चढ-उतार आणि डिल
माझा एक मित्र, पुण्यातल्या घराजवळ रहायचा, मूळ जळगावचा... एमबीए झालेला. २०१६ च्या सुरुवातीला आम्ही सोबतच स्वतंत्रपणे व्यवसाय सुरु केले. त्याने पुण्यात अकाऊंटस् फर्म सुरु केली, एक सीए सोबत घेवून आरओसी, अकाऊंटस्, म्यूचूअल फंड सल्ला, पॅन कार्ड वगैरे कामं करायचा... नारायण पेठेत एक छोटंसं ऑफीस घेवून व्यवसाय थाटला. दरम्यान मी मुंबईत स्थायीक झाल्यामूळे आणि फार क्षदोस्ती वगैरे नसल्याने हाय-हॅलो शिवाय फार संपर्क उरला नाही... .. एका कामासाठी पुण्यात आलो आणि अकाउंटस् बद्दलच एक काम असल्यानं मी त्याला फोन केला. काल भेटला...! सुरुवातीला बघितलं तर हा तोच का यावर विश्वास बसला नाही, कारण आधी हत्तीसारखा असणारा आता कुपोषित गाय झाला होता... "अरे काय ? तब्येत वगैरे बिघडली कां ? असा काय झालास ?, कसं सुरुय ? आणि त्याने हॉटेलमध्येच भाड भाड रडायला सुरुवात केली...! मागच्या दिड वर्षातलं अख्खं कर्मकांड ऐकवलं... .. झालं असं - व्यवसाय ऐन भरात असतांना एकेदिवशी त्याचा अपघात झाला... त्यात दोन महिने गेले, आणि आपसूक परीणाम व्यवसायावर झाला. दुखण्यातून सावरला, पण आर्थिक घडी बसवता त्याची...