गुरुपोर्णीमा २०२०
आस्तीक-नास्तीकच्या गोंधळा पलीकडे, तर्कविज्ञान आणि शास्त्र यातल्या रेषा बोथट झाल्यानंतर एक गोष्ट पटलीय, ती म्हणजे गुरुंशिवाय आयुष्याला अर्थ नाही...! भवसागरात आयुष्याची नौका हिंदोळे घेते, वादळं सहन करते, पण भरकटत नाही, खडकावर आपटून फुटत नाही - गुरु त्या नौकेला पार लावतात... मार्ग दाखवतात, फक्त विश्वास असावा...! तिथे तर्क चालत नाही, शास्त्राचे नियम चालत नाही, मोजमाप तर नाहीच नाही...! हा मार्ग तर्काचा नाही, अनुभवांचा, आणि अनुभूतीचा आहे...! ... गुरुस्थान अशी एक जागा आहे जिथे आपल्या मनातला प्रश्न सहज मांडता येईल, उत्तर मिळेल याची खात्री असेल, ते आपल्याला चुकू देणार नाही याची माहिती असेल, आपण आपल्या कर्मानं चुक केली तर तडाखा बसेल याची भिती असते. ती शक्ती आपल्यावर सदैव लक्ष ठेवून आहे ही जाणीव आणि आपल्याकडे सदैव लक्ष ठेवून आहे हा विश्वास असतो...! "मी" पणाचा फसवेपणा त्यांच्यासमोर क्षणार्धात गळून पडतो - खरं तर "मी" असा उरतच नाही, एकरूपता येते... मोक्ष मिळाल्यानंतर निर्विकार मन होत असावं, गुरुसानिध्य त्या निर्विकार, एकरुप मनाची जाणीव करून देतं...! ... आ...