Unfortunate Fact
माझ्या ओळखीतल्या एका माणसानं त्याच्या वृद्ध आईला छळ छळ छळला... जेवायला देत नव्हता, मारहाण करायचा, राहण्यासाठी घराशेजारीच उघड्यावरच पलंग टाकलेला. बाकी औषधाच्या आणि कपड्यांच्या नावे बोँबच ! एकूण खुप हालच केले... (बऱ्याचदा त्या आजी इतरांच्या उष्ट्या ताटातलं खातांना मी स्वत: पाहीलंय... आणि तेव्हा यथाशक्ती मदतही केलीय.) पाच-सहा महीन्यांपूर्वी त्या आज्जी देवाघरी गेल्या. आज इतक्यातच तो माणूस खंगलेला, आजारानं वैतागलेला आणि शरीरानं अर्धा झालेला दिसला. लंगडत चालत होता. मी मुद्दामच गाड ी थांबवून चौकशी केली... मधुमेह, किडनीचे प्रॉब्लेम्स, सांध्याचे विकार अश्या अनेक आजारांनी त्याला धरलं आहे. दर दोन दिवसांनी डायलेसिसिस करावं लागतंय... आणि ना धड जगतंय ना मरतंय अश्या पंथाला लागलाय... त्याला तोँडावर ohhhh... hmm... असा रिप्लाय केला, पण माझ्या मनातल्या मनात "तू त्याच लायकीचा आहेस xxxच्या... स्वत:च्या कर्माची फळं भोगतोय..." असा आसुरी विचार त्या आजीँच्या दुर्देवी चेहऱ्यासोबत आला...! मी चूक की बरोबर कळत नाहीय...!!