम्बई जमनी चाहीये...!..." ती जमली तो टिकला - नाही तो हरवला...! प्रसिद्धी - हवा आणि पैसा डोक्यात जायला नको... टिकवता यायला हवं, जरी गेलं तरी स्विकारण्याची तयारी हवी...! ... सुशांत सिंह राजपूत इथेच हरवला... बम्बई जमलीच नाही... बेसकॅम्प नसेल कदाचित...! म्हणून आत्महत्या हा शेवटचा पर्याय स्विकारला... कारण हजार मिळतील, पण रिजल्ट एकच : चांगला अभिनेता गेला ... एमएसडीची स्टोरी याच्यामूळे जबरा झालेली... अजरामर म्हणा ...! पुढेही तगडे हिटस् दिले असते, पण तो कोसळण्याचा काळा क्षण सांभाळू शकला नाही ! ... प...