Plastic Ban : Be Alert

प्लास्टिक चेक करायला येणाऱ्या लोकांचं आयकार्ड आधी चेक करा,
हा टोळधाडीचा धंदा होईल -
प्लास्टिक सापडलं तर भले दंड भरायचा -
पण आयकार्ड चेक करुन ती माणसं खरी असल्याची खात्री झाल्यानंतरच !
..
तोतया ट्राफिक पोलीसांना असंच फटकारलं परवा...
धुळे - नाशिक हायवेवर मालेगांवच्या अलीकडे रात्री २ वाजता गाडी अडवली, ४-५ पोलीस - काही खाकी वर्दीत आणि काही सिव्हील ड्रेस वर...
लायसन्स - (हरकत नाही) दाखवलं !
पेपर्स - (याचीपण हरकत नाही...) दाखवलं !
पीयूसी - (ठीक आहे...) दाखवलं... !
आधार कार्ड - ह्या ? आधार कार्ड कां हवंय ?
- ते कम्पलसरी असतं...
- कधीपासून ?
- नवा नियम आहे ...
- आधारकार्ड लागत नाही, आणि माझ्याकडे नाहीय ...
- मग २०० रुपये दंड लागेल ...
- भरणार नाही, मूळात तुम्ही ट्राफीकला नाही, त्यामूळे तुम्ही अडवूच शकत नाही, आणि अडवलं तरीही आधारकार्ड नसणं हे दंडात्मक नाही...
- तुम्हाला भरावे लागतील, किंवा गाडी इथे सोडावी लागेल...
- ठिक आहे... तुमचं आयकार्ड दाखवा... मी गाडी सोडतो इथे... पोलीस मुख्यालयात जातो - तिथे दंड भरतो ...
- शहाणपणा करतोय ?
- तो मी मुख्यालयातच करतो... तुम्ही बेकायदा लूट करताय, ट्राफीकला नसतांना इथे वसूली करताय... काढा चावी .... मुख्यालयात भेटू ...

तोपर्यंत अजून दोन तीन कार वाले थांबले ... त्यांनीही फैलावर घेतलं, एक जण आमदाराचा पीए, त्याने आमदाराला फोन बीन लावला...
शंभर दोनशे रुपयाच्या नादात नोकरी जायची,  "जा तुम्ही सगळे" म्हणत त्या पोलीसांनी गाडीवर बसून पळ काढला...
फक्त पोलीस आहे म्हणून महामार्गावर उभं राहत ते चौघं हात धूत होते...
...
घाईमध्ये कुठे मुर्खांच्या नादी लागावं म्हणून ते प्रकरण तिथेच मिटवलं ...
सांगणं एवढंच - कितीही काळजी घ्या, प्लास्टिक बंदीमध्ये आपल्या पाच हजारावर टपलेले नराधम सावज रोखून आहेत,
एक तर चिरीमिरी खातील
लुटारू तोतया आधिकारी बनून घरात येवून लूटतील, किंवा टोळी आधिकारी बनून ५०००-१०००० चा फटका देतील...
...
शेरास सव्वाशेर बनून त्यांचं यथायोग्य यथाशक्ती श्राद्ध घालावं ... !
इतकंच ...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved