Posts

Showing posts from December, 2017

Rafi

Image
१९६२ - १९६३ मध्ये लता मंगेशकरांनी गायकाला मिळणाऱ्या मानधनाचा वाद काढला. चित्रपटातून निर्मात्याला मिळणाऱ्या उत्पन्नातून गायकालाही रॉयल्टी मिळावी यासाठी ती धडपड होती... त्याकाळचे आघाडीचे अनेक गायक - गायिका या वादात मंगेशकरांबरोबर होते... पण या सगळ्या गराड्यात एक आवाज मात्र वेगळा होता. "गायकाला गाण्यासाठी ठरवलेल्या कराराप्रमाणे मानधनाइतकी रक्कम मिळाली, की त्याचा संबंध संपतो..., मग तो चित्रपट हिट होवो किंवा न होवो..." ... मोहम्मद रफी ... ! ... या माणसाची कला पैशांपुढे झुकली नाही ... . "माया" चित्रपटातल्या "तस्वीर तेरी दिल मे" च्या रेकॉर्डींगवेळी हा वाद झाला. पण रफींच्या स्टँडमूळे केवळ श्रेयनामावलीत गायकाचं नांव द्यावं या मुद्यावर नाईलाजाने एकमत झालं ... या विरोधाचा परीणाम म्हणजे रफींबरोबर एकही गाणं गाणार नाही हे लता मंगेशकरांनी जाहीर केलं... दोन दिग्दजांच्या या वादात जयकिशन यांनी मध्यस्थी केली... पण आयुष्यभर मनोमनी राहीलंच... ! २०१२ मध्ये एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद रफींनी आपल्याला माफीपत्र दिल्याचा दावा लता मंगेशकरांनी केला, पण रफींच्या मुल

मी अनुभवलेले गजानन महाराज - भाग ३

Image
#अनुभूती #मी_अनुभवलेले_गजानन_महाराज - भाग ३ हाजीअली मागच्या चार वर्षांत शेगांवला जाण्यासाठी खूप मोठ्ठा गॅप पडला. अनेक अडचणी येत गेल्या. अपघात, आत्याच्या संपुर्ण कुटूंबाचं निधन, घराचं बांधकाम... जावू जावू होत होतं, पण जाता येत नव्हतं... मनात विचार आला की "महाराज बोलावतील तेव्हाच आपल्याला जायला मिळेल" हेच असायचं... त्यांनी ऐकलं - आणि एक दिवस मुंबईत महाराजांची अनुभूती मिळाली... ते सर्वत्र आहेत, सोबत आहेत, आणि वेळोवेळी ते सिद्ध करतात. .. पुणे सोडून काही स्वप्न घेवून मुंबईत येण्याची ती वेळ. स्टार्टअप वर उभा, मनात नाही म्हणलं तरी धडकं असतंच... सुरुवात होण्याआधी शेगांवला जायची इच्छा होती, पण काही ना काही कारणाने शक्य होत नव्हतं... टाईमलाईन फास्ट पळत होती, शेगांवला जाणं शक्य झालं नाही... मुंबईत आलो. .. ऑफीसच्या पहिल्या दिवशी महाराजांच्या फोटोसमोर उभा राहून प्रार्थना केली, "तुम्ही बोलवाल तेव्हाच दर्शन होईल, पण हा व्यवसाय तुमच्यावर सोपवलाय... लक्ष असु द्या..."... !  त्याच दिवशी दुपारी हाजीअली दर्ग्यावरून जातांना दर्शन घेतलं... आणि एक चादर चढवली... दिवस मावळला, रात्र झा

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved