Latadidi Birthday
भगवती सरस्वतीच्या लता मंगेशकर या अवताराचा आज ८५ वा प्रगटदिन... दिदीँच्या स्वरांना गणेशाची तबल्यावर साथ आणि त्यातूनच प्रकटला अद्त्भूत नाद... स्वरांची देवता लतादिदीँना उदंड उदंड उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या स्वरमयी सहवासात आमचं आयुष्य संगीतमय हो... Happy Birthday Didi... :-):-):-) (दिदीँच्या पहील्या साक्षात दर्शनाने सुगंधित झालेला माझ्या आयुष्यातला एक सुवर्णक्षण... माझ्या डायरीतून) .....दिवाणखाण्यात सोफ्यावर बसून पुरस्कारांचं शोकेस, भिँतीवरचे फोटो न्याहाळत एक एक क्षण मोजत लतादिदीँची वाट बघणं सुरु होतं... इतक्यात केतकी किँचाळलीच अरे दिदी आल्या... आणि आम्ही सगळे लटपटत उभं राहीलो... साक्षात सरस्वती समोरुन येत होत्या... साक्षात लता मंगेशकर... सगळे भाव चेहऱ्यावर गर्दी करत होते... खरंच लतादिदी आहेत... आणि क्षणात डोळ्यातून घळघळ पाणी येणं सुरु झालं... हाच तो क्षण ज्यासाठी जन्माला आलो... "बसा बसा"... इतकंच काय ते मला ऐकू आलं... काही क्षण लागले सावरण्यासाठी आणि नंतर जाणवलं, यस्स्स, हे खरंय, मी खरंच साक्षात लतादिदीँसमोर उभा आहे........