Mahalakshmi 2014
गेल्या तीन दिवसात गौरी-गणपतीचं माझ्या घरी वास्तव्य होतं. आज विसर्जन झालं. या तीन दिवसात भगवतीने तिच्या खऱ्या अस्तित्वाचे अनेक साक्षात्कार मला आणि माझ्या कुटूंबियांना दिले. गेल्या एकवीस वर्षात पहील्यांदा असं काही घडलंय.
१. दि. २ : विहीत मुहूर्तावर प्रथेप्रमाणे लक्ष्मीची स्थापना झाली. स्थापना विधी पुर्ण झाला आणि लक्ष्मीची आरती सुरु झाली. तितक्यात त्याचक्षणी एक कुरीयर आलं. त्यात सिँदूरलेपन असलेला कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा सुंदर फोटो मिळाला. from unknown sender. हा एक सुंदर योगायोग असावा असं वाटलं.
२. दि. ३. काल संध्याकाळी माझ्या लहान भावाला आणि पप्पांना काही क्षणांसाठी लक्ष्मीच्या एका मुर्तीत साक्षात लक्ष्मीचं दर्शन घडलं. लक्ष्मी हसतेय आणि त्यामुळे तिच्या गालावर खळी आलीय, दागिन्यांना झळाळी आलीय, आणि तिची तेजोप्रभा सर्वत्र पसरलीय असं दिसलं. जे मला किँवा इतरांना दिसलं नाय. त्यांना ते अस्तित्व स्पष्ट जाणवलं.
३. दि. ४ : महालक्ष्मीसाठी वाटीत हळद कुंकु ठेवतात. ते ठेवतांना वाटी काठोकाठ आणि सारखी, सपाट करुन लक्ष्मीच्या मुर्तीमागे ठेवतात. साधारण कुणाचा हात लागणार नाही, दिसणार नाही अश्यारितीनं. लक्ष्मी त्यातून सौभाग्यलेणं लावते अशी श्रद्धा असते. आज जेव्हा ते उचललं तेव्हा हळदीची वाटी जशीच्या तशी होती पण कुंकवाच्या वाटीतून कुंकू उचलल्याच्या खूणा आणि बोटांचे ठसे स्पष्ट दिसताय. कुंकु देखील कमी झालंय. फोटो देतोय सोबत.
साक्षात्कार-चमत्कार-अंधश्रद्धा काहीही असो. पण या सुंदर साक्षात्काराने तिचं अस्तित्व माझ्या घरात आहे हे मी अनुभवलंय. :-):-):-):-)