गडकरी वि. फडणवीस

 कोरोना काळात आधी स्वत:ची तब्येत सांभाळा, कुटुंबियांना जपा आणि शक्य होईल तसं सगळी कामं ऑनलाईन करा!- नितीनजी गडकरी टू देवेंद्रजी फडणवीस


गडकरींचा फडणवीसांना प्रेमळ सल्ला -
देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. त्यावरुन गडकरी यांनी फडणवीसांना प्रेमळ सल्ला दिलाय. "देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली दौरा केला. आवश्यक आहे जणं. पण त्यावेळी त्यांच्या गाडीत किती लोकं होती? आता सर्व काम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने करा. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सोय आहे. उगाच कुणाच्या घरी जाऊ नका. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधा. तुम्ही जेवढं लाईटली घेत आहात तेवढं हे साधं नाही. आपण अनेक कार्यकर्ते गमावले आहेत", अशा शब्दात गडकरी यांनी फडणवीसांना दौरे टाळण्याची विनंती केली.

आता यावरून वेगळे अर्थ (ते कसे काढले? सामना वाचून!) विरोधक मजा घेत आहेत. जरूर घ्या. गडकरी आणि फडणवीस पन दोघे व्हाट्सअप्प वर तुमचे स्क्रिनशॉट एकमेकांना दाखवून मजा घेत आहेत. तुम्ही मोदी vs गडकरी किंवा फडणवीस vs गडकरी करायचा जेंव्हा प्रयत्न करता, तेंव्हा ते तिघेही खुश असतात! कारण देश किंवा राज्य पुढे न्यायला भाजपच्या नेत्यांना पर्याय भाजपचेच नेते आहेत हे यातून तुम्हीच अधोरेखीत करत असता. 'किंबहुना', मोदी किंवा फडणवीस यांना तुमच्या पक्षांमध्ये, देशाला असो वा राज्याला पुढे नेण्यासाठी दोन्हीकडे पर्याय नाहीत हे तुम्ही मान्यच करत असता व तो पर्याय तुम्हाला आमच्याच गडकरींमध्ये दिसत असतो! जर पर्याय असता, तर मोदीजी vs पवार साहेब ट्रेंड केला असता. पण, किती वाईट परिस्थिती आहे तुमची की आमच्या नेत्यांना जे पर्याय तुम्ही सुचवत आहात ते पर्याय पण आमचेच नेते आहेत.. पवार साहेब काय म्हणतील याचा तरी विचार करा.

तसंही आमच्या पक्षात विरोधक काय म्हणतात याला कवडीची किम्मत देत नाहीत. तुमच्या बालिशपणाचा आम्ही आनंद घेत असतो. तुमचे चाळे हे आमच्यासाठी कॉमिक रिलीफ असतात. याआधीही काही नेत्यांनी भाजपच्या मुलूखमैदानी तोफ, आमच्या रणरागिणी महिला नेत्या पंकजाताई यांना 'मुख्यमंत्रीपद भाऊबीज च्या ओवाळणीत देतो' म्हटलं होतं, पण संधी मिळताच बहिणीला विसरले. तुमच्या पक्षात सन्मानाने बोलावून मुख्यमंत्रीपद द्यायचं होतं. कमीतकमी तसं बोलायचं तरी होतं एकदा. त्या काही येणार नव्हत्याच. त्या हुशार आहेत, तुमच्या वायफळ बडबडीला बळी पडून त्यांनी तुमच्या वक्तव्याला जेवढं द्यायचं तेवढंच महत्व दिलं - म्हणजे शून्य! स्वतःच्या वडिलांनी जीवाचं रान करून उभारलेल्या पक्षाला सोडून (तुमच्या स्वार्थासाठी) तुमच्या वडिलांच्या पक्षात कशाला जातील?

असो. आता तुम्ही परत तुमचे तेच बालिश चाळे सुरू केलेत परत. अवश्य करा. पण, गडकरींचा नाद कुठे करताय मूर्खांनो. तुम्हाला माहीत आहे ना, ते नेहमीच हसत असतात. जर मोदी यांनी त्यांनाच तुमचा बंदोबस्त करायची जबाबदारी दिली तर ते असेच हसत हसत तुमची अशी मारून जातील, की ते समजायला पण तुम्हाला पुढची काही वर्षे लागतील. अरे, नागपूरचे आहेत ते. आवळा देऊन भोपळा नाही, ते संत्री देऊन गोट्या नेतात..🤣

बाकी, महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे. नितीनजी गडकरी देशाचे इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करून भारताला एक ग्लोबल इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन बनवणार आहेत. प्रत्येक नेत्याचा रोल आमच्या पक्षात त्यांना माहीत असतो. कालच हिमांता बिस्वा सर्मा यांना मुख्यमंत्री बनवून पक्षाने हे पुन्हा सिद्ध केले आहे की योग्यता असेल तर योग्य वेळी उचित सन्मान त्यांच्या वाटेला येतोच. त्यामुळे इकडे कोणी घाईत नसतो, सगळे आपलं काम नीट करत राहतात.

तुम्ही काळजी घ्या, कोमट पाणी प्या, कमीतकमी गडकरी यांच्यासारख्या 'कधीही आपल्या टप्प्यात आणून नीट कार्यक्रम करायची क्षमता असलेल्या' नेत्यांच्या बाबतीत बोटं घालू नका..

येणारा काळ राजकीयदृष्ट्या तुमच्यासाठी फार क्लेशदायक असणार आहे, डबल मास्क लावून घरीच रहा!

  • वेद कुमार (साभार)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved