Posts

Showing posts from January, 2018

वध वि. हत्या

गांधी की नथुराम ? वध की हत्या ? याचं उत्तर जेव्हा न्यूट्रल होतं - गांधींचा विरोध आणि नथूरामांचं समर्थनही करावंसं वाटत नाही ... ना गांधी पूजनीय वाटतात, ना गोडसे ... ३० जानेवारी १९४८ रोजी झालेला गांधींचा अनैसर्गिक मृत्यू ही केवळ तत्कालिन राजकीय घडामोड म्हणून अभ्यासली जाते, वाचली जाते... ना नथुराम चुकीचे वाटतात, ना गांधी... आणि कुठलंही राजकीय मत यावर तयार होत नाही, तेव्हा कट्टरता संपून, राजकीय-वैचारीक परीपक्वतेकडे आपला सकारात्मक प्रवास सुरु झालेला असतो... ! .. एकेकाळी कट्टर नथुराम समर्थक असलेला मी, आज सांगतोय - गांधीही वाचले ... नथुरामही वाचले ... ना कुणाची भक्ती करावी असं वाटतं, ना कुणाचा विरोध... ! दोघांचा मुद्दा कळला - विषय संपला ! दोघांची पुस्तकं एकाच कप्प्यात शेजारी शेजारी बसून हल्ली माझ्या पर्सनल लाएब्ररीची शोभा वाढवताय...!

दिपःज्योती नमोस्तूते

मुंबईत या फ्लॅट आधी मी ज्या फ्लॅटमध्ये रहायचो तिथली ही गोष्ट... आता मी हल्ली एक महिन्यापूर्वीच इथे शिफ्ट केलंय. हा फ्लॅट मोठा आणि बऱ्यापैकी वरच्या मजल्यावर आहे... पण इथे सेफ वाटतं... ! आधी ज्या फ्लॅटमध्ये होतो तिथे गडबड होती... ! . मी सात वर्षांपासून धुळ्याबाहेर एकटा राहतोय, आधी पुण्यात - मग मुंबईत आधीच्या फ्लॅट मध्ये... आणि आता या ! भिती वाटणं, दडपण येणं या गोष्टी कधीच जाणवल्या नाहीत... घरात रोज देवपूजा करतो, गणपती अथर्वशीर्ष - व्यंकटेश स्त्रोत्र - गायत्री मंत्र - महालक्ष्मी अष्टक - रामरक्षा आणि हनुमान वडवानल स्त्रोस्त्र हे नित्यनियमाने करुन मगच ऑफीस करता घराबाहेर पडतो ... देवघरात देवांसह गुरूचरीत्र ग्रंथ, गजानन महाराजांची मुर्ती आहे... ! अंगावर यज्ञोपवित आहे... भिती तशी नसतेच... एकटा असलो तरी मस्त रिलॅक्स राहतो... ! .. पण साधारण ऑगस्ट पासून त्या घरात रात्री झोपतांना काहीतरी स्ट्रेस जाणवायचा.... दडपण... उगाच काहीतरी टेंशन असल्यासारखं ! ... आधी वाटलं बिजनेस टेंशन मुळे असेल, दिवसभराच्या कामाचा ताण वगैरे, पण सगळं आलबेल असतांनाही झोप उडालेली असायची... भलते सलते भास व्हायचे, अभद्र विचा

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved