खुनी गणपती Khuni Ganapati
"खुनी गणपती" ... नांव वाचून आश्चर्य वाटलं नं ? पण हा धुळ्यातला मानाचा गणपती आहे... ! फोटोत दिसतंय ते खुनी गणपतीची - खुनी मशिदीजवळ होते ती ऐतिहासिक महत्व असलेली महापूजा...! . १८९५ मध्ये खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनीक गणेशोत्सव सुरु केला. त्या गणेशाची विसर्जन मिरवणूक १००० वर्ष जून्या शाही जामा मशिदीवरुन सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी पालखीतून जात होती. त्यावेळी विरोध झाला... त्याचं रुपांतर हाणामारीत झालं आणि ब्रिटीशांनी गोळीबार केला. त्यात बरेच लोक मृत्यूमुखी पडले, जखमी झाले... आणि आहिराणीत "त्या मशिदजवळ खून पडनात", "खुन नी मसिद", गणपतीना वकतले तथा खून पडनात"... या चर्चांमूळे मशिदीला खुनी मशिद आणि गणपतीला खुनी गणपती नांव प्रचलीत झालं...! त्यावेळी ५ दिवस गणपती त्या मशिदीसमोर होता... .. पुढे ब्रिटीशांनी दोन्ही गटात समेट घडवला आणि एकमेकांच्या धर्माच्या सन्मानासाठी ठोस पाऊल उचललं. ब्रिटीशांकडून २२८ रुपये दोन्ही गटांना दिले जातात. आणि त्यातून ही ऐतिहासिक प्रथा सुरु झाली. .. दर अनंत चर्तुदशीला गणपतीची विसर्जन ...