Posts

Showing posts from December, 2020

पुन्हा नव्याने सुरुवात करूयात का ?

जुलै पासून एकही ब्लॉग लिहिलेला नाही, फेसबुक-ट्विटर पूर्णपणे बंद आहे, सोशल मिडिया सोडा - कॉल सुद्धा घेणं बंद आहे... मेसेजचा बॉक्स रोज तीन-चारदा खणखणतो... काळजीने विचारणारे मेसेजेस येतात...  याचं कारण कुठलंही सिरीयस नाहीय... ना मला कोरोना झाला... ना अजून काही... मी ठणठणीट आहे... कोरोनाच्या स्पाईक मध्ये सुद्धा काही काळजी घेऊन सेफ राहिलोय... ! कारण असंय :  माझं एक वर्षाचं  लेकरू एक मिनिटही शांत बसत नाही, आणि मला कामाव्यतिरिक्त असलेला सगळा वेळ फक्त त्याला द्यावा लागतोय...  त्याच्या समोर फोन किंवा पीसी उघडला तरी तो त्याच्या बोर्ड वर पायाने दणादण आपटतो... आणि या गोष्टीची मला धास्ती बसलीय... लॉकडाऊनमुळे ऑफिसला जाऊन काम करू असंही शक्य नाहीय...!  कोरोनाने अख्खं वर्ष खाल्ल्यानंतर आलेली मरगळ सुद्धा बराच प्रभाव टाकणारी ठरली. ती  मरगळ झटकून कुठेतरी नव्याने सगळं सुरु करायचंय... पूर्वपदावर आणायचंय, आणि म्हणूनच १६ जानेवारी २०२१ पासून नवी सुरुवात करतो. बाकी काळजी नसावी....!   - तेजस ! 

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved