Posts

Showing posts from December, 2014

Hindu vs

कट्टर हिँदूत्व ईद किँवा नाताळला सुतकी थोबाड करुन बसलं की प्रगट होतं कां ? इतर धर्मीयांच्या सणाला किँवा इंग्लीश न्यू इयरला शुभेच्छा दिल्यानं आमचा धर्म भ्रष्ट होतोय कां ? जे "कट्टर हिँदुत्ववादी" आहेत त्यांचे व्यवहार तिथीप्रमाणे चालतात कां ? वाढदिवस तिथीला साजरा करतात कां ? घरात भिँतीवर कालनिर्णय ऐवजी पंचांग लटकवतात कां ? इंग्लीशऐवजी संस्कृत बोलतात कां ? टेबल मॅनर्स पाळत नाहीत कां ? हात पाय दुखतांना कमोड ऐवजी भारतीय टॉयलेटच वापरतात कां ? जमीनीवर बसूनच जेवण करतात कां ? प्रहर पद्धतीचे कालमापक वापरतात - घड्याळ वापरतच नाही ? रोज न चुकता मंदीरात जातात ? घरी पूजा करतात ? हिँदू आचारसंहीता पाळतात ? जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं "हो" असतील तरच तुम्हाला आम्ही "कट्टर हिँदूत्व" पाळतो असं म्हणायचा नैतिक आधिकार आहे... आणि तरंच दुपारच्या फोटोवरुन मला अक्कल शिकवायचा...!! जे ईदच्या वेळी म्हणालो तेच म्हणतो - वर्षानुवर्षे आमच्या आयुष्याचा भाग झालेले इतर धर्मीय असलेले शेजारी, मित्रमैत्रीणी यांना मी त्यांच्यातल्या थोड्या नालायक लोकांसाठी तोडू शकत नाही

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved