Rafi
१९६२ - १९६३ मध्ये लता मंगेशकरांनी गायकाला मिळणाऱ्या मानधनाचा वाद काढला. चित्रपटातून निर्मात्याला मिळणाऱ्या उत्पन्नातून गायकालाही रॉयल्टी मिळावी यासाठी ती धडपड होती... त्याकाळचे आघाडीचे अनेक गायक - गायिका या वादात मंगेशकरांबरोबर होते... पण या सगळ्या गराड्यात एक आवाज मात्र वेगळा होता. "गायकाला गाण्यासाठी ठरवलेल्या कराराप्रमाणे मानधनाइतकी रक्कम मिळाली, की त्याचा संबंध संपतो..., मग तो चित्रपट हिट होवो किंवा न होवो..." ... मोहम्मद रफी ... ! ... या माणसाची कला पैशांपुढे झुकली नाही ...
.
"माया" चित्रपटातल्या "तस्वीर तेरी दिल मे" च्या रेकॉर्डींगवेळी हा वाद झाला. पण रफींच्या स्टँडमूळे केवळ श्रेयनामावलीत गायकाचं नांव द्यावं या मुद्यावर नाईलाजाने एकमत झालं ... या विरोधाचा परीणाम म्हणजे रफींबरोबर एकही गाणं गाणार नाही हे लता मंगेशकरांनी जाहीर केलं... दोन दिग्दजांच्या या वादात जयकिशन यांनी मध्यस्थी केली... पण आयुष्यभर मनोमनी राहीलंच... ! २०१२ मध्ये एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद रफींनी आपल्याला माफीपत्र दिल्याचा दावा लता मंगेशकरांनी केला, पण रफींच्या मुलाने भक्कम भूमिका घेतल्याने त्यांना तो मागे घ्यावा लागला...
..
मोहम्मद रफी...
हा माणूस गळ्याप्रमाणेच स्वभावाने देखील गोड होता... प्रामाणिक होता... त्यांनी संगीतक्षेत्राला जे दिलं ते समुद्राएवढं आहे... लोकांनी त्यांना देवत्व बहाल केलं, तरीही या माणसाचे पाय कायम जमिनीवरच राहीले. !
गाण्यांचं त्यांनी सोनं केलं ...
त्यांच्या गळ्यांतून - मखमली आवाजातून निघालेले शब्द स्वतःला नशीबवान समजत असावे...
गंधर्व एखादाच होतो...
रफी सुद्धा एकमेव झाले !
.
ज्यांच्या आवाजामूळे आमचं आयुष्य समृद्ध झालं त्या मोहम्मद रफी या देवमाणसाचा आज जन्मदिवस... ! हा दिवस त्यांची आठवण काढल्याशिवाय पुर्ण होवू शकत नाही.. !