असंही "स्वच्छ भारत अभियान'' ::

असंही "स्वच्छ भारत अभियान'' ::
इतक्यातच नारायण पेठेत रस्त्याच्या कडेनं तोँडात बूचका भरुन चालणारा एकजण मध्येच थूंकला. रस्त्यावर ! लोकांच्या अंगावर उडेल याचा विचार न करता. ती घाण काहीशी माझ्या गाडीच्या पुढच्या चाकावर, मडगार्डवर उडाली... अस्मादिकांचं टाळकं सटकलं...!! आता याला घ्यायचाच कोपच्यात !!
ऐन नारायण पेठेत... ऐ xxx थांब !! धुळ्याच्या भाषेत थांबवला. तोपर्यँत अष्टभूजाचा चौक आलेला. एस.पी.त एम ए मराठी, रानडेत एमसीजे, ललितकला मध्ये ड्रामासायंस करणाऱ्‍या आमच्या गृपचा एकत्र कट्टा. सगळी पोरं तिथंच !! बस्स !! त्याला थांबवला. सगळ्यांनी मिळून पेठेच्या पुणेरीत मोदीँचं स्वच्छ भारत अभियान व्यवस्थित समजावलं... गुटखा खाल्ल्यानं वैकूंठधाम बूक करावं लागेल हे पटवलं, पार रडकूंडीला येईपर्यँत अर्धा पाऊण तास लेक्चर दिलं आणि स्वच्छ भारत च्या धर्तीवर "स्वच्छ पल्सर" करण्यासाठी वॉशिँग चार्ज रु. मात्र पन्नास भरपाई वसूल करुन सत्कारमुर्तीँना रवाना केलं.
अस्मादिक आता बाईक वॉशिँग सेँटरला बसून गाडीचा वॉशिँगसाठी नंबर येण्याची प्रतिक्षा करताय.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved