Real life in Real
मला नेहमीच एक प्रश्न पडतो... म्हणजे पहा ना, मराठी-हिँदी चित्रपट, मालिका एका स्क्रिप्टनंतर संपतात... पण त्यातली पात्र चित्रपट-मालिकेच्या पल्याड खरंच्च आहेत असं मानलं तर चित्रपट-मालिका संपल्यावर त्यांचं पुढे काय होत असेल ?
म्हणजे शोले मधला ठाकूर, विरु-बसंतीला रेल्वेत बसवून घरी गेल्यावर राधाशी काय बोलला असेल ? विरु-बसंतीचं पुढचं आयुष्य कसं असेल ? ते रामगढला येऊन ठाकूरला भेटत असतील का ?
हम आपके है कौनमध्ये मोहनिश बहल पुढे आयुष्यभर तसाच विधूर असेल की दुसरं लग्न केलं असेल ?
अशी ही बनवाबनवीमध्ये घरमालक आज्जी मेल्यानंतर ते घर अशोक सराफ अॅन्ड कंपनीकडेच असेल कां? कि विजू खोटेँनी घेतलं असेल ? अ.स अॅन्ड कंपनी पुढे सेट झाली असेल की नाय ?
चार दिवस सासूचे मधली म्हातारी मेली की अजून तश्शीच धडधाकड आहे ?
एका लग्नाची दुसरी गोष्टच्या राधा-घनाला मुलबाळ झालं असेल ना ?
श्रीमंत दामोदरपंतच्या दामूचं लग्न झालं की नाही ?
लगानच्या भूवननं पुढे क्रिकेटची प्रॅक्टीस चालू ठेवली असेल की बंद केली असेल ? गावानं भूवनचा सत्कार केला असेल का ?
कुछ कुछ होता है मधला अमन शाहरुख-काजोलच्या घरी येत असेल का ?
bla... bla... bla... :-P :-P :-D