Posts

Showing posts with the label Cricket

Test Cricket Anniversary

क्रिकेटची पहिली टेस्ट मॅच १५ ते १९ मार्च १८७७ दरम्यान मेलबर्नला इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया खेळवण्यात आली होती... टेस्ट क्रिकेटचा आज विशयूहॅपीबड्डे. .. पाच दिवस, ४० विकेट... लाल रंगाचा टणक सिजन बॉल आणि पांढरी जर्सी... ! घाम फोडणाऱ्या या फॉरमॅटमध्ये अनेक खेळाडू घडले... खेळपट्टीवर टिकून राहणं, डिफेन्स मोड मध्ये विकेट टिकवणं किंवा अचुक टप्पा साधुन / फिरवून विकेट घेणं हे तंत्र आहे...  ते बघणंही तितकंच नजाकतीचं... ! क्रिकेट हा तंत्रशुद्ध खेळ आहे हे टेस्टमध्येच दिसतं... .. पूर्वीचं क्रिकेट बॅलेन्स्ड होतं... बॉलर्सची पिसं निघतील असा बॅटींग ओरीएंटेड फॉरमॅट नव्हता. त्यामुळे ५ दिवसाच्या मॅच निकाल देवून जायच्या ! ... कधीतरी शतक व्हायचं... कधीतरी ५ विकेट... ! साधं नव्हतं ते !  प्रचंड दडपण खेळण्यात मजा आणायचे... त्यातूनच खेळाडू घडले ! ब्रॅडमन टू झहीर खान... फेरवेट लोक्स फक्त टेस्टमध्येच बघतो... ! .. पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियाने ४५ रन्सनी जिंकली... टेस्टचा शंभरावा वर्धापनदिन त्याच मैदानावर खेळला गेला - तो इंग्लंडनं ४५ रन्सने जिंकला... ! सध्या भारतीय क्रिकेट टिम प्रथम स्थानी आहे...! .. वनडे - टि

Rahul Dravid

Image
अंडर१९ च्या विजयाचा शिल्पकार राहूल द्रविड.. दरवेळी ठरवतो, या माणसाबद्दल लिहूयात कधीतरी, पण कौतूक आणि श्रेय एखाद्याच्या नशीबात असावं लागतं - राहूल द्रविडचं नशीब याबाबतीत दोन नव्हे तर तब्बल चार पावलं पुढे असावं... ! द वॉल राहूल द्रविड... कितीही चांगलं केलं तरी श्रेय, कौतूक या माणसापासून दूरच राहील्या.. समोरच्या टिममध्ये बॉलर्स याच्या चिकटपणाला मनात शिव्या घालू देत, पण माणूस म्हणून हा देवमाणूस आहे... शांत... संयमी. योग्य निर्णय घेणारा. ! .. २००७ ला वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशनी हरवल्यावर हा कोण ठोंब्या आणून बसवलाय कॅप्टन म्हणून ही स्वाभाविक प्रतिक्रीया देशाची उमटली होती... सगळीकडून शिव्याशाप खातांनाही तो शांत होता... अबकी बार... म्हणत हारला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुन्हा त्याने मोट बांधली... जायला सांगितलं, उमगलं तेव्हा धोनीच्या हाती धुरा देऊन शांतपणे निघाला.. त्याने कधी स्वतःला क्रिकेटचा देव म्हणलं नाही, ना अवार्डस् करता याचक झालेला दिसला... निवृत्तीनंतर तो एक दोनदा दिसला, पण चर्चेत आला नाही... एकदा डॉक्टरेट नाकारतांना, एकदा रांगेत उभा असलेला... ! त्याच्यात टॅलेंट आहे, स्कील्स आहेत..

Cricket Legends

जम्बो (अनिल कुंबळे) द वॉल (राहूल द्रविड) दादा (सौरव गांगुली) VVस्पेशल (व्ही.व्ही.एस लक्ष्मण) मास्टर ब्लास्टर (तेंडूलकर सचिन) .. दुसऱ्या गृप मध्ये विरेंद्र सेहवाग गौतम गंभीर हरभजनसिंग युवराजसिंग आणि महेंद्रसिंह धोनी .. बीसीसीआयला वरचे पाच देव नशीबानं मिळाले, आणि त्यावर बोनस खालचे पाच ! ही दहा नावं एकदाच झाली, शेवटची ! यांच्यासारखे पुन्हा होणार नाही ... अशी पंचकं सारखी होत नाहीत... भारतीय टिम हे असतांना जगजेत्ती होती... ! ... आपल्याकडे वरचे पाच होते तसे ऑस्ट्रेलियन टिममध्येही एक भारी सिक्सर होतं .. रिकी पाँटींग अॅडम गिलक्रिस्ट मॅथ्यू हेडन शेन वॉर्न मॅक्ग्रा आणि ब्रेट ली .. हे जोपर्यंत होते, येलो जर्सीला बघून भलेभले टरकायचे ... ! .. पाकीस्तानचेही, इंजमाम उल हक शोऐब अख्तर कामरान अकमल यूनिस खान ही चौकडी होती.. .. श्रीलंकेकडे सनथ जयसूर्या माहेला जयवर्धने मुरलीधरन कुमार संगकारा चामिंडा वास हे पंचक होतं ! .. विंडीजची जोडी ब्रायन लारा क्रिस गेल ... खरं क्रिकेट, टफ फाईट वगैरे तेव्हाच होतं.. क्रिकेटचा सूवर्णकाळ होता ! ही टिम संपली आणि क्रिकेटचा आत्मा

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved