वध वि. हत्या

गांधी की नथुराम ?
वध की हत्या ?
याचं उत्तर जेव्हा न्यूट्रल होतं -
गांधींचा विरोध आणि नथूरामांचं समर्थनही करावंसं वाटत नाही ...
ना गांधी पूजनीय वाटतात, ना गोडसे ...
३० जानेवारी १९४८ रोजी झालेला
गांधींचा अनैसर्गिक मृत्यू ही केवळ तत्कालिन राजकीय घडामोड म्हणून अभ्यासली जाते, वाचली जाते...
ना नथुराम चुकीचे वाटतात, ना गांधी...
आणि कुठलंही राजकीय मत यावर तयार होत नाही,
तेव्हा
कट्टरता संपून, राजकीय-वैचारीक परीपक्वतेकडे आपला सकारात्मक प्रवास सुरु झालेला असतो... !
..
एकेकाळी कट्टर नथुराम समर्थक असलेला मी,
आज सांगतोय -
गांधीही वाचले ...
नथुरामही वाचले ...
ना कुणाची भक्ती करावी असं वाटतं,
ना कुणाचा विरोध... !
दोघांचा मुद्दा कळला - विषय संपला !
दोघांची पुस्तकं एकाच कप्प्यात शेजारी शेजारी बसून हल्ली माझ्या पर्सनल लाएब्ररीची शोभा वाढवताय...!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved